मुंबई : प्रतिनिधी ब्रिटनमधून आलेल्या महाराष्ट्रात आलेल्या ८ प्रवाशांना कोरोना स्ट्रेनची धक्कादायक माहिती पुढे आली असून यातील ५ रूग्ण हे मुंबईतील आहेत. तर पुणे, मीरा भायंदर आणि ठाणे येथील प्रत्येकी १ रूग्ण असल्याचे एकात्मिक साथ रोगचे प्रमुख डॉ.प्रदीप आवटे यांनी सांगितले. या संसर्ग विषाणूचा प्रसार होवू नये यासाठी मुख्यमंत्री उध्दव …
Read More »स्त्रीयांच्या संरक्षणासाठी हा कायदा सशक्त करायचाय, मग पाठवा सूचना-सुधारणा गृहमंत्री अनिल देशमुखांचे आवाहन
मुंबई : प्रतिनिधी माता-भगिनी बालकांवर अन्याय, अत्याचार करणाऱ्यांविरुद्ध अधिक कठोर कारवाई करता यावी, याकरिता ‘शक्ती’ हा कायदा करण्यात येत आहे. हा कायदा अधिक प्रभावी व्हावा याकरिता नागरिकांनी आपल्या सूचना, सुधारणा पाठवाव्यात असे आवाहन समिती प्रमुख तथा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले. हे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांच्या संयुक्त समितीकडे पाठविण्यात आलेले आहे. या समितीचे …
Read More »कोरोना: बाधितांपेक्षा ५ पटीत घरी गेले तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ५० हजारा खाली २ हजार ७६२ नवे बाधित, १० हजार ३६२ बरे झाले तर २९ मृतक
मुंबई : प्रतिनिधी मागील २४ तासात नवे आढळून आलेल्या बाधितांपेक्षा पाच पट्टीने अधिक रूग्ण अर्थात १० हजार ३६२ जण बरे होवून गेले. त्यामुळे आजपर्यंत घरी गेलेल्यांची एकूण संख्या १८ लाख ४७ हजार ३६१ वर पोहोचली आहे. तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ४८ हजार ८०१ इतकी कमी नोंदविली गेली आहे. यामुळे राज्यातील …
Read More »पुण्यातील या पोलीस ठाण्यांच्या विभाजनाला मान्यता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय
मुंबई: प्रतिनिधी पुणे शहरात नव्याने समाविष्ट होणाऱ्या गावांसह वाढते शहरीकरण लक्षात घेऊन पुणे शहर आणि ग्रामीण पोलीस दलातील पोलीस ठाण्यांच्या विभाजनाला मान्यता देण्यात आली. तसेच कायदा-सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने पुणे जिल्ह्यातील वाघोली, ऊरळीकांचन, बाणेर, काळेपडळ, खराडी, फुरसुंगी, म्हाळुंगे, रावेत आणि शिरगाव या नवीन पोलीस ठाण्यांना मंजूरी देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या …
Read More »विद्यापीठ, महाविद्यालयांमध्ये स्थापन होणार ‘विद्यार्थिनी उद्योजकता क्लब’ कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून राज्यातील महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी कौशल्य विकास विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमध्ये स्वतंत्र ‘महिला उद्योजकता कक्ष’ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय सोसायटीमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमधील ३० टक्के निधी महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी वापरणे, विद्यार्थीदशेतच महिलांना उद्योजकतेचे प्रशिक्षण देण्यासाठी …
Read More »कंगनाच्या कबुली जबाबातून महाराष्ट्रद्रोही भाजपचे षडयंत्र उघड काँग्रेसने केला जाहीर निषेध
मुंबई: प्रतिनिधी सिने अभिनेत्री कंगना राणावत हिने आपल्या ट्वीटमधून तिने आतापर्यंत केलेले कारनामे भारतीय जनता पक्षाला खुश करण्यासाठीच होते, असा कबुलीजबाब दिलेला आहे. “सच मे भाजपा को खुश करके” या तिने वापरलेल्या शब्दांमधून तिला भारतीय जनता पक्षानेच महाराष्ट्राला बदनाम करण्याची सुपारी दिली होती. भारतीय जनता पक्षाने लिहिलेल्या पटकथेनुसारच ती महाराष्ट्राची …
Read More »“बिनविरोध सरपंच जाहिर करताय” निवडणूक आयोगाची मान्यता घेतली का? सरपंचपदाच्या लिलावासंदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश- आयुक्त मदान
मुंबई : प्रतिनिधी सरपंचपदाच्या लिलावांबाबत होत असलेल्या तक्रारींसंदर्भात राज्य निवडणूक आयोगास स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल सादर करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली. सरपंचपदाचा लिलाव होत असून त्यासाठी मोठ्या रकमेची बोली लावण्यात येत आहे, अशी तक्रार आयोगाकडे आली आहे. ग्रामपंचायतींच्या …
Read More »१० वी, १२ वीच्या परिक्षा होणार ऐन उन्हाळ्यात तारीख निश्चित नसली तरी शालेय शिक्षण मंत्री गायकवाड यांची माहिती
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील १० वी आणि १२ वी परिक्षा आता घेण्याचा विचार राज्य सरकार करत असून १० वी च्या परिक्षा मे नंतर तर १२ वी परिक्षा १५ एप्रिलनंतर घेण्याचा विचार राज्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. कोरोना लॉकडाऊनमुळे शैक्षणिक कामकाज म्हणावे तसे सुरु झाले नाही. त्यातच ऑनलाईन पध्दतीने …
Read More »औरंगाबाद नामांतरप्रश्नी अजित पवारांचे मोठे वक्तव्य… तिन्ही नेते बसून तोडगा काढतील
नाशिक : प्रतिनिधी राज्यातील औरंगाबाद शहराचे नामांतर करून संभाजीनगर नाव ठेवण्यावरून शिवसेना नेते आणि काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणवर कलगीतुरा सुरु झाला असतानाच याप्रश्नी आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याप्रश्नी शरद पवार, सोनिया गांधी आणि मुख्यमंत्री बसून तोडगा काढतील असा विश्वास व्यक्त केला. औरंगाबाद शहराच्या नामांतरावरुन महाविकास आघाडीत विरोधाभास असल्याचे समोर …
Read More »कोरोना: राज्यात पहिल्यांदाच सर्वात कमी मृतकांची नोंद ३ हजार २८२ नवे बाधित, २ हजार ६४ बरे झाले तर ३५ मृतकांची नोंद
मुंबई: प्रतिनिधी जवळपास तब्बल ६ महिन्यानंतर राज्यात ३५ बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच मागील काही दिवसांपासून साधारणत: ५० ते १०० या दरम्यान कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद होत होती. मात्र पहिल्यांदाच ५० हून कमी मृतकांची नोंद झाली आहे. ही दिलासा देणारी बाब आहे. आज २,०६४ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत …
Read More »
Marathi e-Batmya