दिल्ली पोलिसांनी रविवारी न्यू बॉर्न बेबी केअर रूग्णालयाच्या मालकाला आणि डॉक्टरला अटक केली. रूग्णालयात रात्री उशीराने मोठ्या प्रमाणात आग लागल्याने सात नवजात बालकांचा मृत्यू झाला. पूर्व दिल्लीतील विवेक विहार येथील न्यू बॉर्न बेबी केअर हॉस्पिटलचे मालक डॉ नवीन खिची यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली. याशिवाय, घटनेच्या वेळी रुग्णालयाच्या शिफ्टवर रूजू …
Read More »आता नवीन ड्रायव्हिंग लायसेन्ससाठी आरटीओत जाण्याची गरज नाही फक्त अर्ज करण्यासाठी जाऊ शकता आरटीओ कार्यालयात
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जाहीर केलेल्या नवीन नियमांमुळे १ जून २०२४ पासून, भारतात ड्रायव्हिंग लायसन्स मिळवणे अधिक सोयीचे बनले आहे. अर्जदारांना आता खाजगी ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्रांवर त्यांच्या ड्रायव्हिंग चाचण्या देण्याचा पर्याय असेल, जे सरकार-संचलित प्रादेशिक परिवहन कार्यालये (RTOs) वापरण्याच्या पारंपारिक पद्धतीपासून महत्त्वपूर्ण बदल दर्शविते. यासंदर्भात केंद्रीय परिवहन मंत्री नितीन …
Read More »लष्कर प्रमुख मनोज पांडे यांना एक महिन्याची मुदतवाढ मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीचा निर्णय
सध्या लोकसभा निवडणूकीचे वारे देशात वाहत असतानाच लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे हे ३१ मे रोजी अर्थात त्यांचा निवृत्तीचा दिवस असताना अचानक दिल्लीत घडामोडी घडत मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने लष्करप्रमुख (COAS) जनरल मनोज पांडे यांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या तारखेनंतर ३० जून २०२४ पर्यंत अर्थात एक महिन्याची मुदतवाढ दिली. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील …
Read More »केसरकर यांचे रामदास आठवले यांना आश्वासन, मनुस्मृतीचे श्लोक घेतले जाणार नाही शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यात फोनवरून चर्चा
शालेय शिक्षण अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोकांचा समावेश करण्यास रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी तीव्र विरोध केला आहे.याबाबत रामदास आठवले यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून मनुस्मृतीचे श्लोक अभ्यासक्रमात घेण्याबाबत तीव्र विरोध दर्शविला. यावेळी दोघांमध्ये झालेल्या चर्चेत दीपक केसरकर यांनी शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे श्लोक …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांचे आव्हान, हिंमत असेल तर एक रोखठोक त्यावरही येऊ द्या संजय राऊत यांच्या लेखातील आरोपावरून बावनकुळे यांचे आव्हान
राज्यातील लोकसभा निवडणूकीसाठी मतदानाचा टप्पा पार पडल्यानंतर काही प्रमाणात राजकिय वातावरणात शांतता निर्माण झाल्याचे जावणत असल्याची चर्चा सर्वच राजकिय नेत्यांकडून करण्यात येत होती. मात्र लोकसभा निवडणूकीचा सहावा ठप्पा काल पार पडल्यानंतर मात्र पुन्हा एकदा राजकिय वर्तुळाता पुन्हा एकदा गरमागरमी निर्माण होते की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र …
Read More »संजय राऊत यांचा लेखातून आरोप, नितीन गडकरींना पाडण्यासाठी भाजपाच्या…. राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
लोकसभा निवडणूकीचा सहावा टप्पा नुकताच पार पडला. या सहाव्या टप्प्यात देशातील राजकिय कल बदलल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी त्यांच्या लेखात भाजपामधील अंतर्गत राजकारणावर भाष्य करत लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार गटाचा एकही उमेदवार निवडूण येऊ नये यासाठी पैशाचा …
Read More »ऑल वुई इमॅजिन अॅज लाईट चित्रपटाला कान्स चित्रपट महोत्सवात ग्रॅण्ड प्रिक्स अवार्ड ३० वर्षानंतर कान्समध्ये भारतीय चित्रपटाने रचला इतिहास
कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२४: भारतीय चित्रपट निर्मात्या पायल कपाडियाने २५ मे रोजी ७७ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये मल्याळम-हिंदी भाषेतील ‘ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट’ या चित्रपटासाठी देशाचा पहिला ग्रँड प्रिक्स पुरस्कार मिळवून इतिहास घडवला. कान्स ग्रँड प्रिक्स हा पाल्मे डी’ओर नंतर फेस्टिव्हलमधील दुसरा सर्वोच्च पुरस्कार आहे. अमेरिकन दिग्दर्शक सीन बेकर …
Read More »जगातील १० पैकी ९ देशांशी भारताचा नुकसानीत व्यापार त्या ९ देशांकडून भारतातील आयात वाढली, तर निर्यात मात्र घटली
आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापार वृध्दीसाठी मोठस्तरावर करार-मदार केले जातात. त्या अनुषंगाने भारतानेही जागतिकस्तरावरील चीन, रशिया, सिंगापूर, कोरिया, हाँगकाँग, इंडोनेशिया, सौदी अरेबिया, इराक, युएइ यांच्यामध्ये अनेक वर्षापासून व्यापार केला जातो. मात्र मागील काही वर्षात यापैकी ९ देशांशी भारताने आयात-निर्यातीत नुकसान सोसत व्यापार करत असल्याची आकडेवारी पुढे आली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, २०२३-२४ मध्ये …
Read More »हवामान विभागाचा इशारा रेमाल चक्रिवादळ मध्यरात्री धडकणार पूर्वेकडील भागाला आणि दक्षिण भारताला फटका बसण्याची शक्यता
आगरतळा येथील भारतीय हवामान विभागाने अर्थात आयएमडी IMD भारताच्या ईशान्येकडील प्रदेश आणि बांगलादेशच्या किनारी भागासाठी तीव्र चक्रीवादळाचा इशारा जारी केला आहे. रेमाल चक्रीवादळ रविवारी बंगालमध्ये धडकण्याची शक्यता आहे. २६ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनारपट्टीच्या प्रदेशात चक्रीवादळाचा अपेक्षित भूभाग येण्याचा अंदाज आहे. चक्रीवादळ त्याच्यासोबत अत्यंत मुसळधार पाऊस …
Read More »असमानता कमी करण्यासाठी, २ टक्के कर, ३३ टक्के वारसा कर प्रणाली योग्य अर्थशास्त्र थॉमस पिकेट्टीच्या शोबनिबंधातून माहिती
प्रसिध्द अर्थशास्त्रज्ञ थॉमस पिकेट्टी यांनी सह-लेखन केलेला एक नवीन शोधनिबंध, सुचवितो की भारताने देशातील वाढत्या असमानतेच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी १० कोटी रुपयांवरील निव्वळ संपत्तीवर २% कर आणि ३३% वारसा कर लागू केला पाहिजे. ‘भारतातील अत्यंत असमानता हाताळण्यासाठी वेल्थ टॅक्स पॅकेजसाठी प्रस्ताव’ शीर्षकाचा पेपर अतिश्रीमंतांना लक्ष्य करणारी एक व्यापक कर योजना …
Read More »
Marathi e-Batmya