मुंबई: प्रतिनिधी सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) फेस्टिव्हल ऑफरअंतर्गत सोने तारण कर्जावरील (गोल्ड लोन ) व्याजदर कमी करण्याची घोषणा केली आहे. बँकेने सोन्याचे दागिने आणि सॉवरेन गोल्ड बॉन्डच्या बदल्यात दिल्या जाणाऱ्या एसजीबी कर्जावरील व्याज दर १.४५ टक्क्यांनी कमी केला आहे. एसजीबी कर्जावर आता ७.२० टक्के आणि सोन्याच्या दागिन्यांवर ७.३० टक्के …
Read More »स्वस्तात घर-मालमत्ता खरेदीची संधी, एसबीआयकडून मालमत्तांचा लिलाव ऑनलाईन ऑक्शन करता येणार
मुंबई: प्रतिनिधी तुम्ही स्वस्त घर घेण्याचा विचार करत असाल तर स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) तुमच्यासाठी एक खास ऑफर घेऊन आली आहे. यामध्ये ज्यामध्ये तुम्हाला स्वस्तात निवासी मालमत्ता खरेदी करण्याची संधी मिळत आहे. एसबीआय मालमत्तांचा लिलाव करणार आहे. २५ ऑक्टोबरपासून हा लिलाव सुरू होत आहे. यामध्ये तुम्हाला स्वस्तात घर खरेदी …
Read More »भाजपाच्या टोकाच्या जातीयवादाला धर्मनिरपेक्षवादाने उत्तर देवू राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ग्वाही
मुंबई: प्रतिनिधी या देशात भाजप जो टोकाचा जातीयवाद करतो आहे त्याला जातीयवादाने उत्तर नाही तर धर्मनिरपेक्षवादाने उत्तर देवू शकतो असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रदेश कार्यालयात केले. लातूर जिल्हयातील उदगीर नगरपंचायतीच्या नगरसेवकांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जाहिर प्रवेश केला. यावेळी …
Read More »व्हॉट्सअॅपवर हाय करा आणि मिळवा १० लाखांचं कर्ज अशी आहे प्रोसेस
मुंबई: प्रतिनिधी तुम्हाला १० लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची गरज असेल तर अवघ्या काही मिनिटांमध्ये तुम्हाला ते मिळेल. यासाठी फक्त तुम्हाला व्हॉट्सअॅपवर हाय म्हणावे लागेल. त्यानंतर काहीमिनिटातच तुमच्या खात्यावर १० लाख रुपये जमा होतील. भारतात प्रथमच अशा प्रकारची सुविधा नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी इंडिया इन्फोलाईन (आयआयएफएल – IIFL) ने सुरू केली आहे. कंपनीने १० लाख रुपयांचे व्यवसाय कर्ज त्वरित देण्याची योजना सुरू केली आहे. हे कर्ज तुम्हाला व्हॉट्सअॅपवर मिळेल. व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांना हे कर्ज काही मिनिटांत मिळू शकते, असे कंपनीने म्हटले आहे. कंपनीने सांगितले की, इंडिया इन्फोलाईन ही योजना सुरू करणारी देशातील पहिली कंपनी आहे. यासाठी किमान कागदपत्रांची आवश्यकता असेल. या कर्जासाठी कंपनी आर्टिफिशियल इंटेलिजेंस वापरेल. याद्वारे वापरकर्त्यांचे तपशील तपासले जातील. यातून फक्त कर्जदाराचा अर्ज आणि केवायसी पूर्ण होईल. यासह बँक खाते देखील याद्वारे व्हेरिफाय केले जाईल. या योजनेअंतर्गत तुम्ही किमान १० हजार आणि कमाल १० लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकता. तुम्हाला हे कर्ज ५ वर्षात म्हणजेच ६० महिन्यांत परत करावे …
Read More »समीर खान यांच्यावर एनसीबीने केलेल्या कारवाईवर कोर्टाचे प्रश्नचिन्ह एनसीबीसारख्या केंद्रीय यंत्रणेला गांजा आणि टोबॅको यातला फरक कळू नये ही बाब फार गंभीर-नवाब मलिक
मुंबई: प्रतिनिधी कोर्टाच्या ऑर्डरनुसार एनसीबीने गांजा जप्त केल्याच्या दाव्यात कोणतेही तथ्य नसल्याचे आढळले आहे. त्यामुळे एनसीबीने समीर खान व इतर दोघांवर एनडीपीएस कायद्याच्या २७(अ) कलमातंर्गत दाखल केलेला गुन्हा रद्दबातल ठरतो अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान एनसीबीसारख्या केंद्रीय यंत्रणेला …
