अर्थविषयक

संरक्षण उत्पादन क्षेत्रातील गुंतवणूकीसाठी ब्रिटीश कंपनी उत्सुक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी केंद्र सरकारने संरक्षण क्षेत्रात परकीय गुंतवणूकीला १०० टक्के परवानगी दिल्याने महाराष्ट्रात  संरक्षणविषयक उत्पादनांची निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्याची तयारी ब्रिटीश कंपनी बीएई सिस्टीम्सने अनुकुलता दर्शविली आहे. तसेच यासाठी लागणारे आवश्यक ते मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण देण्यासाठी ट्रेनर हॉकची निर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीएई …

Read More »

उद्योगांना चालना देण्यासाठी फोरमच्या केंद्राचा मुंबईत विस्तार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहीती

मुंबई : प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय स्तरावर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जगातील चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी स्थापन केलेल्या केंद्राचा मुंबईत विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस येथे दिली. दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम-२०१८ मध्ये उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस हे तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे …

Read More »

सेन्सेक्स ३६ तर निफ्टी ११ हजारांच्या वर सेन्सेक्स, निफ्टीचा नवा उच्चांक

मुंबई: प्रतिनिधी देशातील शेअर बाजारात मागील काही दिवसांपासून तेजी असून सेन्सेक्स, निफ्टी रोज नवीन विक्रम करत आहे. मंगळवारी सेन्सेक्सने प्रथमच ३६ हजारांचा टप्पा ओलांडून आतापर्यंतची उच्चांकी पातळी गाठली. तर निफ्टीही प्रथमच ११ हजारांच्या वर गेला आहे. परकीय आणि देशातील गुंतवणूकदारांकडून सुरू असलेल्या जोरदार खरेदीमुळे शेअर बाजाराने विक्रम केला आहे. सेन्सेक्स …

Read More »

राज्य सरकारकडून विकासकामांवर फक्त ४३ टक्के निधी खर्च गेल्या दोन वर्षापेक्षा ८ टक्के कमी निधीचा खर्च

मुंबई: गिरिराज सावंत राज्य सरकारकडून राज्याच्या विकासासाठी पायाभूत सुविधा, शेती क्षेत्र यासह विविध क्षेत्रात विकास कामांच्या घोषणांचा धडका लावलेला आहे. मात्र एकाबाजूला विकास कामांच्या घोषणांचा धडका लावलेला असताना प्रत्यक्षात विकास कामांवर मंजूर अर्थसंकल्पातील निधीपैकी फक्त ४३ टक्के निधी खर्च केला असून मागील दोन वर्षापेक्षा सर्वात कमी निधी खर्च केला असल्याची …

Read More »

राज्य सरकारकडून चवथ्यांदा १२५० कोटींची कर्जरोखे विक्रीला एक हजार आणि २५० कोटींचे कर्जरोखे विक्रीला काढले

मुंबई : प्रतिनिधी राज्याची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस खालावत चालली असून यावर मात करण्यासाठी राज्य सरकारकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. तरीही या उपाययोजनांचा भाग म्हणून राज्य सरकारकडून गेल्या सहा महिन्यात १२५० कोटी रूपयांचे कर्जरोखे पुन्हा एकदा विक्रीस काढले आहेत. मागील वर्षी ऑगस्ट २०१७ महिन्याच्या कालावधीत राज्य सरकारकडून जवळपास ५ हजार …

Read More »

रिलायन्सला ९ हजार ४२३ कोटींचा नफा नफ्यात २५ टक्क्याने वाढ

मुंबई : प्रतिनिधी आर्थिक वर्ष २०१८ च्या तिसऱ्या तिमाहीत रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नफ्यात २५ टक्के वाढ झाली आहे. या तिमाहीत कंपनीला ९ हजार ४२३ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. तर मागील वर्षीच्या या तिमाहीत रिलायन्सला ७ हजार ५३३ कोटींचा नफा झाला होता. तिसऱ्या तिमाहीत रिलायन्सचे उत्पन्न ३०.५ टक्के वाढून १ लाख …

Read More »

