नाशिक: प्रतिनिधी शेतकऱ्यांना उभे करण्यासाठी सरकारने हातभार लावला पाहिजे. सरकारने तशी भूमिका घेतली नाहीतर आम्ही याविरोधात ठोस भूमिका घेऊ असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारला दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आज नाशिकमध्ये शेतकर्यांच्या शेताच्या बांधावर जात त्यांच्या पिकाची पाहणी केली. शेतकर्यांच्या झालेल्या …
Read More »नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची मागणी
मुंबई: प्रतिनिधी परतीच्या पावसाने राज्यातील शेतकर्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान केले असून सरकारने तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आमदार नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना केली. अहमदनगरच्या शेतकर्याने सोयाबीनचे उभं पीक पेटवून दिले. याचा अर्थ सरकारला शेतकर्यांच्या अडचणी कळत नसल्यानेच शेतकरी इतक्या टोकाची भूमिका घेत असल्याचे …
Read More »मुख्यमंत्र्यांनी घेतला अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीचा आढावा मंत्रिमंडळ उपसमितीची शनिवारी होणार बैठक
मुंबई: प्रतिनिधी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत यंत्रणांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहचून, त्यांना जास्तीत जास्त दिलासा देता येईल असे प्रयत्न करावेत. क्षेत्रीय स्तरावरील सर्वच यंत्रणांनी या काळात अत्यंत संवेदनशीलतेने कार्यवाही करावी. पंचनामे करण्यासाठी योग्य समन्वय ठेवावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि शासनाच्यावतीने करण्यात …
Read More »शपथविधी नाही झाला तरी नवी विधानसभा अस्तित्वात येणार राज्यपाल कोश्यारी यांचे घडामोडींवर बारीक लक्ष
मुंबईः विशेष प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीचा निकाल लागून जवळपास आठवडा झाला तरी राज्यात सरकार स्थापन करण्यावरून भाजपा-शिवसेनेत कुरघोडीचे राजकारण सुरु आहे. मात्र विद्यमान विधानसभेची मुदत ९ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. तत्पूर्वी नव्या सरकारचा शपथविधी नाही झाला तरीही १० नोव्हेंबरपासून नव्या सदस्यांची विधानसभा अस्तित्वात येणार असल्याची माहिती विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. या …
Read More »जगावं की मरावं ? शेतक-यांनी मांडली शरद पवारांसमोर व्यथा पावसामुळे शेतकरी हवालदिल
नाशिकः प्रतिनिधी आमच्या हातचं पीक गेलंय… खूप नुकसान झालंय… जगावं की मरावं असा प्रश्न आमच्यासमोर आहे असे सांगतानाच सरकारतर्फे कुणीच आलेलं नाही अशी माहिती नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी शेताच्या बांधावर गेलेल्या शरद पवार यांना शेतकऱ्यांनी कथन केली. परतीच्या पावसामुळे राज्यात शेतीचे खूप नुकसान झाले आहे. आज इगतपुरीजवळील टाके-घोटी गावांना राष्ट्रवादी …
Read More »बंद पडलेल्या कंपन्यांच्या जमिनी विकून कामगारांची देणी द्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील अनेक भागात लहान-मोठ्या कंपन्या बंद पडत आहेत. मात्र या कंपन्यांमध्ये काम करत असलेल्या कामगारांना त्यांच्या पगारी व अन्य देणी अद्याप मिळात नाहीत. त्यामुळे अशा बंद पडलेल्या कंपन्यांच्या जमिनी विकून कामगारांची थकीत देणी देण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपसरचिटणीस अमर देशमुख यांनी राज्य सरकारकडे एका निवेदनाद्वारे केली. आर्थिक …
Read More »विजय सिंगच्या मृत्यूची मानवाधिकार आयोगामार्फत चौकशी करा आयोगात राष्ट्रवादी खटला लढविणार असल्याची प्रवक्ते नवाब मलिक यांची माहिती
मुंबईः प्रतिनिधी वडाळा पोलिस कोठडीत मृत्युमुखी पडलेल्या विजय सिंग या तरुणाच्या मृत्यूची मानव अधिकार आयोगामार्फत सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांनी आज मानव अधिकार आयोगाची भेट घेऊन केली. विजय सिंग या तरुणाच्या मृत्यूला कारणीभूत असणारे पोलिस अधिकारी आणि पोलिस …
Read More »उध्दव ठाकरे म्हणाले भाजपाचा प्रस्ताव आलाच नाही शिवसेना मुख्यमंत्री पदावर ठाम
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील विधानसभा निवडणूकीचा निकाल जाहीर होवून ६ दिवस झाले तरी महायुतीतील सत्ता स्थापनेवरून सुरू असलेला घोळ काही केल्या संपेना. त्यातच आता भाजपाने १३ मंत्रीपदासह उपमुख्यमंत्री पदाचा प्रस्ताव शिवसेनेला पाठविल्याची माहिती भाजपा सूत्रांनी दिली. परंतु अशा कोणत्याही स्वरूपाचा प्रस्ताव शिवसेनेकडे आला नसल्याची स्पष्टोक्ती शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिल्याने …
Read More »आणि तेल लावलेल्या पैलवानाने अब की बार २२० पारचा वारू अडविला शरद पवारांच्या झंझावातामुळे मरगळलेल्या काँग्रेसला ४३ हून अधिक जागा तर राष्ट्रवादीला ५० हून अधिक
मुंबईः विशेष प्रतिनिधी काही वर्षापूर्वी शरद पवार हे तेल लावलेले पैलवान असून ते कशातच सापडत नसल्याचे प्रशस्तीपत्रक शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी दिले होते. तर त्याच अनुषंगाने विद्यमान देवेंद्र फडणवीस यांनी समोर विरोधक रूपी पैलवान दिसल्याचे वक्तव्य करत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस प्रचारात कुठेच दिसत नसल्याचे दाखवून दिले. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा …
Read More »युती सरकारला मदत करण्यासाठी १५ बंडखोर संपर्कात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
मुंबईः प्रतिनिधी निवडणूकीच्या निकालावर आता काही बोलणार नाही. त्याचे विश्लेषण नंतर करणार आहे. मात्र राज्यात पुन्हा युतीचे सरकार स्थापन करण्याइतके संख्याबळ भाजपा-शिवसेनेला मिळाले आहे. तरीही आमच्याविरोधात बंडखोरी करून विजय मिळविलेल्या १५ बंडखोर विजयी उमेदवारांकडून सरकार स्थापनेसाठी मदत करणार असून ते संपर्कात असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. निकालानंतर संध्याकाळी भाजपा …
Read More »
Marathi e-Batmya