Read More »फडणवीसांचा पवारांवर पलटवार, “मावळमध्ये गोळीबाराचे आदेश राज्यकर्त्यांचेच” विरोधी पक्षनेतेपदावरही समाधानी असल्याने महाविकास आघाडी अस्वस्थ, ४० वर्षांनंतर पहिल्यांदा ५ वर्ष मुख्यमंत्री
पणजी: प्रतिनिधी जालियनवाला बाग गोळीबार हा पोलिसांनी केला तरी त्यावेळी आदेश ब्रिटीशांच्या गव्हर्नर जनरल यांचे होते. अगदी तसेच मावळ गोळीबार हा पोलिसांनी केला तरी त्यांना आदेश राज्यकर्त्यांचे होते. त्यामुळे मावळ गोळीबार ही सुद्धा जालियनवाला बागसारखीच घटना आहे, असे प्रत्त्युत्तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना दिले. गोवा दौर्यावर …
Read More »एसटी बस होणार आता प्रदुषण मुक्त : या इंधनावर धावणार डिझेलवर धावणाऱ्या १ हजार गाड्यांचे सीएनजीमध्ये करणार रुपांतर- परिवहन मंत्री अनिल परब
मुंबई : प्रतिनिधी कोरोना संकटामुळे घटलेली प्रवासी संख्या आणि इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे एसटी महामंडळाच्या तिजोरीवर आर्थिक बोजा पडत आहे. महामंडळावरील आर्थिक बोजा कमी करण्यासाठी एसटी महामंडळाने आपल्या ताफ्यातील १ हजार गाड्या सीएनजीमध्ये रुपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिली. कोरोना …
Read More »राज्यात महाविद्यालये २० ऑक्टोबरपासून सुरु होणार पण या अटींच्या पूर्ततेनंतर दोन्ही डोस घेतलेले विद्यार्थी/विद्यार्थींनी प्रत्यक्ष उपस्थित राहू शकणार-उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयातील नियमित वर्ग २० ऑक्टोबर, २०२१ पासून सुरु करण्यास मान्यता देण्यात येत आहे, अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केली. ज्यांनी कोविड-१९ च्या लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत, ते विद्यार्थी/विद्यार्थीनी विद्यापीठ …
Read More »मुख्य सचिवांच्या अहवालात स्पष्ट पदोन्नतीत आरक्षण मिळाले पाहिजे आरक्षण कायम ठेवण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणार- राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
मुंबई : प्रतिनिधी पदोन्नतीमधील आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात असलेल्या विशेष अनुमती याचिका क्र. २८३०६/२०१७ मध्ये शासनाची बाजू मांडण्यासंदर्भात आज राज्य मंत्रिमंडळात चर्चा झाली. यावेळी पदोन्नतीमधील आरक्षण कायम ठेवण्याबाबत सर्वोच्च न्यायालयातील या याचिकेत अतिरिक्त शपथपत्र दाखल करण्याचा निर्णय झाला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. मागासवर्गीयांची पदोन्नती व सरळ सेवेतील प्रतिनिधित्वाची माहिती …
Read More »आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे निर्णय, जाणून घ्या अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटींसह कलाकारांना मदत, बिगर सेट-नेट प्राध्यापकांसाठी निवृत्तीवेतन
मुंबई: प्रतिनिधी राज्यात मंत्रिमंडळाची आज साप्ताहिक बैठक पार पडली या बैठकीत राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटी रूपयांचे अर्थसहाय्य देण्यास आज मंजुरी देण्यात आली. याशिवाय सहकारी संस्थांमधील सदस्यांचे नियमितीकरण, अनेक कॉलेजमधील बिगर सेट-नेट धारकांसाठी निवृत्तीवेतनासह अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले ते खालीलप्रमाणे… अतिवृष्टी व पुरग्रस्तांसाठी १० …
Read More »
Marathi e-Batmya