यंदाही आयपीओ करणार मालामाल ५० पेक्षा अधिक कंपन्या आयपीओ आणणार

मुंबई : नवनाथ भोसले  वर्ष २०१७ मध्ये भारतीय शेअर बाजारांनी २८ टक्के वाढ नोंदवली आहे. त्यामुळे अनेक शेअर्सनी चांगला परतावा दिल्याने गुंतवणूकदार मालामाल झाले.  प्राथमिक समभाग विक्रीसाठीही मागील वर्ष चांगले गेले. या वर्षात ३८ कंपन्यांनी आयपीओमार्फत शेअर बाजारातून ७५ हजार ४७५ कोटी रुपये उभारले आहेत. आयपीओमधूनही गुंतवणूकदारांना चांगला लाभ झाला …

Read More »

रेटिंग वाढवल्याने आयटी शेअर्स उसळले २७ टक्के परतावा मिळण्याची शक्यता

नई दिल्लीः प्रतिनिधी जागतिक वित्तीय सेवा कंपनी मॉर्गन स्टॅनलेने आयटी कंपन्यांचे रेटिंग वाढवल्याने बुधवारी या कंपन्यांच्या शेअर्सने मोठी उसळी घेतली. इन्फोसिस आणि टीसीएस या आयटी कंपन्यांचे शेअर्स आता ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर पोचले आहेत. मॉर्गन स्टॅनलेने इन्फोसिस, टेक महिंद्रा, परसिस्टेंस, साइंट आणि एचसीएल टेक आदी आयटी कंपन्यांचे रेटिंग वाढवून ओव्हरवेट श्रेणीमध्ये त्यांच्या …

Read More »

तंत्रज्ञानामुळे कामकाजात पारदर्शकता, विश्वासार्हता आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी गेल्या तीन वर्षात शासकिय कामकाजात तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. त्यामुळे लोकाभिमुख निर्णय घेण्याच्या कामकाज प्रक्रियेमध्ये पारदर्शकता, विश्वासार्हता आल्याची माहिती देत राज्यासमोरील अनेक समस्यांचे निराकरण करण्यासाठी मदत होत असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. नरिमन पॉंईट येथील हॉटेल ट्रायडंट येथे फिक्कीच्यावतीने आयोजित एम–टेक २०१८ डीजीटल …

Read More »

सोने आयातमध्ये ७२ टक्के वाढ व्यापार तूटीतही वाढ

नवी दिल्लीः प्रतिनिधी डिसेंबरमध्ये देशाची सोन्याची आयात तब्बल ७२ टक्क्यांनी वाढून ३.३९ अब्ज डॉलरवर गेली आहे. मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या सोने आयातीमुळे या महिन्यात व्यापार तूटही वाढून ती १४.८८ अब्ज डॉलरवर पोचली आहे. डिसेंबर २०१६ मध्ये १०.५५ अब्ज डॉलरची ही तूट होती. त्यात आणखी ४ अब्जची वाढ झाली आहे. देशाची निर्यात डिसेंबर महिन्यात १२ टक्क्यांनी वाढून २७ अब्ज डॉलरवर गेली आहे. तर एकूण आयातीत २१.१ टक्के वाढ झाली आहे. या महिन्यात ४१.९ अब्ज डॉलरची आयात करण्यात आली. डिसेंबरमध्ये तेलाच्या आयातीचे बील ३५ टक्के वाढून १०.३५ अब्ज डॉलर झाले आहे. याअगोदरच्या महिन्यात ९.५५ अब्ज डॉलरचे तेल आयात करण्यात आले होते. दरम्यान, इंजिनिअरींग वस्तू आणि  ऑयल  प्रोडक्‍ट्सची  निर्यात  डिसेंबरमध्ये  २५  टक्के  वाढली  आहे. तर तयार कपड्यांची निर्यात मात्र ८ टक्क्याने घटून १.३३ अब्ज डॉलरची राहिली आहे. कच्च्या तेलाच्या किमती वाढत असल्याने  तेल  आयातीवरचा  खर्च  वाढल्याचे  सरकारने  म्हटले आहे. एप्रिल – डिसेंबर दरम्यान निर्यात वाढली एप्रिल – डिसेंबर २०१७ या कालावधीत निर्यात मागील वर्षीच्या तुलनेत २१.०५ टक्क्यांनी वाढली आहे. या कालावधीत देशाची निर्यात २२३.५१२ अब्ज डॉलरची झाली आहे. मागील वर्षीच्या याचकालावधीत १९९.४६७ अब्ज डॉलरची निर्यात झाली होती. दरम्यान, चालू आर्थिक वर्षाच्या ९ महिन्यात आयात २१.७६ टक्के वाढून ३३८.३६९ अब्ज डॉलरवर पोचली आहे. Share on: WhatsApp

Read More »