मुंबई : प्रतिनिधी राज्यात जरी भाजप आणि शिवसेना युतीचे सरकार असले तरी भाजपवर जाहीर टीका करण्याची एकही संधी शिवसेनेकडून सोडली जात नाही. त्यातच आता कोकणातील नाणार प्रकल्पावरून शिवसेनेने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संघर्षाची भूमिका घेतली आहे. मात्र विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या ६ जागांसाठी पुढील महिन्यात निवडणूक होत असताना शिवसेना …
Read More »प्रियंका चोप्रा बनली नंबर वन! स्कोर ट्रेंड्स इंडियावर नंबर वन बनली
मुंबई : प्रतिनिधी अभिनेत्री प्रियांका चोप्राची सध्या चांगलीच चलती आहे. हिंदी सिनेसृष्टीसोबतच हॅालिवुड आणि अमेरिकन वाहिन्यांवरील शोमुळे प्रियांकाचं नाव सध्या जगभराता गाजत आहे. अशातच प्रियांकाने स्कोर ट्रेंड्स इंडियावरही बाजी मारली आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियावर प्रियांका नंबर वन बनली आहे. भारतीय सिनेसृष्टीतील अंतरराष्ट्रीय आयकन प्रियंका नेहमीच दर्जेदार काम करते. त्यामुळेच तिची …
Read More »६ जागांपैकी ३ जागा देणार असेल तरच राष्ट्रवादीशी आघाडी लातूरची जागा न देण्याबाबत काँग्रेस ठाम
मुंबई : प्रतिनिधी विधान परिषदेतील स्थानिक प्राधिकारी संस्था अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थामधून निवडूण आलेले ६ सदस्य निवृत्त होत आहेत. या निवृ्त्त सदस्यांमुळे रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक जाहीर झालेली आहे. मात्र या निवडणूकीत काँग्रेसबरोबर आघाडी करण्याचे जाहीर करत राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या कोट्यातील रिक्त होणाऱ्या तीन जागांबरोबरच चवथी जागा काँग्रेसकडे मागितली आहे. …
Read More »अखेर भाजपमध्ये उपेक्षित असलेल्या माधव भांडारी यांना मिळाला मंत्री पदाचा दर्जा महाराष्ट्र राज्य पुर्नवसन प्राधिकरणाच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती
मुंबई : प्रतिनिधी गेली अनेक वर्षे कोणत्याही पदाची अपेक्षा न बाळगता भारतीय जनता पार्टीचे इमाने इतबारे काम करणाऱ्या पक्षाचे प्रवक्त माधव भांडारी यांना दोन वेळा आमदारकीची हुलकावणी मिळाल्यानंतर अखेर मंत्री पदाचा दर्जा मिळाला आहे. विशेष म्हणजे त्यांना महाराष्ट्र राज्य पुर्नवसन प्राधिकरण तथा राज्य पुर्नवसन व पुर्नस्थापना संनियंत्रण समितीच्या उपाध्यक्ष पदी …
Read More »सण-सुद आणि सुट्टीच्या काळात प्रवाशांची होणारी लुबाडणूक थांबणार खासगी प्रवासी वाहनांच्या अमर्याद भाडेवाढीवर नियंत्रण आणण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा
मुंबई : प्रतिनिधी गर्दीच्या हंगामाच्या काळात राज्यातील खासगी प्रवासी वाहने (बस, ट्रॅव्हल्स इत्यादी) त्यांच्या तिकीटदरात मोठ्या प्रमाणात अवाजवी वाढ करतात. मोठ्या गर्दीच्या काळात ही वाढ अनेकपट असते. यामुळे प्रवाशांची होणारी लुबाडणूक थांबविण्यासाठी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार खासगी वाहनांचे भाडेदर निश्चित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यानुसार या खासगी कंत्राटी वाहनांना आता …
Read More »दिव्यांगाना नवा आपलं साथीदार देणारा कार्यक्रम दिव्यांग वधू-वर मेळाव्याचे अनामप्रेममध्ये आयोजन
