Breaking News

सुनिल तटकरे यांची घोषणा, …आता ‘एकच लक्ष विधानसभा क्षेत्र’ पंधरा -वीस दिवसाने फेरमतदानाची मागणी करणे हे हास्यास्पद

आम्ही राज्यात स्पष्टपणाचे धोरण घेऊन ‘एकच लक्ष, विधानसभा क्षेत्र’ हे सुत्र घेऊन काम करण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे ४ जूनच्या निकालाची फारशी वाट न बघता राज्यभरात पुन्हा एकदा संघटना वाढीसाठी आणि संघटना अधिक गतीमान करण्यासाठी विधानसभा क्षेत्रानुसार जिल्हानिहाय आढावा घेऊन पावले उचलली जात असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल …

Read More »

लोकसभा निवडणूकीच्या ६ व्या टप्प्यात ५९ टक्के मतदान केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली माहिती

केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूकीसाठी आज ५८ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांसाठी सहाव्या टप्प्यात मतदान घेतले.  लोकसभा निवडणूक २०२४ च्या सहाव्या टप्प्यासाठी आज आज संध्याकाळी ७.४५ वाजेपर्यंत ५९.६% मतदान झाले. आजच्या मतदानामुळे अनेक केंद्रीय मंत्री भाजपाच्या माजी मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे. राज्यांमध्ये, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक (७७.९९%) मतदान झाले, त्यानंतर झारखंड (६१.४१%), उत्तर प्रदेश …

Read More »

पंतप्रधान मोदीकडून विरोधकांसाठी अपशब्द “मुजरा”, तर विरोधकांचा पलटवार देशातील पंतप्रधान पदावरील व्यक्तीकडून अपशब्दाचा वापर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी इंडिया आघाडीवर मुस्लीम व्होटबँकेसाठी लांगुचालन करण्याच्या गोष्टीला मुघल काळात राजे किंवा उच्चभ्रू लोकांसाठी गणिकांद्वारे केलेल्या ‘मुजरा’शी तुलना केली. पंतप्रधान मोदींच्या या टिप्पणीवर विरोधकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत याला “दुर्दैवी” आणि “पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा कमी करणारे” वक्तव्य केल्याचा टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली. बिहारमधील …

Read More »

निवडणूक आयोगाकडून पहिल्या पाच टप्प्यातील मतदानाची आकडेवारी जाहिर मतदानानंतर किमान तीन ते जास्तीत जास्त दिवसही लागू शकतात

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतदानानंतर एकूण मतदानाची आकडेवारी जाहिर करण्यास उशीर करत असल्याच्या कारणावरून सर्वचस्थरातून निवडणूक आय़ोगावर टीकेची झोड उठलेली आहे. त्यातच यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल करण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने (ECI) शनिवारी पहिल्या पाच टप्प्यातील मतदानासाठी मतदारांची परिपूर्ण संख्या जाहीर केली. निवडणूक आयोगाने सांगितले की त्यांनी आपल्या …

Read More »

मान्सूनला उशीर?, मुंबईकरांनो पाणी कपात, पाणी जपून वापरा शरद पवार यांच्या इशाऱ्यानंतर मुंबईत पाणी कपात लागू

83 percent water storage in seven lakes of Mumbai

राज्यातील उन्हाळा मौसम चांगलाच उष्ण राहिल्याने नागरिकांप्रमाणेच शेतकऱी, जनावरांनाही पाण्याचा प्रश्न भेडसावण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच मागील वर्षीच्या मौसमात पाऊस कमी प्रमाणात पडल्याने २०२४ साल उजाडताच जानेवारी महिन्यातच राज्यात पाण्याचा टँकरने पाणी पुरवठ्यास सुरुवात झाली. त्यातच यापूर्वी हवामान खात्याने वेळेआधी मान्सून सक्रिय होणार असल्याचे संकेत दिले. मात्र अद्याप तरी मान्सून …

Read More »

पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांची माहिती, दोन पोलिस अधिकारी निलंबित सुरेंदर अग्रवाल यालाही अटक, ड्रायव्हरला पोलिस संरक्षण देणार

मुंबईतील मतदानाच्या आदल्या दिवशी पुणे शहरातील कल्याणीनगर येथे दारू पिऊन पोर्शे कार भरधाव वेगात चालवित दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या एका बिल्डरच्या मुलास वाचविण्यासाठी मदत केलेल्या दोन पोलिस अधिकाऱ्यांनी मदत केल्याची माहिती पुढे आली. त्यानुसार दोन पोलिस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित कऱण्यात आल्याची माहिती पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना …

Read More »

आशिष शेलार यांची खोचक सवाल, उद्धव ठाकरे लंडनची नालेसफाई पहायला गेलेत का? उद्धव ठाकरे यांच्या परदेश वारीवरून केली टीका

पश्चिम उपनगरातील नालेसफाईची आज तिसऱ्या दिवशी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी पाहणी केली. पश्चिम उपनगरातील नालेसफाई अद्याप समाधानकारक झाली नसल्याचे यावेळी नमूद करत उध्दव ठाकरे कुठे आहेत? लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला गेलेत का? असा खोचक सवाल अॅड आशिष शेलार यांनी केला. मुंबईतील मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तातडीने …

Read More »

१० वी च्या परिक्षा निकालाची तारीख जाहिर २७ मे ला लागणार दहावीचा निकाल

काही दिवसांपूर्वी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी २० मे रोजी १२ परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत परिक्षेत अयशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांना वावगं पाऊल न उचलम्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर राज्यातील दहावी परिक्षेचा निकाल ७ दिवसानंतर लागणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानुसार १० वी परिक्षेचा निकाल आता २७ मे …

Read More »

विजय वडेट्टीवार यांची मागणी, पुणे नंतर आता नागपूरात ड्रंक अँड ड्राईव्ह, कडक कारवाई करा आरोपीच्या गाडीत दारूच्या बाटल्या आणि अंमली पदार्थ

पुणे येथील कल्याणीनगर येथे दाऊ पिऊन पोर्शे कार सुसाट चालवित दोघांचा निष्पाप बळी घेतल्याचे प्रकरण अद्याप ताजे असताना आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जिल्हा आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूरातच आणखी एक ड्रंक अँड ड्राईव्हची घटना घडल्याची माहिती उघडकीस आली आहे. या घटनेनंतर काँग्रेसचे नेते तथा विधानसभेतील …

Read More »

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी २७ मे पासून अर्ज राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माहिती

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात इयत्ता बारावी च्या फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल २१ मे रोजी जाहीर झाला आहे. मंडळातर्फे पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये घेण्यात येणार असून या परीक्षेत प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना २७ मे पासून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येणार असल्याची माहिती, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक …

Read More »