Breaking News

सोमवारपासून आश्रमशाळेतील या इयत्तांचे वर्ग सुरू होणार आदिवासी आयुक्त सोनावणे यांची माहिती

नाशिक: प्रतिनिधी ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत डिसेंबर २०२० पासून सुरू करण्यात आलेले शाळांचे वर्ग फेब्रुवारी २०२१ पासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे पुन्हा बंद करण्यात आले होते. आता आदिवासी विकास विभागाच्या २६ जुलै २०२१ रोजीच्या शासन निर्णयानुसार आश्रमशाळातील इयत्ता ८ वी ते १२ वी चे वर्ग सोमवार २ ऑगस्ट २०२१ पासून शाळा सुरु करण्यात येत आहेत, असे आदिवासी विकास आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी …

Read More »

गडकरींचे कौतुक करत मुख्यमंत्री म्हणाले विकासासाठी नॅरोगेज ऐवजी ब्रॉडगेज असावा परस्पर सहकार्यातून राज्यातील रस्ते व लोहमार्ग आधुनिक तंत्रज्ञानाने मजबूत करु या

नागपूर : प्रतिनिधी राज्यात युतीची सत्ता असताना शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी नितीन गडकरी यांना बोलावून सांगितले की मुंबई, पुणे ही दोन शहरे सरळ रेषेत जोडली गेली पाहिजेत. जेणेकरून कमी वेळेत जाता आणि येता येईल. ते बाळासाहेबांनी पाहिलेले स्वप्न नितीनजींनी सत्यात उतरविले. त्यांचे काम नेहमीच दैदिप्यमान असते असे कौतुकोद्गार काढत …

Read More »

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त काँग्रेसचे ‘व्यर्थ न हो बलिदान’ १ ऑगस्टला पुण्यातील टिळक वाड्यातून अभियानाची सुरुवात: नाना पटोले

मुंबई: प्रतिनिधी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रदेश काँग्रेसच्या वतीने ‘व्यर्थ न हो बलिदान’ या अभियानाच्या माध्यमातून वर्षभर विविध कार्यक्रम राबविले जाणार आहेत. १ ऑगस्ट रोजी पुण्यातील टिळकवाड्यातून या अभियानाची सुरुवात होत असून १५ ऑगस्टपर्यंत व त्यानंतर पुढे वर्षभर हे अभियान राज्यभर राबवले जाणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून स्वातंत्र्य चळवळीतील काँग्रेसचा सहभाग …

Read More »

राज्यातील आदर्श आणि तत्ववादी राजकारण्याला अखेरचा निरोप…. शेकाप नेते गणपत आबा देशमुख यांच्यावर अंत्यसंस्कार

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्याच्या राजकारणात तत्ववादी आणि आदर्श राजकारणी म्हणून आणि आपल्या समाजवादी विचारांशी कोणतीही तडतोड न करणारा नेता म्हणून भविष्यात नाव घेतले जाईल ते फक्त गणपत आबा देशमुख यांचे. कधीही पक्षांतर न करता आणि कधीही आपल्या आमदार पदाचा रूबाब किंवा त्याचा गैरवाजवी वापर करताही सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्याचे आमदार …

Read More »

सहकारी संस्थांना आता वार्षिक सर्वसाधारण सभा प्रत्यक्षही घेता येणार मात्र अट ही ५० पेक्षा कमी सभासद असलेल्या सहकारी संस्थांना सभासदांच्या प्रत्यक्ष सहभागाद्वारे

मुंबई : प्रतिनिधी मागील दिड वर्षापासून कोरोनाच्या संकटामुळे सहकारी संस्थांना वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यावर निर्बंध आल्याने या संस्थांना आपले कामकाज चालविणे अवघड झाले होते. मात्र आता यावर राज्य सरकारने तोडगा काढत सहकारी संस्थांना या सभा घेण्यास परवानगी देत मार्गदर्शक तत्वे जाहीर जाहिर केली. राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर पाळणे आवश्यक …

Read More »

आता शेतकरी करू शकणार मोबाईल ॲपद्वारे पिकांची नोंदणी रियल टाइम नोंदणीमुळे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना अचूक नुकसान भरपाई आणि मदत देणे शक्य होणार

मुंबई : प्रतिनिधी शेतजमिनीच्या उताऱ्यांवर पिकांची नोंद करण्याची पद्धती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन, शेत जमिनीची प्रतवारी, दुष्काळ, अतिवृष्टी किंवा वादळामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावणे शक्य होते. या पीक नोंदणीच्या आधारित शेतकऱ्यांना पीक कर्ज ही दिले जाते. मात्र दोन तीन गावांमध्ये मिळून एकच तलाठी असल्याने पीक पाहणी अचूक नोंदवली जात नाही …

Read More »

या १४ आयएएस अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या राज्य सरकारकडून आदेश जारी

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील १४ सनदी अधिकाऱ्यांच्या आज बदल्या करण्यात आल्या असून कोशल्य विकासचे आयुक्त दिपेंद्रसिंह कुशवाह यांची वर्णी उद्योग, उर्जा व कामगार विभागाच्या सहसचिव पदी लावण्यात आली आहे. तर एमआयडीसीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी मलीकनेर यांची मात्र आहे त्याच पदावर पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. तर कामगार विभाग आयुक्त कल्याण यांच्या …

Read More »

अतिवृष्टीमुळे रस्त्यांचे १,८०० कोटींचे नुकसान सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्राथमिक अंदाज-मंत्री अशोक चव्हाण यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यात नुकतीच झालेली अतिवृष्टी व त्यातून निर्माण झालेली पूरपरिस्थिती तसेच दरड कोसळण्याच्या घटनांमुळे रस्त्यांचे सुमारे १ हजार ८०० कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज सार्वजनिक बांधकाम विभागाने व्यक्त केल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. राज्याच्या सर्वच विभागांमध्ये अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलनामुळे रस्ते व …

Read More »

पॅकेज म्हणा नाही तर मदत त्यांचा प्रश्न, पण घोषणा करा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री ठाकरेंना टोला

कोल्हापूरः प्रतिनिधी मी पॅकेज जाहिर करणारा नाही तर मदत जाहिर करणारा मुख्यमंत्री असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जाहिर केल्यानंतर विरोधकांच्या पत्रकार परिषदेत आमची हरकत नाही. त्यांनी त्याला पॅकेज म्हणावं की मदत म्हणावं हा त्यांचा मुद्दा आहे. फक्त तुम्ही त्याची घोषणा करावी. सामान्य माणसाला मदत मिळण्याशी मतलब आहे, असा पलटवार विरोधी …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, देवेंद्र फडणवीसांना आज भेटलो पुन्हा मुंबईत भेटणार कायम पुराचा धोका असणाऱ्या गावांचा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागणार

कोल्हापूर : प्रतिनिधी पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीत राजकारण नको. मी स्वत: आज शाहूपुरी येथे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना भेटलो आणि बोललो. मुंबईत आम्ही परत एकदा सर्वाना बोलावून पुर परिस्थितीत सर्वांना कशी मदत करता येईल ते पाहू अशी माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोल्हापूर येथील पत्रकार परिषदेत दिली. मी इथे आलो …

Read More »