Editor

सर्वाधिक गोंधळलेला राजकारणी म्हणजे उद्धव ठाकरे ! विरोधी पक्षनेते विखे पाटील यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी केवळ सत्तेत कायम राहण्यासाठी म्हणून शिवसेनेने आपली अब्रू गमावली असून, त्‍यांचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणजे सर्वाधिक गोंधळलेला राजकारणी असल्याची बोचरी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. प्रवरानगर येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्‍याच्‍या गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना …

Read More »

निवृत्तीवेतन हवय तर ३० नोव्हेंबरपर्यंत हयातीचा दाखला सादर करा वित्त विभागाच्या लेखाधिकाऱ्यांचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी अखिल भारतीय सेवेतून निवृत्त तसेच राज्य शासकीय निवृत्ती/कुटुंब निवृत्तीवेतन धारकांनी दि. १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०१८ या कालावधीत ते ज्या बॅंकेतून निवृत्तीवेतन घेत असतील तिथे हयातीचा दाखला सादर करावा, असे आवाहन वांद्रे येथील वित्त विभागाच्या उपअधिदान व लेखा अधिकारी रश्मी नांदिवडेकर यांनी केले आहे. अधिदान व …

Read More »

दुष्काळासाठी ३१ ऑक्टोबरनंतर कोणता मुहुर्त ? प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

मुंबईः प्रतिनिधी सरकारला ३१ ऑक्टोबरनंतर दुष्काळ जाहीर करायला कोणता मुहुर्त मिळणार आहे असा संतप्त सवाल करतानाच भाजपला सरकारी तिजोरीतले पैसे वाचवायचे आहे म्हणून दुष्काळ जाहीर करण्यात उशीर केला जात आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी सरकारवर केला. महसुलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ३१ ऑक्टोबरनंतर राज्यात दुष्काळ …

Read More »

काँग्रेस कार्यकर्त्याचा भाजपच्या कार्यकर्त्यांकडून खून लोकशाहीचा खून केल्याचा प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा आरोप

मुंबई ः प्रतिनिधी मुंबईत भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यकर्ते मनोज दुबे यांची निर्घुण हत्या केली आहे. काँग्रेस पक्ष भाजपच्या गुंडानी केलेल्या या भ्याड कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध करीत असून ही काँग्रेस कार्यकर्त्यांची नाही तर लोकशाहीची हत्या आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे. काँग्रेस …

Read More »

पंतप्रधानांनी दुष्काळमुक्त म्हणून जाहीर केलेल्या २५ हजार गावांची नावे जाहीर करा जलयुक्त शिवार नव्हे भ्रष्टाचाराचा मालयुक्त शिवार असल्याचा सचिन सावंत यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डी येथे बोलताना महाराष्ट्रातील १६ हजार गावे दुष्काळमुक्त झाली आहेत व ९ हजार गावे दुष्काळ मुक्त होण्याच्या मार्गावर आहेत असे जाहीर केले. परंतु राज्यात जवळपास २०१ तालुक्यातील किमान २० हजार गावांमध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केलेली दुष्काळमुक्त गावांची यादी जाहीर …

Read More »

राज्यातील २५२ तालुक्यातील पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर घट भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचा अहवाल

मुंबईः प्रतिनिधी यंदाच्या वर्षी मराठवाडा, विदर्भात पावसाने म्हणावी अशी हजेरी लावली नाही. मार्च महिना यायला अद्याप चार महिन्याचा कालावधी अद्याप शिल्लक राहीलेला असतानाच या दोन्ही विभागातील विहीरी, नद्या, नाले कोरडे पडल्याने पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न गंभीर बनत चालला आहे. त्यातच पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या अखत्यारीत असलेल्या भूजल सर्वेक्षण आणि विकास …

Read More »

चार वर्ष सत्तेत आहात मग राममंदीर का नाही झाले ? राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव हेमंत टकले यांचा सवाल

मुंबईः प्रतिनिधी चार वर्ष सत्तेत आहात मग कोणी थांबवलं होतं कायदा करायला आणि राममंदीर बनवायला. शिवसेना आणि भाजपचे लोक विषय संपवण्याचा विचार करत नाही तर तो विषय तसाच भिजत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत जेणेकरुन लोकांना इमोशनल ब्लॅकमेल करता येईल असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सचिव आमदार हेमंत टकले यांनी …

Read More »

दुर्गम भाग आणि झोपडपट्ट्यांसाठी ‘फिरते दवाखाने मुंबईसाठी ५ फिरते दवाखाने, एकुण १० फिरत्या दवाखान्यांचे लोकार्पण

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील दुर्गम भागात तसेच शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये आता फिरत्या दवाखान्यांमधून आरोग्य सेवा पुरवली जाणार आहे. ‘फिरते वैद्यकीय उपचार केंद्र’ (Mobile Medical Unit) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशा १० फिरत्या वैद्यकीय वाहनांचे आज उद्धव ठाकरे यांच्या हस्ते तर राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते …

Read More »

देशात चार वर्षात सव्वा कोटी घरांची निर्मिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिपादन

शिर्डी : प्रतिनिधी देशातील बेघरांना सन 2022 पर्यंत सर्वांसाठी घर देण्याचा संकल्प सरकारने केला असून गेल्या 4 वर्षात सव्वा कोटी घरांची मुलभूत सोईसुविधांसह निर्मिती करण्यात आली असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. शिर्डी येथे साई समाधी शताब्दी सोहळ्याचा समारोप, संस्थानच्या विविध प्रकल्पाचे भूमिपूजन, राज्यातील अडीच लाख घरकुलांच्या लाभार्थींना घरकुलाच्या …

Read More »

राज्यात भाजपला एकहाती विजय मिळणे अवघड रा.स्व.संघाच्या सर्वेक्षणात माहिती पुढे

मुंबईः प्रतिनिधी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीला काही महिन्यांचा कालावधी शिल्लक राहीलेला आहे. या निवडणूकीत २०१४ ची पुनरावृत्ती होणार की विरोधी असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेचा सोपान मिळणार याची चाचपणी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाला लागली आहे. त्यादृष्टीने संघाने सुरु केलेल्या सर्वेक्षणात विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात भाजपचा उधळलेला वारू रोखला जाणार असल्याची …

Read More »