मुंबईः प्रतिनिधी राज्यघटनेतील लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतूदीनुसार एखादा राजकिय व्यक्ती एका सभागृहाचा सदस्य असेल आणि निवडणूकीत तो पुन्हा विजयी होवून दुसऱ्या एका सभागृहाचा सदस्य म्हणून निवडूण आला असेल तर दोन्हीपैकी एका सभागृह सदस्यत्वाचा सहा महिन्याच्या आत राजीनामा द्यावा आणि एकाच सभागृहातील सदस्यत्वाचे मानधन घ्यावे. मात्र या तरतूदीचा विसर भाजपा, शिवसेना आणि …
Read More »…आणि मुख्यमंत्र्यांचा सातारा दौरा राहिला अर्धवट खराब हवामानामुळे मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर कोयनेत उतरू शकले नाही
मुंबई : प्रतिनिधी मागील दोन दिवस कोकणातील चिपळूण, महा़ड येथील आलेला पुर आणि अतिवृष्टीमुळे दरड कोसळलेल्या ठिकाणांची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज सातारातील पूर आणि दरड कोसळून झालेल्या दुर्घटनांची पाहणी करण्यासाठी हेलिकॉप्टरने निघाले. मात्र सातारा आणि परिसरात हवामान खराब असल्याने त्यांना साताऱ्यात उतरता आले नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना पुन्हा …
Read More »तिजोरीत खडखडाट ? पूर- दरडबाधितांच्या मदतीकरीता फक्त २० कोटींचा निधी नुकसान भरपाईसाठी निधी कोठून आणायचा वित्त विभागाला पडला प्रश्न
मुंबईः विशेष प्रतिनिधी आधीच कोरोनामुळे बेजार झालेल्या महाविकास आघाडीला आर्थिक चणचणीला सामोरे जावे लागत आहे. त्यातच आता कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात नैसर्गिक आपत्तीचे पुन्हा संकट आले असल्याने या आपत्तीला पैसा कोठून उभा करायचा असा प्रश्न वित्त विभागाला पडला असून तिजोरीत फारसा पैसा नसल्याने सध्या बाधित जिल्ह्यांच्या मदतीकरीता फक्त २० कोटी …
Read More »बीडीडीच्या दुसऱ्या भूमिपूजनाचा कार्यक्रम रद्द ? पूर आणि दरड कोसळण्याच्या घटनांमुळे कार्यक्रम रद्द होणार
मुंबईः विशेष प्रतिनिधी कोंकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुरामुळे आणि दरड कोसळण्याच्या दुर्घटनांमुळे वरळी येथील बीडीडी चाळीच्या पुर्नविकास प्रकल्पाचे दुसऱ्यांदा होणारा भूमिपूजन कार्यक्रम रद्द करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालय आणि गृहनिर्माण विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. मुंबईच्यादृष्टीने महत्वाचा असलेल्या बीडीडी चाळींच्या पुर्नविकास प्रकल्पाचे भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१७ …
Read More »पॉर्न अॅप्स, वेबसाईट, ओटीटीची टास्क फोर्स तर्फे झाडाझडती घ्या भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मागणी
मुंबई: प्रतिनिधी नुकत्याच अटक झालेल्या राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणानंतर मुंबई पोलिसांच्या तपासात अश्लिल साईट आणि उद्योगातील गुन्हेगारांकडून तरुणांचे शोषण आणि प्रचंड आर्थिक फसवणूकीची अनेक धक्कादायक माहिती उघड होते आहे. त्यामुळे या प्रकरणी संयुक्त टास्क फोर्स नियुक्त करुन अधिक झाडाझडती करण्यात यावी, अशी मागणी भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी …
Read More »मुख्यमंत्र्यांना इतके दिवस हेलिकॉप्टर मिळालं नाही का ? कुठल्याही निकषांशिवाय तात्काळ मदत जाहीर करावी - भाजपची मागणी
तळीये-चिपळूण: प्रतिनिधी गेल्या ४ दिवसांपासून राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराने, दरड कोसळलेल्या दुर्घटनांनी होत्याचं नव्हतं झालंय. आताची परिस्थिति अतिशय भीषण आहे. नुकसानग्रस्तांना थेट मदत मिळायला हवी. राज्याला विशेष मदत जाहीर करायला पाहिजे. नेहमीचे मदतीचे निकष आता लागू होणार नसून कुठल्याही निकषांशिवाय राज्य सरकारने तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी विधान सभेचे विरोधी …
Read More »मुख्यमंत्र्यांचे आवाहन, वाढदिवस सेलिब्रेशन नको पण मुख्यमंत्री सहायत्ता निधीत योगदान द्या राज्यावरील पुराचे संकट, कोरोना पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय
मुंबई: प्रतिनिधी कोकण, पश्चिम महाराष्ट्रावर निसर्ग कोपला असून पूरामुळे मृत्यू झाले आहेत, अनेकांच्या कुटुंबियांवर आघात झाला आहे. या आपत्तीत महाराष्ट्र शोकाकुल असून कुणीही माझा वाढदिवस साजरा करू नये असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले. २७ जुलै रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस असला तरी या आपत्तींमुळे तो साजरा …
Read More »चिपळूणकरांनी मांडली व्यथा… वाऱ्यावर सोडणार नसल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही मात्र लोकप्रियतेसाठी घोषणा करणार नाही-मुख्यमंत्री उध्व ठाकरे यांची स्पष्टोक्ती
चिपळूण (रत्नागिरी): प्रतिनिधी काल मी महाड येथील तळीये येथील दरड कोसळलेल्या ठिकाणाची पाहणी केली. आज चिपळूणमध्ये पूरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलोय. उद्या शक्य झाले तर पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुराची पाहणी करायला जाणार आहे. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतरच सर्वकष नुकसान भरपाई जाहिर करणार असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी स्पष्ट करत नुकसान …
Read More »कोकण-पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना केंद्र सरकारने दिला दिलासा पुन्हा होणार JEE-Main ची परिक्षा-शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा
मुंबई : प्रतिनिधी अतिवृष्टीमुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पूर आणि दरड कोसळण्याच्या घटना घडल्या. या घटनांमुळे ९ जिल्ह्यातील जनजीवनच विस्कळीत झाले. त्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांसाठी JEE-Main ची परिक्षा पुन्हा घेण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी केली. यासंदर्भात त्यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली. कोकण आणि महाराष्ट्रातील कोल्हापूर, पालघर, …
Read More »गाठीभेटीनंतर आता मराठा आरक्षणासाठी चव्हाणांचे सर्वपक्षिय खासदारांना पत्र आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथिल करण्यासाठी जोरदार मोहीम
मुंबई : प्रतिनिधी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी काही दिवसांपूर्वी नवी दिल्लीत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांची भेट घेत अशोक चव्हाण यांनी आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथील करण्याबाबतचा ठराव संसदेत मांडावा यासाठी आग्रह धरला. त्यानंतर राज्यातील सर्वपक्षीय खासदारांनी या पावसाळी अधिवेशनात आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथिल करण्याची मागणी करून …
Read More »
Marathi e-Batmya