एका महत्त्वपूर्ण खटल्यात निर्णय देताना, सर्वोच्च न्यायालयाने सक्तवसुली संचालनायाने अर्थात ईडी (ED) ला सँटियागो मार्टिन, त्याचे सहकारी आणि कर्मचारी यांच्यावर छापे मारताना जप्त केलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधील डेटा ऍक्सेस आणि कॉपी करण्यास मनाई केली आहे. या निर्णयामुळे भविष्यातील गुन्हेगारी तपासात मोबाईल फोन आणि लॅपटॉप जप्त करण्यासाठी तपास यंत्रणा कशा प्रकारे संपर्क …
Read More »निवडणूक नियमात बदल काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव नागरिकांचे अधिकार कमी करण्यासाठीच हा बदल केल्याचा काँग्रेसचा आरोप
काँग्रेस पक्षाने केंद्र सरकारने निवडणूक घेण्याविषयीचा नियम, १९६१ मधील नुकत्याच केलेल्या सुधारणांना आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ज्याद्वारे निवडणूक संबंधित नोंदींमध्ये प्रवेश करण्याचे नागरिकांचे अधिकार कमी केले गेले आहेत असा आरोपही यावेळी काँग्रेसने केंद्र सरकारवर केला. याचिकेनुसार, निवडणूक आयोग, जी एक संवैधानिक संस्था आहे, ज्यावर मुक्त आणि निष्पक्ष …
Read More »सुनावणी पुढे ढकलण्याच्या मागणीवरून सरकारची न्यायालयाने केली कानउघडणी सुनावणीला विलंब केला जात आहे – उच्च न्यायालय
बनावट कागदपत्राद्वारे फसवणूक, ठाणे पोलिसांनी दाखल केलेला खंडणी, फौजदारी कट रचल्याप्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. परंतु, सरकारच्यावतीने बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती न केल्याने याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी सरकारकडून करण्यात आली. त्यावर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. …
Read More »प्रमाणापेक्षा जास्त गर्दी असलेल्या तुरुंगात कैद्यांच्या स्थलांतरणास न्यायालयाची स्थगिती वकील सतीश उके यांच्या स्थलांतरणास उच्च न्यायालयाची स्थगिती
मुंबई मध्यवर्ती कारागृहातील कैद्याच्या क्षमतेवर उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. ५० कैद्यांच्या बराकमध्ये २०० ते २२० कैदी ठेवण्यात आले आहेत. अशा स्थितीत कैद्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न महत्वाचा आणि गहन असल्याचेही स्पष्ट करून अर्जदार आरोपीच्या तळोजा कारागृहातून ऑर्थर मध्यवर्ती कारगृहात स्थलांतरीत करण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला न्यायालयाने स्थगिती दिली. आर्थिक गैरव्यवहारप्रकऱणी अटेकत …
Read More »कुर्ला बस दुर्घटना प्रकऱण: आरोपी संजय मोरेचा जामीनासाठी अर्ज पोलिसांनी भूमिका स्पष्ट करण्यासाठी मागितला वेळ
कुर्ला परिसरात झालेल्या बेस्टच्या भीषण अपघातातील प्रमुख आरोपी आणि बस चालक संजय मोरे यांनी सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला आहे. या अपघातामध्ये आपला कोणताही दोष नसल्याचा दावाही मोरे यांनी केला असून बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाल्याचा दावा अर्जातून केला आहे. या प्रकरणावर सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश सचिन पवार …
Read More »मुलुंड न्यायालयात साप आढळल्याने एकच गोंधळ तासाभराच्या नाट्यानंतर कामकाज सुरळीत सुरू
मुलुंड न्यायालयातील न्यायदालनातील फायलींच्या ढिगाऱ्यावर साप आढळून आला आणि न्यायालयाच्या परिसरात एकच गोंधळ उडाला. या घटनेमुळे मंगळवारी सुमारे तासभर न्यायालयीन कामकाज विस्कळीत झाले होते. सर्पमित्रांनी सापाचा शोध घेऊनही तो सापडला नाही. अखेर तासभर खोळंब्यानंतर न्यायालयीन कामकाज पुन्हा सुरळीत झाले. मुलुंड येथील न्यायदंडाधिकारी न्यायालयाच्या २७ क्रमांकाच्या न्यायदालनात मंगळवारी दुपारपर्यंत नेहमीप्रमाणे कामकाज …
Read More »पोक्सोतंर्गत गुन्हा दाखल झालेल्यास उच्च न्यायालयाकडून जामीन शारीरिक संबंध दोघांच्याही संमतीनेच
अर्जदार आणि पीडितेमध्ये प्रस्थापित झालेले शारीरिक संबंध हे दोघांच्याही परस्पर संमतीने असल्याचे निरीक्षण नोंदवून उच्च न्यायालयाने नुकताच पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल असलेल्या अर्जदाराला जामीन मंजूर केला. घटनेदरम्यान पीडिता मुलगी अल्पवयीन होती हे सिद्ध करण्यासाठी कोणतेही पुरावे, सामग्री रेकॉर्डवर ठेवलेली नाही. प्रकरणाचा बारकाईने अभ्यास केला असता लक्षात येते की, अर्जदार आणि पीडित …
Read More »गिग अर्थव्यवस्थेप्रमाणे सरकारी संस्थांनी कंत्राटी नोकर पद्धतीचा अवलंब करू नये सर्वोच्च न्यायालयाचा कंत्राटी नोकर भरतीबाबत मोठा निर्णय दिला
महाराष्ट्रासह देशातील अनेक सरकारी संस्था-विभागांकडून आर्थिक कारण पुढे करत विविध स्तरावरील नोकऱ्यांच्या रिक्त पदावर कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करण्यात येत आहे. महाराष्ट्रात राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या विविध विभागात तर १ लाख ५० हजार रिक्त जागा असतानाही यातील अनेक पदे कंत्राटी पद्धतीने भरली जात आहेत. यापार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने कंत्राटी भरतीबाबत मोठा …
Read More »शुद्ध हवेच्या प्रश्नावरून उच्च न्यायालयाची राज्य सरकार आणि बीएमसीला विचारणा वायू प्रदुषण कमी करण्यासाठी इच्छाशक्ती दाखविण्याची गरज
मुंबईतील ‘कठोर’ वायू प्रदूषणावर मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी तीव्र नाराजी व्यक्त करताना अधिकाऱ्यांना सांगितले की, हवा शुद्ध करण्यासाठी वाऱ्यावर देवावर विसंबून राहू शकत नाही, त्याऐवजी अधिकाऱ्यांनी शहरातील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी काही ‘इच्छाशक्ती’ दाखवण्याची गरज आहे असे मतही यावेळी व्यक्त केले. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती …
Read More »सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयः बायको कमावती असली तरी घटस्फोटानंतर देखभाल खर्च आवश्यक देखभाल खर्च आणि पोटगी प्रकरणी न्यायालयाचा निर्णय
सर्वोच्च न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की, घटस्फोटानंतर, विशेषत: विवाह दीर्घकाळ टिकून राहिलेल्या प्रकरणांमध्ये, सन्मान, सामाजिक स्थान आणि आर्थिक स्थैर्य सुरक्षित करणे आवश्यक असल्यास पक्षाचे आर्थिक स्वातंत्र्य असूनही देखभाल मंजूर केली जाऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती पीबी वराळे यांच्या खंडपीठाने घटस्फोटाच्या निर्णयाला आव्हान देणारे पत्नीचे अपील फेटाळून …
Read More »
Marathi e-Batmya