अहमदनगर : प्रतिनिधी स्नेहालय संचलित अनामप्रेम या संस्थेच्यावतीने महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या दिव्यांगांसाठी वधू-वर मेळावा येत्या शनिवार २८ एप्रिल २०१८ रोजी सकाळी १० ते ४ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. सर्व प्रकारच्या दिव्यांगासाठी असणारा हा मेळावा निंबळक गाव येथील स्नेहालयच्या सत्यमेव जयते ग्राम या प्रकल्पात होणार आहे. या मेळाव्यात संपूर्णतः मोफत प्रवेश …
Read More »१० वीच्या पुस्तकातील तो नकाशा नाहीच तर ती केवळ प्रतिमा पाठ्यपुस्तक मंडळाचा खुलासा
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक आणि संशोधन मंडळाने १० वीच्या तयार केलेल्या पाठ्यपुस्तकात जम्मू काश्मीरचा जो नकाशा दाखविण्यात आला त्यामधील बराचसा भाग देशाच्या सीमेबाहेर दाखविण्यात आल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला. त्यास तात्काळ पाठ्यपुस्तक मंडळाने त्यावर तात्काळ खुलासा करत तो नकाशा नसून अद्यावयत तंत्रज्ञानाने तयार केलेली …
Read More »मुंबई क्रिकेट असोसिएशनने आधी भाडेपट्टा करारातील वाद मिटवला तरच परवानगी वाद मिटल्यावर माऊंड गॅलरी बांधण्यास एमएमआरडीए परवानगी देणार
मुंबई : प्रतिनिधी मुंबई क्रिकेट असोसिएशन अर्थात एमसीएने जमिन देताना करण्यात आलेल्या भाडेपट्टा करारातील नियमांचे मोठ्या प्रमाणात उल्लघंन केले आहे. त्यासंदर्भात वाद आहेत. हे वाद पहिल्यांदा मिटवावेत त्यानंतर जी ब्लॉकमधील दिलेल्या जमिनीवर माऊंड गँलरी बांधण्यास परवानगी देणार असल्याचे एमसीएचे अध्यक्ष तथा मुंबई भाजपचे अध्यक्ष अँड.आशिष शेलार यांच्या एमसीएला दिले आहेत. …
Read More »महाराष्ट्रातील १५ उद्योग संस्थांना राष्ट्रीय सुरक्षा पुरस्कार गोदरेज, शापूरजी पालनजी, सुप्रीम पेट्रोकेम, कृष्णा यासह अनेक संस्थांचा समावेश
नवी दिल्ली : प्रतिनिधी बांधकाम, उत्पादन , सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्रात सुरक्षा विषयक उत्कृष्ट कार्य करणा-या महाराष्ट्रातील १५ उद्योग संस्थांना राष्ट्रीय सुरक्षा पुरस्काराने केंद्रीय उद्योग राज्यमंत्री संतोष गंगवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय सुरक्षितता परिषदेच्या वतीने देण्यात येणा-या सुरक्षा पुरस्काराचे वितरण आज नवी दिल्ली येथे करण्यात आले. देशातील ७२ व्यवस्थापनांना सुरक्षा विषयक केलेल्या उल्लेखनीय कामासाठी सुरक्षा पुरस्कार …
Read More »संस्कृती कलादर्पण पुरस्काराची नामांकने जाहीर ६ मे ला होणार पुरस्कार प्रदान
मुंबई : प्रतिनिधी नाटक, दूरचित्रवाहिन्यांवरील मालिका, वृत्तवाहिन्या आदींसाठी संस्कृती कलादर्पण संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या संस्कृती कलादर्पण पुरस्कारांची नामांकने नुकतीच एका शानदार सोहळ्यात जाहीर झाली आहेत. अंधेरीतील कोहिनूर कॉन्टीनेन्टल पंचतारांकित हॉटेलमध्ये हा सोहळा पार पडला. चित्रपट विभागासाठी सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून ‘नशीबवान’, ‘रेडू’, ‘पळशिची पिटी’, ‘मांजा’ आणि ‘कॉपी’ या चित्रपटांना नामांकने मिळाली आहेत. …
Read More »
Marathi e-Batmya