Editor

राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय आता ६५ वर्षे दोन लाख कर्मचाऱ्यांना लाभ होणार

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे सेवा समाप्तीचे वय ६० वरून ६५ वर्षे करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. अंगणवाडी केंद्रात काम करण्यास शारीरिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. सुमारे दोन लाख कर्मचारी अंगणवाडी सेवेत कार्यरत आहेत. अंगणवाडी सेविकांच्या मानधनवाढीसंदर्भात …

Read More »

२६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर संविधान सप्ताह सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यात २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान संविधान सप्ताह साजरा करणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली. संविधान सप्ताह आयोजित करण्याबाबतची आढावा बैठक आज मंत्रालयात झाली त्यावेळी बडोले बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव दिनेश वाघमारे, बार्टीचे …

Read More »

सामाजिक वातावरण खराब करणाऱ्या शक्तीच्याविरोधात लढण्यासाठी सज्ज व्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आदेश

मुंबईः प्रतिनिधी जाती-जातीमध्ये…धर्मा-धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचे आणि गावागावात चुकीचे संदेश पोचवण्याचे काम केले जात असल्यामुळे देशात आज खराब आणि भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे…या शक्तीच्याविरोधात सामना करण्यासाठी तयार होतानाच आपल्याला नेहरु,मौलाना आजाद,आंबेडकरांचे विचार घेवून आपण पुढे जायला हवे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले. मौलाना …

Read More »

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे उद्योग क्षेत्राचे तीन तेरा वाजले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र सतत अग्रेसर होता. देशातील एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी एक तृतियांश गुंतवणूक महाराष्ट्रात यायची. परंतु, भाजप-शिवसेनेच्या काळात महाराष्ट्रातील गुंतवणुकीचे प्रमाण वेगाने घसरले असून, यंदा सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्र तिस-या क्रमांकावर घसरला आहे. भाजप शिवसेना सरकारच्या कार्यकाळात महाराष्ट्राची अधोगती झाली असून उद्योग क्षेत्राचे तीन तेरा वाजले …

Read More »

स्व.बाळासाहेब ठाकरेंच्या नाव देण्याच्या मागणीने शिवसेनेची भाजपवर कुरघोडी समृध्दी महामार्गाला शिवसेनाप्रमुखांचे नाव देण्यासाठी शिवसेनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुंबईः प्रतिनिधी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीसाठी शिवसेनेने युती करावी यासाठी एकाबाजूला भाजपकडून मिनत्या सुरु आहेत. त्यास पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी त्यास अद्याप कोणताही दुजोरा दिलेला नाही. मात्र नियोजित नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गाला माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचे घाटत असतानाच शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी शिवसेनेच्या मंत्र्यांनी …

Read More »

दुष्काळामुळे साखरेच्या उत्पादनात घट होणार राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली चिंता

मुंबईः प्रतिनिधी दुष्काळी परिस्थितीमुळे ऊसाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा परिणाम साखर उत्पादनावर होणार असला तरी राज्यातल्या जनतेला कमतरता भासणार नसल्याचा दिलासा सहकार राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिला. त्याचबरोबर जे कारखानदारांनी शेतकऱ्यांना एफआरपी दिला नाही अशा ११ कारखानदारांवर कारवाई करण्याची मागणीही सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना करणार त्यांनी …

Read More »

अवनी वाघिणीच्या हत्येचे पडसाद मंत्रिमंडळ बैठकीत वनमंत्री मुनगंटीवार विरूध्द शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये खडाजंगी

मुंबई: प्रतिनिधी नरभक्षक आवनी वाघिणीला गोळ्या घालून ठार केल्यावरून राज्याच्या राजकारणात सत्ताधारी विरूध्द विरोधक असा सामना रंगल्याचे दिसत आहे. त्यातच आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वनमंत्री तथा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार विरूध्द शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये या अवनीप्रकरणावरून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चांगलीच खडाजंगी झाली. शिवसेनेचे मंत्री मंत्रिमंडळ बैठकीत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर निशाणा धरणार …

Read More »

नागरीकांच्या प्रश्नांची तड लावण्यासाठी मंत्री बडोलेचा ई-संवाद व्हॉट्सअँप, ऑनलाईन पध्दतीने प्रश्न विचारण्याची संधी

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील ज्येष्ठ नागरीक, मागासवर्गीय, दिव्यांगांसह सर्व मागासवर्गीय नागरीकांसाठी राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष विभागाकडून विविध योजना राबविण्यात येतात. तरीही अनेक नागरीकांना या योजनांचा लाभ मिळविताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. या समस्येवर तात्काळ तोडगा काढण्यासाठी राज्याचे सामाजिक न्याय व विशेष विभागाचे मंत्री राजकुमार बडोले यांनी या सर्वच …

Read More »

पानाच्या थुंकीचे डाग नष्ट करणे होणार शक्य जागतिक संशोधन स्पर्धेत रूईया महाविद्यालयाच्या विद्यार्थींनीना सुवर्ण पदक

मुंबई : प्रतिनिधी रेल्वे, बस स्थानके, इमारती-जीन्यातील कोपरे या ठिकाणी पान खावून त्याच्या पिचकाऱ्या मारत विश्वविक्रमी डाग निर्माण करणाऱ्या महाभागांची संख्या देशात कमी नाही. मात्र या लाल रंगाचे डाग स्वच्छ करण्यासाठी पर्याय शोधला जात होता. अखेर पानाचे लाल डाग नष्ट करण्यासाठी अखेर अंतिम तोडगा मिळाला असून मुंबईतील रूईया कॉलेजच्या विद्यार्थींनीना …

Read More »

वाघिण मृत्‍यु प्रकरणी हीन दर्जाचे राजकारण करू नये भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी टी-1 (अवनी) या नरभक्षक वाघिणीच्‍या मृत्‍युप्रकरणी वन्‍यजीव प्रेमी, विविध राजकीय पक्षांचे प्रमुख यांनी जे हीन दर्जाचे आरोप करत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा राजीनामा मागण्‍याचे प्रकार सुरू आहेत ते पूर्णपणे अयोग्‍य आहे. या नरभक्षक वाघिणीच्‍या मृत्‍युचे राजकारण करणे योग्‍य नाही. सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या निर्देशानुसार ही कार्यवाही वनविभागाने केली आहे. मुळात …

Read More »