मध्यपूर्वेतील युद्ध स्थितीच्या पार्श्वभूमीवर, ऊर्जा क्षेत्रात भारतासाठी आणखी एक दिलासादायक बातमी आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, तेहरानमधील युद्धामुळे निर्माण झालेली ऊर्जेची टंचाई कमी करण्यासाठी अमेरिकेने इराणवरील निर्बंध तात्पुरते उठवल्यानंतर, भारतीय तेल शुद्धीकरण कंपन्या इराणकडून कच्च्या तेलाची खरेदी पुन्हा सुरू करण्याची योजना आखत आहेत. तेहरानने महत्त्वपूर्ण होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी जहाजांची वाहतूक रोखण्यासाठी …
Read More »अभिनेते प्रकाश राज यांची धुरंधर-२ वरून अल्लु अर्जून, ज्यु एनटीआर, राम चरण वर टीका बॉलीवूडमधील लोन आता दक्षिणेतही पसरतेय
दिग्दर्शक आदित्य धार यांच्या हेरगिरी-थ्रिलर धुरंधर: द रिव्हेंजची खिल्ली उडवत अभिनेता प्रकाश राज यांनी एक गुप्त व्हिडिओ शेअर केला आहे. अभिनेता अल्लू अर्जुन, राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांच्यावर चित्रपटाची स्तुती करण्यासाठी टीका करत त्यांनी सोशल मीडिया पोस्ट देखील रीशेअर केली. प्रकाश राज यांनी शेअर केलेल्या X पोस्टमध्ये, देव आनंद …
Read More »सार्वजनिक आरोग्य विभागाचा सीआयएफएफ सोबत सामंजस्य करार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने सामंज्यस करार
लोककेंद्रित व अधिक परिणामकारक सार्वजनिक आरोग्य कार्यक्रम राबविण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने चिल्डरेन्स इन्व्हेस्टमेंट फंड फौंडेशन (सीआयएफएफ), युनायटेड किंगडम सोबत सामाजिक व वर्तन बदल संप्रेषण उपक्रम बळकट करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे. राज्यातील राष्ट्रीय आरोग्य उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या करारासाठी …
Read More »एपस्टिन फाईल प्रकरणी काँग्रेस-‘वंचित’चा रा. स्व. संघाच्या नागपूरच्या मुख्यालयावर मोर्चा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात धडक मोर्चा
एपस्टिन फाईलमध्ये आलेला नरेंद्र मोदींच्या नावाचा उल्लेख व अमेरिकेशी तडजोड करणारे नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदावर कायम का ठेवले? याचा जाब विचारण्यासाठी सोमवारी २३ मार्च रोजी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी व समविचारी पक्षांचा संयुक्त मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे. नागपुरातील संविधान चौक ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयापर्यंत हा धडक मोर्चा काढण्यात …
Read More »युद्धात सहकार्य करत नसल्यावरून डोनाल्ड ट्रम्प यांची नाटो संघटनेवर टीका नाटोला भित्रे म्हणून केली टीका
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी इराणविरुद्धच्या अमेरिका-इस्रायल युद्धात पाठिंबा न दिल्याबद्दल नाटो मित्र राष्ट्रांवर तीव्र टीका केली आणि अमेरिकेचे दीर्घकाळचे मित्रराष्ट्र असलेल्या या देशांना “भित्रे” म्हटले. ट्रुथ सोशलवरील एका पोस्टमध्ये डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “अमेरिकेशिवाय नाटो म्हणजे कागदी वाघ आहे!” त्यांनी सदस्य राष्ट्रांवर “अणुशक्तीवर चालणाऱ्या इराणला” रोखण्यासाठीच्या लढाईत सामील होण्यास …
Read More »देशभरात प्रीमियम अर्थात स्पीड आणि एक्सपी95 पेट्रोलच्या दरात वाढ इंडियन ऑईल आणि हिंदुस्थान पेट्रोलियमने केली वाढ
देशभरात नियमित पेट्रोल आणि डिझेलचे दर अपरिवर्तित असताना, प्रीमियम पेट्रोलच्या दरात प्रति लिटर सुमारे २ ते २.३ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. निवडक शहरांमधील डीलर्सकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, ही दरवाढ इंडियन ऑइलच्या XP95 आणि हिंदुस्तान पेट्रोलियमच्या पॉवर पेट्रोलसारख्या हाय-ऑक्टेन इंधनांना लागू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुधारित दर आजपासून लागू झाले आहेत. …
Read More »संजय राऊत म्हणाले की, खरातावरील कारवाई कौतुकास्पद, आता चाकणकरांवर कारवाई करा शिवसेना उबाठाचे संजय राऊत यांनी केली मागणी
भोंदुबाबा कॅप्टन अशोक खरात याच्यावर मुख्यमंत्र्यांनी केलेली कारवाई कौतुकास्पद आहे. आता रुपाली चाकणकर यांच्यांवर कारवाई करावी, अशी अपेक्षा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. संजय राऊत पुढे म्हणाले की, अशोक खरात याला पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयाने त्याला २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. भोंदु प्रकरणाची पाळेमुळे उखडून काढण्यासाठी …
Read More »सुषमा अंधारे यांचा सवाल, एकनाथ शिंदेच्या फोनचे सीडीआर तपासण्याची हिंमत गृहमंत्री दाखवणार का? भोंदू बाबा खरात प्रकऱणावरून सुषमा अंधारे यांचा सवाल
राज्याच्या राजकारणात उच्च पदावर असलेल्या नेत्यांचे भविष्य सांगणारा भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी ज्या नेत्यांचा यामध्ये संबंध आहे, त्यांचे सीडीआर तपासणी करण्याची मागणी केली ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. तसेच, एकनाथ शिंदे यांचे सीडीआर तपासण्याची हिंमत गृहखाते दाखवेल का, असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला. अशोक खरात …
Read More »तुषार गांधी यांचे आवाहन, रा. स्व. संघाच्या विचाराला महाडच्या ऐतिहासिक भूमितच गाडून टाका छत्रपती शिवाजी महाराज व महामानव डॅा. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांना जातीच्या चौकटीत बंद करू नका: उल्का महाजन
मनुवादी व्यवस्थेने जसे अनेक घटकांवर नियंत्रण ठेवले होते तसेच पाण्यावरही नियंत्रण ठेवून समाजातील एका घटकाला पाण्यापासून वंचित ठेवले होते. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ साली महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह करून ऐतिहासिक क्रांती केली. या ऐतिहासिक क्रांतीने जातीयवादी, स्पृश्य अस्पृश्य व्यवस्थेला मूठमाती देत समता, बंधुता व सामाजिक न्यायाचा संदेश …
Read More »सार्वजनिक सुट्यांच्या दिवशीही दुय्यम निबंधक कार्यालये सुरू राहणार महसूल विभागाचा निर्णय, वर्षपूर्तीच्या तोंडावर खरेदी दारांची घाई
आर्थिक वर्ष संपत येत असल्याने, तसेच नवीन वर्षानिमित्त मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांना वेग येण्याची शक्यता आणि महसूल वसुलीच्या इष्टांकाची पूर्तता करण्यासाठी राज्यातील दुय्यम निबंधक कार्यालये सार्वजनिक सुट्यांच्या दिवशीही सुरू ठेवण्याचा निर्णय नोंदणी व मुद्रांक विभागाने घेतला आहे. महाराष्ट्राचे नोंदणी उपमहानिरीक्षक (मुख्यालय) यांनी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, २६, २८, २९ आणि ३१ मार्च २०२६ या चार …
Read More »
Marathi e-Batmya