जम्मू-काश्मीरबाबतच्या भारताच्या दीर्घकालीन भूमिकेचे जोरदार समर्थन करत, अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी बुधवारी श्रीनगरला दिलेल्या आपल्या पहिल्या भेटीदरम्यान या केंद्रशासित प्रदेशाचे वर्णन “भारताचा एक महत्त्वाचा भाग” असे केले. कलम ३७० रद्द झाल्यानंतर आणि पहलगाम येथील हल्ल्यानंतर एखाद्या अमेरिकन दूताची या केंद्रशासित प्रदेशाला दिलेली ही पहिलीच स्वतंत्र भेट होती; या भेटीदरम्यान …
Read More »राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे ९ निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे निर्णय
आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होते. या बैठकीत पुण्यात होणार युसीआय रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप-२०३२ स्पर्धा आयोजनाला शासनाचे पाठबळ, जायकवाडी प्रकल्प टप्पा – २ साठी ६ हजार ४७७ कोटी, गौण खनिजांचे स्वामीत्वधनाचे अनावश्यक खटले कमी होणार, सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये ट्रेडस प्लॅटफॉर्म प्रणालीचा वापर, गडचिरोली जिल्हा क्रीडा …
Read More »विधानमंडळ सदस्यांच्या स्वीय सहाय्यक आणि वाहनचालकांच्या मानधनात वाढ संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती
महाराष्ट्र विधानमंडळाच्या विद्यमान सदस्यांच्या स्वीय सहाय्यक आणि वाहनचालकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार स्वीय सहाय्यकांचे मासिक मानधन ३० हजार रुपयांवरून ४० हजार रुपये, तर वाहनचालकांचे मासिक मानधन २० हजार रुपयांवरून ३० हजार रुपये करण्यात आले आहे. ही वाढ १ ऑगस्ट २०२६ पासून लागू करण्यात आली असल्याची माहिती …
Read More »प्रकाश आबिटकर यांची माहिती, सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित सर्पदंशावरील उपचार व्यवस्था अधिक सक्षम करणार
राज्यातील सर्पदंशाच्या घटनांमुळे होणारे मृत्यू आणि अपंगत्व रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने महत्वाचे पाऊल उचलले असून सर्पदंशाला ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील शासकीय, खासगी रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये आणि वैद्यकीय व्यवसायिकांना सर्पदंशाच्या प्रत्येक संशयित, संभाव्य किंवा निश्चित घटनेची आणि सर्पदंशामुळे झालेल्या मृत्यूची नोंद संबंधित आरोग्य प्राधिकरणाकडे करणे बंधनकारक …
Read More »राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारमध्ये महाराष्ट्राचा गौरव २०२५ चे पुरस्कार केंद्र सरकारकडून जाहिर
केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाने जाहीर केलेल्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२५ मध्ये महाराष्ट्राने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर विदित संतोष गुजराती आणि ग्रँडमास्टर दिव्या जितेंद्र देशमुख यांना अर्जुन पुरस्कार, नेमबाजी प्रशिक्षक नेहा नंदकुमार चव्हाण यांना द्रोणाचार्य पुरस्कार, तर पुणे येथील आर्मी पॅरालिम्पिक नोड संस्थेला राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार मीरा भाईंदर ते वसई-विरार मेट्रो मार्ग १३ आणि पुणे रिंगरोडच्या विस्तारीकरणास पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता
मुंबई महानगरप्रदेशातील वाहतुकीला चालना देण्यासाठी मेट्रो १३ -मिरा भाईंदर ते वसई विरार या प्रकल्पास तसेच पुणे शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महत्वाचा ठरणाऱ्या पुणे रिंगरोडच्या सोरतापवाडी ते वरवे – शिवरे मार्गास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा …
Read More »वर्षा गायकवाड यांची मागणी, एसआयआर नोंदणी, रोल बॅक व दावे हरकतीसाठी कालावधी वाढवून द्या ‘शहरी नक्षलवादी’, ‘दिमागी नक्षलवादी’, असे शब्द पंतप्रधानांच्या तोंडी येतातच कसे? देशाचे भविष्य असलेले विद्यार्थी दिमागी नक्षलवादी आहेत का?
महाराष्ट्रात पुढील तीन वर्षांत कोणत्याही निवडणुका होणार नाहीत, असे असताना निवडणूक आयोग ‘एसआयआर’ (SIR) प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इतकी घाई का करत आहे? मुंबईतील प्रत्येक नागरिकाचे नाव योग्यरित्या नोंदवले जाईपर्यंत ही प्रक्रिया सुरुच ठेवली पाहिजे. मतदान हा प्रत्येकाचा घटनात्मक अधिकार आहे आणि तो हिरावून घेण्याचा अधिकार कोणालाही नाही, त्यामुळे १७ ऑगस्टची …
Read More »ओपनएआयचे प्रमुख सॅम ऑल्टमन म्हणाले, एआय आणि चॅटजीपीटी सर्व लक्षात ठेवेल ई-मेल लिहिणे, सारांश तयार करणे आदी गोष्टी करणार सहा महिन्यातील कामे लक्षात ठेवेल
ओपनएआयचे (OpenAI) सीईओ सॅम ऑल्टमन यांनी संकेत दिले आहेत की त्यांचे एआय (AI), चॅटजीपीटी (ChatGPT), पुढील सहा महिन्यांत कुठे पोहोचू शकते. त्यांनी जे उघड केले आहे ते, ईमेल लिहिणे किंवा एखाद्या दस्तऐवजाचा सारांश तयार करणे यांसारख्या पारंपरिक एआयच्या कार्यापेक्षा अधिक वैयक्तिक वाटते. झेड फेलोचे (Z Fellow) संस्थापक कोरी लेव्ही यांच्यासोबतच्या …
Read More »पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, उपचारासाठी इम्रान खान यांना रूग्णालयात हलवा तातडीने वैद्यकीय उपचार करण्यासाठी खाजगी रुग्णालयात हलविण्याचे आदेश
पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी, तीन वर्षांहून अधिक काळ तुरुंगात खितपत पडलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांना वैद्यकीय उपचारांसाठी इस्लामाबादमधील एका खासगी रुग्णालयात तातडीने हलवण्याचे आदेश दिले. त्यांच्या प्रकृतीबद्दल वाढती चिंता आणि विश्वचषक विजेते माजी कर्णधार मृत्यूच्या दारात असल्याच्या सततच्या अफवांच्या पार्श्वभूमीवर, हा एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे. सरकारचा आक्षेप फेटाळून लावत, …
Read More »तामीळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय किती तास काम करतात माहित आहे का? १८ ते २० तास काम पहिला फोन कॉल पहाटे चार वाजता
तामिळनाडूचे सुपरस्टार-राजकारणी जोसेफ विजय यांनी आपल्या पहिल्याच निवडणुकीत आश्चर्यकारक राजकीय विजय मिळवून मुख्यमंत्री म्हणून आपल्या कार्यकाळात १०० दिवस पूर्ण केले आहेत. तर, या महत्त्वाच्या पदावर त्यांनी कशी कामगिरी केली आहे? त्यांचे जवळचे सहकारी आणि मंत्री, आधव अर्जुन, यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यशैलीवर प्रकाश टाकला आहे. अर्जुन यांच्या मते, विजय दिवसातून जवळपास २० …
Read More »
Marathi e-Batmya