Breaking News

कोरोना : मृतकांची पुन्हा तीन अंकी तर बाधितांच्या संख्येतही वाढ ५ हजार ६०० नवे बाधित, ५ हजार २७ बरे झाले तर १११ मृतकांची संख्या

मुंबई: प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून राज्यात दोन अंकी असलेल्या मृतकांच्या संख्येत आज तब्बल १० ते १५ च्या संख्येने वाढ झाली आहे. त्यामुळे आज १११ मृतकांची नोंद झाल्याने राज्यातील एकूण मृतकांची संख्या ४७ हजार ३५७ वर पोहोचली आहे. त्याचबरोबर बाधितांच्या संख्येतही आज वाढ झाली असून मागील २४ तासात ५ हजार ६०० …

Read More »

मराठा आरक्षण, कोरेगांव भीमा प्रकरणातील कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील विविध सामाजिक आणि राजकिय प्रश्नी आंदोलन केलेल्या कार्यकर्त्यांवर डिसेंबर २०१९ पर्यंत तत्कालीन सरकारने दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे कोर्टाच्या आणि पोलिसी तुरुंगात अडकलेल्या कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला आहे. कोरेगांव भीमा येथे झालेल्या दंगलीचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटले. त्यामुळे सलग राज्यातील काही …

Read More »

राज्यातील वस्त्यांची जातीवाचक नावे बदलणार सामाजिक न्याय विभागाच्या प्रस्तावावर महाविकास आघाडीचा निर्णय

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील शहरे व ग्रामीण भागातील वस्त्यांची जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. काही वस्त्यांची नावे महारवाडा, बौद्धवाडा, मांगवाडा, ढोरवस्ती, ब्राम्हणवाडा, माळी गल्ली, अशा स्वरुपाची नावे आहेत. ही बाब महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला भुषणावह नसल्याने सामाजिक सलोखा …

Read More »

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबईः प्रतिनिधी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव आणि दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आगामी विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत घेण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळात आज घेण्यात आला. यामुळे यंदाचे हिवाळी अधिवेशन गरमच राहण्याची शक्यता आहे. नागपूर करारानुसार वर्षभरातील एक अधिवेशन नागपूरात घ्यावे असे बंधनकारक आहे. याकालावधीत संपूर्ण राज्याची प्रशासकिय आणि सरकार नागपूरात स्थलांतरीत होते. मात्र …

Read More »

सात जिल्ह्यात या प्रवर्गातील तलाठीपदी निवड झालेल्यांना नियुक्त्या देणार नाही महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी बीड, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, सातारा, धुळे आणि अहमदनगर अशा 7 जिल्यातील निवड झालेल्या उमेदवारांच्या पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. एस.ई.बी.सी. संवर्गातील पदे वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. 7 जिल्हयातील निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीबाबत अडचण निर्माण झाली होती. …

Read More »

प्रत्येक ग्रामपंचायतीत जमीनच्या सुपिकतेचा फलक लावणे बंधनकारक 5 डिसेंबरला जागतिक मृद दिनी गावांमध्ये कार्यशाळा घेण्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

मुंबई: प्रतिनिधी शेतकऱ्यांना सोप्या भाषेत समजेल असे गावातील जमीनीतील अन्न घटकांची माहिती आणि त्यासाठी आवश्यक असणारे खत किती प्रमाणात द्यावेत याची माहिती देणारे सुपिकता निर्देशांक फलक राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत लावावेत. 5 डिसेंबर रोजी जागतीक मृददिनानिमित्त प्रत्येक गावात कार्यशाळा आयोजित करण्यात यावी, असे निर्देश कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिले. ग्रामपंचायत स्तरावर …

Read More »

मोटाभायला दिली, मूळ भाजपातील आमदारांसह बाहेर पडणाऱ्यांची यादी कुलाब्यातील माजी आमदारांसह अन्य आमदारांचा समावेश

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यात सत्तांतर होवून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाला. मात्र या वर्षभरात सत्तेविना राहणे मूळ भाजपा आमदारांसह काँग्रेस-राष्ट्रवादीमधून भाजपावासी झालेल्यांना जीवावर आले असून काही तरी करा अन्यथा आम्ही पक्षांतर करू असा इशारा बाहेर पडू इच्छीणाऱ्या ४० आमदारांनी दिला असल्याने त्या ४० …

Read More »

राज्यात पहिल्यांदाच माशाच्या कातडीपासून वस्तू बनविणाऱ्यांसाठी फिश-ओ-क्राफ्ट कौशल्य विकास दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

मुंबई : प्रतिनिधी मत्स्य कातडीपासून वस्तु तयार करण्याचे प्रशिक्षण देऊन उद्योग सुरू करण्याला प्रोत्साहन देण्याचा राज्यात पहिल्यांदाच प्रयोग करण्यात येत असून फिश- ओ-क्राफ्टद्वारे रोजगार निर्मिती हा राज्यातील पहिला अभिनव उपक्रम आहे. राज्याच्या मत्स्यव्यवसाय विकास विभागाने उचललेले हे क्रांतीकारी पाऊल आहे. यामुळे नवयुवक आणि मच्छिमार महिलांना नवीन उद्योग व रोजगार प्राप्ती …

Read More »

शेतकऱ्यांच्या आंदोलनात आता महाराष्ट्रही सहभागी होणार ३ डिसेंबर रोजी राज्यव्यापी एल्गार किसान संघर्ष समन्वय समितीच्या ऑनलाईन बैठकीत निर्णय

मुंबई : प्रतिनिधी केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या निषेधार्थ सुरू असलेले देशव्यापी आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी ३ डिसेंबर रोजी महाराष्ट्रात उग्र आंदोलन करण्याचा निर्णय अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या महाराष्ट्र राज्य समितीच्या बैठकीत घेण्यात आला. भाजपचे केंद्र सरकार दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले शेतकरी आंदोलन बळाच्या जोरावर दडपून टाकू पाहत …

Read More »

कोरोना: मृतक आणि बरे होणाऱ्यांच्या संख्येत वाढ ४ हजार ९३० नवे बाधित, ६ हजार २९० बरे झाले तर ९५ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यात काल बाधितांच्या संख्येत घट आल्याचे दिसून झाले होते. मात्र या संख्येत आजही घट झाल्याचे दिसून आले असले तरी मृतकांच्या संख्येत आज वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ४ हजार ९३० नवे बाधित आढळून आले असल्याने एकूण बाधितांच्या संख्येत १८ लाख २८ हजार ८२६ वर तर अॅक्टीव्ह …

Read More »