Editor

“या रे दसरा मेळाव्याला” शिंदे गटाने मोजले १० कोटी रूपये?

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर भाजपाच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर निर्बंध उठवून सार्वजानिक उत्सव धुमधडाक्यात साजरे झाले. त्यामधून जनमत आणि शक्ती प्रदर्शन करण्याचा धडाका सरकारने लावलेला दिसतो. याचाच एक भाग म्हणून आता दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून गर्दी जमा करण्यासाठी मोठी रस्सीखेच लागलेली …

Read More »

बीकेसी दसरा मेळाव्यावरील कोट्यवधींच्या उधळपट्टीची ईडी, आयकर विभागाने चौकशी करावी काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांची मागणी

दसरा मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी एकनाथ शिंदे गटाने राज्यातील विविध भागातून एस टी बसेस तसेच खाजगी बससेमधून कार्यकर्ते आणले जात आहेत. यासाठी एसटी महामंडळाकडे १० कोटी रुपये रोख भरले असून ते मोजण्यासाठी महामंडळाला दोन दिवस लागले असे वृत्त माध्यमांमधून समजते. शिंदे गटाकडे एवढी मोठी रक्कम कोठून आली? त्यांना हा पैसा कोणी …

Read More »

नागपूर मेट्रोच्या वाढीव खर्चाच्या मान्यतेसह, कृष्णा आणि भंडाऱ्यातील उपसा सिंचनास मान्यता

राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत पोलिसांना इतर बँकाकडून कर्ज उपलब्ध करून देणे, रेशन कार्ड धारकांना १०० रूपयात दिवाळीसाठी लागणाऱ्या वस्तू देण्याच्या निर्णयासह नागपूर मेट्रो उभारणीत झालेल्या ५९९ कोटी ६ लाख वाढीच्या खर्चाला मान्यता देण्यात आली. त्याचबरोबर भंडारा जिल्ह्यातील उपसा सिंचन योजनेच्या सुधारीत खर्चास आणि उस्मानाबाद-बीड मधील दुष्काळी तालुक्यातील कृष्णा संजीवनी …

Read More »

पोलिसांसाठी खुषखबर, पूर्वीप्रमाणेच बँकांमार्फत घरबांधणीसाठी कर्ज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय

राज्यातील पोलीस दलातील अधिकारी आणि अंमलदारांना पूर्वीप्रमाणेच बँकांमार्फत घरबांधणीसाठी कर्ज देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. १० एप्रिल २०१६ च्या शासन निर्णयाप्रमाणे राज्यातील पोलिसांना खाजगी बँकांकडून कर्ज घेऊन पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळामार्फत योजना राबविण्यात येत होती. त्याप्रमाणे ५ हजार १७ पोलीस …

Read More »

निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून शिधापत्रिकाधारकांना १०० रू.त दिवाळी भेट राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

मुंबईसह राज्यातील १४ महापालिकांच्या निवडणूका केव्हाही जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र शिवसेनेत केलेल्या बंडखोरीमुळे शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात अद्यापही रोष आहे. जनतेतील हो रोष कमी कऱण्याच्या उद्देशाने आणि आगामी निवडणूकीत शिंदे गटाला आणि भाजपाला निवडणूका सोप्या जाव्यात या उद्देशाने दसरा आणि दिवाळीचे औचित्य साधत राज्यातील १ कोटी ७० लाख रेशन कार्ड …

Read More »

‘वंदे मातरम्’ला विरोध करून काँग्रेसने देशविरोधी मानसिकता दाखवली भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका

सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी दूरध्वनीवर हॅलो ऐवजी वंदे मातरम् म्हणावे या राज्य शासनाच्या निर्णयाला विरोध करून काँग्रेसने आपली देशविरोधी मानसिकताच दाखवली आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. ‘वंदे मातरम्’ला विरोध करणारे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी स्वातंत्र्य संग्रामात वंदे मातरम् …

Read More »

अनिल देशमुख यांना ईडीप्रकरणी जामीन मात्र सीबीआयप्रकरणात अद्याप नाही

महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेटर बॉम्बच्या माध्यमातून त्यावेळचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात कथित १०० कोटी वसुली प्रकरणी आरोप केले. याप्रकरणी अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या दट्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने मागील११ महिन्यांपासून ईडी कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना …

Read More »

भारतीय बौद्ध महासभा आणि दीक्षाभूमी स्मारक समितीमध्ये वाद उफाळला

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५६ मध्ये केलेल्या धर्मातंरास ६६ वर्ष पूर्ण होत असतानाच भारतीय बौद्ध महासभा आणि दीक्षाभूमी स्मारक समितीमध्ये वाद उफाळला आहे. दिक्षाभूमी परिसरात राजकीय नेत्यांना निमंत्रण देण्यावरून हा वाद उफाळला असून दिक्षाभूमी परिसर राजकीय मंच झाल्याची टीका करीत भारतीय बौद्ध महासभेने (दि. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया) येत्या ५ …

Read More »

राज्यातील लम्पी बाधितांपैकी ५० टक्के पशुधन रोगमुक्त पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांची माहिती

राज्यामध्ये ३ ऑक्टोबर २०२२ अखेर ३१ जिल्ह्यांमधील २१५१ गावांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील ४८,९५४ बाधित पशुधनापैकी २४,७९७ म्हणजे सुमारे ५० टक्के पशुधन रोगमुक्त झाल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी सांगितले. सिंह यांनी सांगितले की, राज्यातील बाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज अखेर १०९.३१ …

Read More »

राष्ट्रवादीचा आरोप, शिंदे गटाच्या मेळाव्याकरिता शासकीय यंत्रणांचा नियमबाह्य वापर तात्काळ निलंबन करण्याची केली मागणी- अ‍ॅड. अमोल मातेले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा एमएमआरडीएच्या बीकेसी येथील मैदानावर प्रस्तावित असल्याने सदर मेळाव्याकरिता येणाऱ्या वाहनांची पार्किंग व्यवस्था मुंबई विद्यापीठाच्या कलीना संकुलातील भूखंडावर करण्यात आली आहे.येथे पार्किंग व्यवस्था करण्याकरिता महापालिकेच्या एच/पूर्व विभागाचे अधिकारी/कर्मचारी व्यक्तिशः राबत आहेत. सदर ठिकाणी असलेली झाडे तोडून तेथील मातीसकट डंपरने इतरत्र हलविण्यात आली आहेत व त्याकरिता …

Read More »