नरेंद्र पाटील यांची माहिती, मराठा समाजाच्या उन्नतीसाठी झटणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार २५ सप्टेंबर रोजी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने सत्कार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने मराठा समाजाच्या उन्नतीसाठी मोठे कार्य केले, अनेक महत्वाचे निर्णय घेतले आणि समाजोपयोगी योजना आखून त्यांना प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना मानाने प्रस्थापित करण्याचे मोलाचे काम केले आहे. या कार्याची दखल घेत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातर्फे स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या ९२ व्या जयंतीदिनी २५ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांचा सत्कार केला जाणार असल्याची माहिती अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी मंगळवारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  फडणवीस यांनी पुनर्स्थापना केलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत देण्यात आलेल्या कोट्यवधींच्या अर्थसहाय्यामुळे दीड लाख मराठा उद्योजक बनले असल्याची माहितीही त्यांनी दिली.

यावेळी नरेंद्र पाटील म्हणाले की, काँग्रेस राजवटीत मराठा समाजाला विस्थापित करण्याचे काम करण्यात आले तर फडणवीस यांनी मराठा समाजातील युवा पिढीला व्यवसाय उद्योगांसाठी सर्वाधिक निधी, तसेच  योजना आखून त्यांना उद्योजक बनण्याची संधी दिली. फडणवीस यांनी २०१६ पासून मराठा समाजाच्या हिताचे काम करत स्व. अण्णासाहेबांचे मराठा समाजाच्या सर्वांगीण उन्नतीचे स्वप्न पूर्णत्वास नेले या शब्दांत नरेंद्र पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्याची प्रशंसा केली.

पुढे बोलताना नरेंद्र पाटील म्हणाले की, राज्यात सर्वाधिक काळ काँग्रेसची राजवट होती मात्र तत्कालिन काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला केवळ पोकळ आश्वासने दिली . महामंडळाला मिळालेल्या निधीची आकडेवारी समोर ठेवत महायुती सरकार आणि मविआ, काँग्रेस सरकार यांच्या काळात महामंडळाला मिळालेल्या निधीची तुलना केली. अण्णासाहेब पाटील महामंडळासाठी १९९९ ते २०१४ या काळात काँग्रेस – राष्ट्रवादी सत्तेत असताना  केवळ ५० कोटींची तरतूद होती. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर ही तरतूद  २०१८-२०१९ दरम्यान १०० कोटींपर्यंत गेली. मात्र उद्धव ठाकरेंचे मविआ सरकार सत्तेत असताना ५० कोटी जाहीर केले मात्र प्रत्यक्षात तोंडाला पाने पुसली गेली. नंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना १०० कोटींनी तरतूद वाढवण्यात आली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर तब्बल ३०० कोटी, नंतर २४-२५ ला ४००कोटी आणि पुढच्या अर्थसंकल्पात तब्बल ७५० कोटी प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती दिली.

पुढे बोलताना नरेंद्र पाटील म्हणाले की, महामंडळामार्फत कोट्यवधी रुपयांचे अर्थसहाय्य वितरित करून हजारो तरुणांना आणि गटांना उद्योजकतेची नवी संधी दिली आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत जवळपास १३ हजार २५० कोटींचे कर्ज मराठा युवा उद्योजकांना दिले आहे. महायुती सरकारच्या आवाहनाला अनुसरून बँकांनी महामंडळावर आणि मराठा युवा उद्योजकांवर विश्वास ठेवत कर्ज दिले. जवळपास १३०० कोटींचा व्याज परतावा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्य सरकारने दिला आहे .

About Editor

Check Also

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांची माहिती, एकल महिला धोरणासाठी मसुदा समिती गठीत विधवा, परित्यक्ता, घटस्फोटीत आणि अविवाहीत महिलासांठीचे धोरण

राज्यातील एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक व कायदेविषयक प्रश्नांचा सर्वंकष विचार करून त्यांना विविध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *