Editor

वाहन चालकांनो, कॅशलेस प्रवासाबरोबर आता फास्टॅगवर मिळणार कॅशबॅकची सवलत ११ जानेवारी, २०२१ पासून सवलत योजना

मुंबईः प्रतिनिधी फास्टॅग प्रणालीचा वाहनधारकांनी अधिकाधिक वापर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महामंडळाच्या अखत्यारीतील यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग व राजीव गांधी सागरी सेतू (वांद्रे-वरळी) पथकर नाक्यांवर फास्टॅगधारक वाहनांना ५ टक्के सवलत (कॅशबॅक) ११ जानेवारी २०२१ पासून दिली जाणार आहे. पथकर नाक्यावरुन जाणाऱ्या वाहनांचा प्रवास …

Read More »

राज्याच्या उर्वरित जिल्हे आणि महानगरपालिकांमध्ये लसीकरणाचा ड्राय रन महाराष्ट्रातील ३० जिल्हे व २५ महानगरपालिका क्षेत्रांचा समावेश

मुंबई : प्रतिनिधी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार उद्या शुक्रवार ८ जानेवारी रोजी महाराष्ट्रातील ३० जिल्हे व २५ महानगरपालिका क्षेत्रांमध्ये कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन मोहिम राबविण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्हयांमध्ये ३ आरोग्य संस्था व प्रत्येक महानगरपालिकेमध्ये १ आरोग्य संस्था याठिकाणी ड्राय रन घेण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. …

Read More »

अर्थपूर्ण ‘मर्जी’ सांभाळण्यासाठी निर्णय घेणाऱ्या आघाडी सरकारला न्यायालयाची पुन्हा चपराक नियमबाह्य परवानगी दिल्या प्रकरणी- भाजपा आमदार भातखळकर यांचा आरोप

मुंबई: प्रतिनिधी उच्च न्यायालयाचे स्पष्ट निर्देश असताना सुद्धा केवळ कोणाची तरी ‘अर्थपूर्ण मर्जी’ सांभाळण्यासाठी नवीन कनिष्ठ महाविद्यालयांना नियमबाह्य पद्धतीने परवानगी दिल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना सुनावले असून, सतत बेकायदेशीर निर्णय घेणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला न्यायालयाने पुन्हा एकदा जोरदार चपराक दिल्याची टीका भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार …

Read More »

देवेंद्र फडणवीसांनी रिझर्व्ह बँक गव्हर्नरांना भेटून केली ही मागणी स्वयंपुनर्विकास योजनेत सहकारी गृहनिर्माण संस्थांना वित्तपुरवठ्यासाठी सहकारी, जिल्हा बँकांना परवानगी द्या!

मुंबई: प्रतिनिधी स्वयंपुनर्विकास योजनेत सहकारी गृहनिर्माण संस्थांना वित्तपुरवठा करता यावा, यासाठी राज्य सहकारी बँक, जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकांना परवानगी देण्यात यावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांना भेटून केली. यावेळी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे सुद्धा त्यांच्यासमवेत …

Read More »

पोलीस शिपाई भरतीत एसईबीसी (SEBC) उमेदवारांना दिलासा गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यात पोलीस भरती २०१९ करीता एसईबीसी (SEBC) च्या ज्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहे, त्यांना मोठा दिलासा देण्यात येत असून गृह विभागाने  ४ जानेवारी २०२१ रोजी निर्गमित केलेला शासन निर्णय रद्द करण्यात येत आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. पोलीस शिपाई भरती २०१९ करीता ज्या …

Read More »

कोरोना: राज्यातील अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या पुन्हा ५० हजारापार ४ हजार ३८२ नवे बाधित, २ हजार ५७० बरे झाले तर ६६ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी दोन दिवसांपूर्वी बरे होवून घरी जाणाऱ्या रूग्णांमुळे आणि कमी नवे बाधित रूग्ण आढळून आल्याने राज्यातील अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ५० हजाराहून कमी झाली होती. मात्र आज बरे होणाऱ्यांचे प्रमाण बाधित रूग्णांपेक्षा कमी असल्याने अॅक्टीव्ह रूग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ झाली आहे. मागील २४ तासात राज्यात ४,३८२  नवीन रुग्णांचे निदान झाले …

Read More »

२४ वर्षानंतर शिवउद्योग सेनेच्या मायकल जॅक्सनच्या कार्यक्रमाला दिली करमाफी विझक्राफ्ट एंटरटेनमेंट एजन्सीला करमणूक शुल्काची रक्कम परत करण्यास मान्यता

मुंबई : प्रतिनिधी  साधारणत: २४ वर्षापूर्वी राज्यात शिवसेना-भाजपाचे सरकार असताना नवतरूणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जगविख्यात पॉपसिंगर मायकेल जॅक्सन याच्या कार्यक्रमाचे मुंबईत आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या विझक्राफ्ट एंटरटेनमेंट एजन्सीला करमणूक कर भरावा लागला. मात्र तो भरलेला कर पुन्हा सदर कंपनीला परत देण्याचा निर्णय राज्य सरकारने …

Read More »

राज्यातील ३१ डिसेंबर २०२० पर्यंतची गुंठेवारी नियमित होणार सर्वसामान्यांना घरांसाठी होणार लाभ

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील ज्या ठिकाणी ३१ डिसेंबर २०२० पर्यंतच्या गुंठेवारी योजना अद्यापही नियमित झालेल्या नाहीत त्या नियमित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. राज्य शासनाने ऑगस्ट २००१ मध्ये गुंठेवारी नियमितीकरण अधिनियम हा कायदा मान्य करुन अस्तित्वामध्ये आणला होता. दिनांक ०१ जानेवारी, २००१ च्या पूर्वी …

Read More »

सरकारचा मोठा निर्णय: घर खरेदी करणाऱ्यांचे मुद्रांक शुल्क भरणे बिल्डरला बंधनकारक राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबई : प्रतिनिधी बांधकाम प्रकल्पांना सर्व प्रिमियमवर (अधिमुल्य) ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत ५० टक्के सूट देण्याचा तसेच जे प्रकल्प या सवलतीचा लाभ घेतील त्यांना ग्राहकांतर्फे संपूर्ण मुद्रांक शुल्क भरावे लागेल असा महत्त्वपूर्ण निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या निर्णयामुळे बांधकाम प्रकल्पांना अधिमूल्यामध्ये जी सवलत …

Read More »

“औरंगाबाद नामकरणा” वरून मुख्यमंत्र्यांनी भाजपाला पकडले पेचात औरंगाबादच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याची अधिसूचना काढा-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे केंद्राला पत्र

मुंबई : प्रतिनिधी औरंगाबाद जिल्ह्याचे नामांतर संभाजीनगर करण्याच्या मागणीवरून मागील काही दिवसांपासून भाजपा विरूध्द शिवसेना असा वाद रंगलेला असतानाच आता त्यात काँग्रेस, मनसे हे ही सामील झाले आहेत. यापार्श्वभूमीवर भाजपाच्या रणनीतीला सडतोड उत्तर देण्यासाठी औरंगाबाद विमानतळाचे छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे नामकरण करण्याबाबत केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाने अधिसूचना लवकरात लवकरात …

Read More »