सुशिक्षित पण अडाणी वागणाऱ्या नागरिकांसाठी संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू लोकहितासाठी कठोर निर्णय घेत असल्याचे उध्दव ठाकरे यांची घोषणा

मुंबईःखास बातमीदार
कोरोनाला रोखण्यासाठी वेळोवेळी नागरिकांना आवाहन करूनही सुशिक्षित असूनही अडाणी व्यक्तींसारख्या नागरीकांना ताळ्यावर आणण्यासाठी अखेर राज्य सरकारने संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला.
कोरोना विषयक सातत्याने माहिती देणे माझे कर्तव्य आहे , मी सर्वाना काळजीपोटीच आपल्याला या सुचना देतो. आपण आता अगदी निर्णायक टप्प्यावर आलो आहोत. आपण कोरोनाचा प्रादुर्भाव जर आत्ताच रोखला नाही तर जगात होते आहे तसे थैमान होईल. एक लक्षात घ्या, कालचा दिवस होता त्यासाठी मी आपल्याला धन्यवाद दिलेच आहे. सर्वांनी जनता कर्फ्यू चांगला पाळला. थाळ्या, घंटा वाजविल्या पण हे सगळे कोरोनाला घालविण्यासाठी नव्हते तर वैद्यकीय क्षेत्रात सतत काम करीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी होते. काल राज्यात १४४ कलम लावले होते आता मला राज्यात संचार बंदी लावावी लागते असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज जाहीर केले.
खासगी वाहने अत्यावश्यक कारणांसाठी असेल तरच सुरु राहतील. रिक्षा, टैक्सी यामधील प्रवाशांची संख्या मर्यादित असेल. काल आपण इतर राज्याच्या सीमा बंद केल्या होत्या आज आपण राज्यातील जिल्ह्यांच्या सीमा देखील बंद करीत आहोत. या वाहतूक बंदीत खासगी वाहने देखील आली. देशांतर्गत विमानतळ तत्काळ बंद करावे अशी विनंती मी पंतप्रधानांना केली आहे. जीवनावश्यक वस्तू, औषधे, अन्न धान्य तसेच त्यांची ने आण करणारी वाहने सुरु राहतील. पशू खाद्य मिळेल, पशूंचे दवाखानेही उघडे राहतील. कृषीमालाशी सबंधित वाहतूक सुरु राहील. खुपदा विनंती करूनही पालन होत नसल्याने मला नाईलाजाने हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
सर्व धर्मीयांची प्रार्थना स्थळे पूर्णपणे बंद राहतील. प्रसंगी आशा, अंगणवाडी, होमगार्ड्स यांना देखील वैद्यकीय बाबतीत प्रशिक्षण देऊन तयार करीत आहोत. सर्व माध्यमांना देखील मी धन्यवाद देतो. कोरोनाविषयी आपण चांगली जनजागृती करीत आहात. ज्यांना प्रादुर्भाव झालेला नाही त्यांनी देखील काळजी घेणे खूप आवश्यक आहे. घरी विलगीकरण केलेल्यांनी सरकारच्या सूचना पाळायच्या आहेत. ही कठोर पाउले केवळ जनतेच्या हितासाठी घेतल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, अ‍ॅक्युपंक्चर उपचार शिक्षणाच्या विस्तारासाठी राज्य शासन प्रयत्नशील मी स्वतः पाठदुखीने त्रस्त असताना या उपचार पद्धतीचा लाभ

अ‍ॅक्युपंक्चर उपचार पद्धतीतून असंख्य रूग्णांना आपल्या व्याधीपासून मुक्त होण्यास मदत झाली आहे. तेवीस-चोवीस वर्षांपूर्वी मी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *