Editor

अंधेरीतील पटेल नगर मध्ये म्हाडाच्या माध्यमातून सामुहिक पुनर्विकास प्रकल्प ४ हजार ९७३ सदनिकांच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव

मुंबईतील अंधेरी येथील सरदार वल्लभाई पटेल (एस.पी.व्ही. नगर) मधील वसाहतीमध्ये ४९८ भुखंडांवरील सुमारे ४ हजार ९७३ सदनिकांच्या पुनर्विकासाचा प्रकल्प म्हाडाच्या माध्यमातून राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमीं देवेंद्र फडणवीस होते. अंधेरी (पश्चिम) येथील या भुखंडाचे जागतिक बँकेच्या प्रकल्पांतर्गत सन १९९३ मध्ये वाटप करण्यात आले होते. …

Read More »

मंत्रिमंडळाचा निर्णयः बेकायदेशीर जाहिरात फलक प्रकरणी एका महिन्यात कारवाईचे आदेश घाटकोपर बेकायदेशीर जाहिरात फलक दुर्घटनेच्या उच्च स्तरीय चौकशी समितीचा अहवाल स्विकारला

मुंबईमधील घाटकोपर येथे बेकायदेशीर फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या उच्च स्तरीय चौकशीसाठी स्थापन न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल शिफारशींसह स्वीकारण्यास. तसेच समितीचे निष्कर्ष, व सुचविलेल्या उपाययोजनांवर करावयाच्या अंलबजावणीस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. यावर संबंधित विभागांना एक महिन्याच्या मुदतीत कार्यवाही करण्याचे …

Read More »

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, ५ लाख रुपयांहून अधिक खर्चाच्या दुर्धर ९ आजारांवरील उपचारांसाठी निधी मिळणार जन आरोग्य योजनांच्या दाव्यांतून मिळणाऱ्या राखीव निधीचा आरोग्य हमी सोसायटीकडून विनियोग

विस्तारित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत रुग्णांच्या दाव्यापोटी मिळणाऱ्या रक्कमेचा विनियोग राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या राखीव निधीसाठी तसेच शासकीय रुग्णालयांच्या सक्षमीकरणासाठी केला जाणार आहे. तसेच गरजू रुग्णांसाठी ५ लाखांपेक्षा जास्त खर्च असणाऱ्या ९ प्रकारच्या दुर्मिळ आजारांवरील खर्च राखीव निधीतून केला जाणार आहे. …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करुन सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या शेतकरी मोठ्या संकटात असताना सरकारच्या फक्त कोरड्या गप्पा; पंचनामे व सर्वे सोडा आणि तात्काळ मदत करा

राज्यात यावर्षी सरसरीपेक्षा दुप्पट, तिप्पट पाऊस पडला आहे. ३६ जिल्हे व ३५८ तालुक्यापैकी ३० जिल्हे व जवळपास ३०० तालुके अतिवृष्टी आणि पूरग्रस्त आहेत. राज्यभरात जवळपास १४३ लाख हेक्टरवरील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. पाऊस सातत्याने पडत असून शेतकरी हवालदिल झाला आहे परंतु राज्यातील महायुती सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही, पालकमंत्र्याने पाहणी सुद्धा केली …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्राकडे प्रस्ताव सादर केंद्राकडे प्रस्ताव सादर, मदतीसाठी राज्य मागे हटणार नाही

अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून राज्य सरकारने तातडीच्या मदतीसाठी यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत केली आहे. राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी असून घरे, शेती आणि जनावरांचे जिथे नुकसान झाले आहे तिथे आवश्यक त्या ठिकाणी निकषामध्ये शिथिलता आणून मदत केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी दिली. अतिवृष्टीमुळे …

Read More »

जुलै-ऑगस्ट मधील १९.२२ आपदग्रस्त शेतकऱ्यांसाठी १ हजार ३३९ कोटींच्या मदतीस मान्यता मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांची माहिती

राज्यात जुलै व ऑगस्ट २०२५ या महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या १९ लाख २२ हजार ९०९ शेतकऱ्यांच्या १५ लाख ४५ हजार २५०.०५ हेक्टरवरील शेत पिकाच्या नुकसानीपोटी १ हजार ३३९ कोटी ४९ लाख २५ हजाराच्या मदतीस मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली. …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस डेटा सेंटरचे दूरदृश्य प्रणालीद्वारे भूमिपूजन ॲमेझॉनच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून राज्याच्या प्रगतीला हातभार

महाराष्ट्र हे गुंतवणुकदारांसाठी देशाचे आकर्षण आहे. स्वित्झर्लंड मधील दावोस येथे झालेल्या जागतिक अर्थ परिषदेतही महाराष्ट्राने सर्वाधिक गुंतवणूक आणली. या परिषदेतच ॲमेझॉनने राज्यात ‘ क्लाऊड इन्फ्रास्ट्रक्टर’ क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याचा सामंजस्य करार केला होता. त्यानुसार ॲमेझॉन गुंतवणूक करीत आहे. यापुढेही राज्याच्या प्रगतीमध्ये ॲमेझॉन कंपनीची गुंतवणूक महत्त्वाची ठरणार असून कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून राज्याच्या प्रगतीला …

Read More »

नरेंद्र पाटील यांची माहिती, मराठा समाजाच्या उन्नतीसाठी झटणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार २५ सप्टेंबर रोजी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने सत्कार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने मराठा समाजाच्या उन्नतीसाठी मोठे कार्य केले, अनेक महत्वाचे निर्णय घेतले आणि समाजोपयोगी योजना आखून त्यांना प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना मानाने प्रस्थापित करण्याचे मोलाचे काम केले आहे. या कार्याची दखल घेत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातर्फे स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या ९२ व्या जयंतीदिनी २५ सप्टेंबर …

Read More »

शिवेंद्रसिंह भोसले यांची माहिती, तळेगाव ते शिक्रापूर महामार्ग दुरुस्ती व रुंदीकरणासाठी ५९.७५ कोटीस मान्यता अपघात कमी होऊन वाहतुकीस मोठा दिलासा

तळेगाव –चाकण–शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८ डी (माजी राज्य महामार्ग ५५) कि.मी. ०/०० ते कि.मी. ५४/०० या मार्गाच्या दुरुस्ती व रुंदीकरणासाठी एकूण ₹५९.७५ कोटी निधीस मान्यता देण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांनी दिली आहे. तसेच या निर्णयामुळे तळेगाव–चाकण–शिक्रापूर मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होईल, अपघातांचा धोका टळेल तसेच औद्योगिक वाहतुकीला …

Read More »

अजित पवार यांचे आदेश, रांजणगाव, कारेगाव, ढोकसांगवीसह हिवरे ग्रामपंचायतींचे प्रश्न मार्गी लावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या प्रश्नांवर बैठक

पुणे जिल्ह्यातील रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीची मूळ लोकसंख्या केवळ अकरा हजार इतकी आहे. मात्र लगतच्या एमआयडीसी क्षेत्रामुळे येथे स्थलांतरित लोकसंख्या तब्बल दोन लाखांवर पोहोचली आहे. या वाढलेल्या लोकसंख्येमुळे ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा, जलनिस्सारण, रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांवर प्रचंड ताण येत आहे. त्यामुळे या भागातील पायाभूत सुविधांचे प्रश्न सोडविण्यासह गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तातडीने आवश्यक …

Read More »