Editor

टेस्ला ची वाय मॉडेल विक्रीसाठी भारतात येणार कारची किंमत ६० लाख रूपयांपासून किंमतीला सुरुवात

टेस्लाने जुलै २०२५ मध्ये बाजारात पदार्पण केल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच भारतात त्यांच्या मॉडेल वाय Y ची डिलिव्हरी अधिकृतपणे सुरू केली आहे, जी एक महत्त्वाचा टप्पा आहे. कंपनीने २९ सप्टेंबर रोजी मॉडेल वाय Y ची डिलिव्हरी सुरू झाल्याची घोषणा केली, परंतु विक्री किंवा डिलिव्हरी आकडे जाहीर केले नाहीत. मॉडेल वाय Y, …

Read More »

एलिना व्हॅल्टोनन यांची स्पष्टोक्ती, युरोपियन युनियनला भारतासोबत आणखी व्यापार करायचाय अमेरिकेच्या दाबावाला न जुमानता भारताबरोबर व्यापार करण्यावर दिला भर

युरोप भारतावरील कर कमी करण्याचा आणि द्विपक्षीय व्यापार वाढवण्याचा विचार करत आहे, असे फिनलंडच्या परराष्ट्र मंत्री एलिना व्हॅल्टोनन यांनी म्हटले आहे. वॉशिंग्टनच्या वारंवार विनंतीला न जुमानता, रशियाची ऊर्जा खरेदी करण्यासाठी नवी दिल्लीवर दुय्यम कर लादण्याची शक्यता नाकारली आहे. एलिना व्हॅल्टोनन पुढे बोलताना म्हणाल्या की, “आता, आम्ही भारतासोबत जे करण्यास उत्सुक …

Read More »

कॅनडा सरकारने बिष्णोई गँगला ठरवले दहशतवादी आंतरराष्ट्रीय स्तरावर खून, खंडणी, शस्त्रास्त्रे आणि अंमली पदार्थाच्या व्यापारात गुंतल्याने दहशतवादी म्हणून जाहीर

कन्झर्व्हेटिव्ह आणि एनडीपी राजकारण्यांच्या आवाहनानंतर सार्वजनिक सुरक्षा मंत्री गॅरी आनंदसांगरी यांनी सोमवारी जाहीर केले की, भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खून, खंडणी, शस्त्रास्त्रे आणि अंमली पदार्थांच्या तस्करीत अडकलेल्या लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्या गुन्हेगारी नेटवर्कला कॅनडाच्या सरकारने अधिकृतपणे दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. “बिश्नोई गँगने विशिष्ट समुदायांना दहशतवाद, हिंसाचार आणि धमकी …

Read More »

शिंदे शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले पूर परिस्थितीत नागरिकांना मदतीच्या नावाखाली गेल्या अन् जिल्हाधिकाऱ्यांकडूनच शहाणपण शिकल्या

सोलापूर येथील सीना नदीला पूर आल्याने माढा, मोहोळ, उत्तर  सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावांना पुराचा चांगलाच फटका बसला. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे नेते पूरग्रस्त भागाचा दौरा करत आहेत. अशातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. त्यावेळी गावकऱ्यांच्या व्यथा ऐकून ज्योती वाघमारे यांनी थेट …

Read More »

शंभुराज देसाई यांची माहिती, पर्यटन विभागाच्या १४ लोकसेवा अधिसूचित 'महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५' नुसार सेवा वेळेत देणे बंधनकारक

महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने ‘महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५’ अंतर्गत पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिपत्याखालील पर्यटन संचालनालय, मुंबई आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, मुंबई यांच्यामार्फत पात्र व्यक्तींना पुरविण्यात येणाऱ्या एकूण १४ लोकसेवा अधिसूचित केल्या आहेत. या सेवांसाठी नियत कालमर्यादा, पदनिर्देशित अधिकारी, प्रथम आणि द्वितीय अपील प्राधिकारी निश्चित करण्यात आले असल्याची माहिती पर्यटन मंत्री …

Read More »

डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, अमेरिकेबाहेरील चित्रपटांवर १०० टक्के टॅरिफ परदेशात तयार करण्यात आलेल्या सर्व चित्रपटांवर टॅरिफ

अमेरिका देशाबाहेर बनवल्या जाणाऱ्या सर्व चित्रपटांवर १००% कर आकारण्यास पुढे जाईल, असे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी ट्रुथ सोशलवरील एका पोस्टमध्ये पुष्टी केली. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की अमेरिकन चित्रपट व्यवसाय परदेशातील स्पर्धकांनी ताब्यात घेतला आहे. “आमचा चित्रपट निर्मिती व्यवसाय अमेरिकेतून, इतर देशांनी चोरला आहे, जसे ‘बाळाकडून कँडी’ चोरली जाते,” असे …

Read More »

बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ २० ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार

राज्यातील  अतिवृष्टीचे संकट आणि  पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इयत्ता   बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा  अर्ज भरण्यास २० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य परीक्षा मंडळाने घेतला आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना दूरध्वनी करून मुदतवाढ देण्याबाबत निर्देश दिले होते. फेब्रुवारी -मार्च महिन्यात होऊ घातलेल्या  बारावीच्या विद्यार्थी-विद्यार्थीनींना परीक्षा अर्ज …

Read More »

मंगल प्रभात लोढा यांची माहिती, ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद‌्घाटन राज्यातील ७५ हजार प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून प्रतिवर्षी ७५,००० प्रशिक्षणार्थींना ‘ मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रमातून प्रशिक्षित करण्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने निश्चित केले आहे. ९ ऑक्टोबर २०२५ पासून राज्यातील ४१९ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) व १४१ शासकीय तांत्रिक विद्यालयामधून एकूण २,५०६ तुकड्या सुरू होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते …

Read More »

आशिष शेलार यांची माहिती, सामाजिक- राजकीय आंदोलनाच्या ७७ खटल्यांना दिलासा मंत्रिमंडळ उपसमितीची बैठकीत घेतला निर्णय

राज्यातील धार्मिक, राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान पोलिसांकडे दाखल करण्यात आलेल्या २०१ अर्जदारापैकी ७७ अर्जदारांवरील खटले मागे घेण्याबाबत शासनाने नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीने शिफारस केली आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य, माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिली. राज्यातील राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल करण्यात आलेले खटले मागे घेण्याबाबत शासनाने नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक सह्याद्री अतिथीगृहात …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन, रा. स्व. संघाने प्रतिगामित्वामध्ये लपलेल्या त्यांच्या दहा तोंडांचे दहन करावे राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी देणारा विचार रा. स्व. संघाच्या काळ्या टोपीचा; राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आमचे निवेदन जाहिरपणे सांगितलेले आहे. निसर्ग, नियती त्यांना सुबुद्धी देवो ही प्रार्थना करत आहे. दसऱ्याला रावणाचे दहन केले जाते ते एका व्यक्तीचे नाही तर प्रवृत्तीचे दहन असते. संघाची दहा तोंडे दहा दिशेनेच नाही तर सर्व प्रतिगामित्वामध्ये दडलेली आहेत त्याचा धिक्कार व दहन करावे अशी आमची अपेक्षा आहे असे …

Read More »