मुंबई : प्रतिनिधी देशातील तमाम आंबेडकर अनुयायांचे श्रध्दास्थान असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे समाधीस्थळ आणि त्यांचे राहते घर दादर परिसरात आहे. त्यामुळे दादर रेल्वे स्थानकास डॉ.आंबेडकरांचे नाव द्यावे अशी मागणी भीम आर्मीच्यावतीने करण्यात आली असून स्थानकाचे नामांतर ६ डिसेंबरपूर्वी करावे अन्यथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चैत्यभूमीवर पाय ठेवू देणार नसल्याचा इशाराही …
Read More »वादग्रस्त मंत्र्याकडे भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या अधिकाऱ्याची नियुक्ती गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांच्याकडे म्हाडा सचिव बास्टेवाड ओएसडी म्हणून रूजू
मुंबई : प्रतिनिधी मागील काही वर्षापासून राज्याचे गृहनिर्माण मंत्री असलेल्या प्रकाश महेता यांच्यावर झालेल्या आरोपामुळे सतत चर्चेत आहेत. त्यातच त्यांच्याकडील बरेचसे अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढून घेतल्याची चर्चा मंत्रालयात सुरु असतानाच भ्रष्टाचाराचे आरोप झालेले म्हाडाचे माजी सचिव भरत बास्टेवाड यांची ओएसडी अर्थात विशेष कार्य अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने …
Read More »जिद्द, स्वाभिमानाच्या जोरावर महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या एका लोक कलावंतीनीचा प्रवास राष्ट्रपती पुरस्कारापासून कांताबाई अजूनही उपेक्षित
कुणी मार्गदर्शक नाही. नृत्यसाधनेतला गुरु नाही. एक लव्याप्रमाणे स्वत:च नृत्य शिकत त्यांनी तमाशा फड उभा करून तो लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचविला. महाराष्ट्राच्या तमाशावर प्रेम करणारे रसिक आज जिथे- जिथे आहेत,तिथे- तिथे त्यांचे नाव आदराने घेतले जाते. वयाच्या नवव्या-दहाव्या वर्षीच त्यांनी छोट्या मोठ्या कार्यक्रम आणि त्यानंतर तमाशात काम करायला सुरुवात केली. त्यावेळी फारसं उत्पन्न …
Read More »उद्धव ठाकरे आमचे मार्गदर्शक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्तुतीसुमने
वाशिमः प्रतिनिधी राज्यातील सत्तेत सहभागी असूनही शिवसेनेकडून भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडली जात नाही. त्यातच आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीसाठी भाजपकडून शिवसेनेला मिन्नतवाऱ्या करण्यात येत आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांनी उध्दव ठाकरे हे आमचे मार्गदर्शक असल्याचे उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढल्याने भविष्यात भाजप-शिवसेना युती होणार असल्याचे शक्यता वर्तविण्यात येत आहे. …
Read More »सायबर गुन्हे पासून स्वतःला वाचविण्यासाठी आता @CyberDost गृह मंत्रालयाच्या ट्विटर हँडलवर मिळत राहणार माहिती
मुंबई : प्रतिनिधी सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी व त्यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने ट्विटरवर @CyberDost या नावाने हँडल सुरू केले आहे. या हँडलद्वारे सायबर गुन्ह्यांबद्दलची सर्वसाधारण माहिती तसेच यासंबंधी घ्यावयाची काळजी याबद्दल नियमित माहिती देण्यात देण्यात येत आहे. नागरिकांनी या ट्विटर हँडलवरून माहिती घेण्याचे आवाहन गृह मंत्रालयाने केले आहे. …
Read More »निवडणूकीत उत्तर भारतीयांची मते मिळवण्यासाठी ठाकरे बंधूंचे राजकारण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची खोचक टीका
मुंबईः प्रतिनिधी आगामी निवडणूकांमध्ये उत्तर भारतीयांच्या मतांवर डोळा ठेवून ठाकरे बंधू उत्तरप्रदेशमध्ये जावून आले.म्हणजे दोघेही निवडणूका डोळयासमोर ठेवून राजकारण करत असल्याची खोचक टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी केली. मे महिन्यात लोकसभा निवडणूका होत आहेत कदाचित त्यासोबत विधानसभा निवडणूका होण्याची शक्यता आहे. आता सगळेच पक्ष मतांकडे लक्ष ठेवून …
Read More »दिव्यांगावर मात करण्यासाठी शस्त्रक्रिया किंवा प्रत्यारोपनाला आर्थिक मदत देणार दिव्यांग व्यक्तींच्या २०१८ धोरणास मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याची मंत्री बडोले यांची माहिती
मुंबई :प्रतिनिधी दिव्यांगत्वावर सुरूवातीच्या काळातच प्रतिबंध करता यावा यासाठी आवश्यक शस्त्रक्रिया अथवा प्रत्यारोपण करता यावे यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमधिल दिव्यांगांच्या ५ टक्के राखीव निधीतून राज्याकडून आर्थिक मदत देण्याची तरतूद या धोरणात करण्यात आली असून हिमोफिलिया आणि थालसिमिया या आजारांवरील उपचाराकरीता प्रत्येक जिल्ह्यात सामान्य रूग्णालयामध्ये एक स्वतंत्र कक्ष निर्माण करणार असल्याची …
Read More »अर्थव्यवस्थेचा बोजवारा उडविणाऱ्यांकडून भाविकांच्या पैशांवर डल्ला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची टीका
मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारचे आर्थिक व्यवस्थापन पूर्णपणे बिघडले असून भाजप शिवसेना सरकारच्या काळात महाराष्ट्र राज्य कर्जबाजारी झाले आहे, हे आता स्पष्ट दिसत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे सिंचन प्रकल्पाकरिता शिर्डी संस्थानला भाविकांनी देणगी दाखल दिलेल्या पैशावर राज्य सरकारने घाला घातला आहे. त्यामुळे कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा? हा प्रश्न जनतेने सरकारला …
Read More »राज्य अल्पसंख्याक आयोग तुमच्या दारी अध्यक्ष हाजी अरफात शेख जाणून घेणार समस्या
मुंबई : प्रतिनिधी राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर अल्पसंख्याकांच्या विविध समस्या ऐकण्यासाठी अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी ‘आयोग आपल्या दारी’ या संकल्पनेअंतर्गत महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. त्याची पहिली सुरुवात पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर पासून झाली. यात कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्हा दौरा करून अल्पसंख्याक समाजाच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले. सोमवार दिनांक …
Read More »सोमवारपासून एस.सी –एस.टी उद्योजक विकास परिषद उद्योगमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन
मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती हब (NSSH) उपक्रमांतर्गत उद्योजक विकास परिषद व उत्पादनाचे प्रदर्शन ३ ते ५ डिसेंबर या कालावधीत वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे होणार असून या परिषदेचे उद्या सोमवार दि. ३ डिसेंबर रोजी, दुपारी २.३० वा. उद्योग व खनिकर्म मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते होणार आहे. उद्योग व …
Read More »
Marathi e-Batmya