पर्वत आणायला गेल्यासारखे जाऊ नका, नाहीतर पोलिसरूपी हनुमान घेवून जातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा

मुंबई: प्रतिनिधी

‘कोरोना’च्या रुग्णसंख्येत दररोज शेकड्यांनी वाढ होत आहे. ही वाढ चिंताजनक आहे. नागरिकांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून वर्तन ठेवलं पाहिजे. शासनाने राज्यातील काही भाग सीलबंद करण्याचे निर्णय घेतले आहेत. बंदीआदेश जारी केले आहेत. तरीही लक्ष्मणाचे प्राण वाचविण्यासाठी हनुमानाने जसा औषधी झाडासह पर्वत आणला तसे आणण्यासाठी बाहेर पडला तसे बाहेर पडू नका असा विनंती करत नाहीतर पोलिस रूपी हनुमान तुम्हाला घेवून जाईल असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देत   बंदीआदेशांचं उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन तुरुंगात टाकलं जाईल असा सज्जड दमही त्यांनी आज भरला.

कोरोनाच्यासंदर्भात शासन यापुढे अधिक धोका पत्करणार नाही. कोरोनाप्रसारास कारणीभूत ठरणाऱ्यांवर गंभीर गुन्हे दाखल होतील आणि त्यांना परिणाम भोगावे लागतील असा देत हनुमानासारखे पर्वत उचलण्याची नाही तर, हनुमान जयंतीला घरातच थांबण्याची गरज असून उद्या घराबाहेर न पडण्याचे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान मुस्लिम बांधवांनीही उद्याच्या शब्ब-ए-बारातसाठी घराबाहेर पडू नये, पूजा, अर्चा, प्रार्थना घरातच करावी असे आवाहन त्यांनी केले.

कोरोना संसर्गाची  साखळी  तोडणे आणि नागरिकांचा जीव वाचवणे हे पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपासून  देशातील प्रत्येक व्यक्तीचं आज एकमेव कर्तव्यं आहे. त्यासाठी घराबाहेर न पडणं, बाहेरील व्यक्तीच्या संपर्कात न येणं, कोरोनाला प्रसाराची संधी न देणं आणि कोरोनाची साखळी तोडणं, ही आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.

About Editor

Check Also

प्रकाश आबिटकर यांची माहिती, पॅलियेटिव्ह केअर आरोग्यसंपन्न महाराष्ट्रासाठी आणखी एक पाऊल पॅलियेटिव्ह केअर कार्यक्रम शुभारंभ व मेनोपॉज क्लिनिकचे राज्यस्तरीय लोकार्पण

राज्यातील जनतेला दर्जेदार आरोग्य सेवा देत आरोग्य संपन्न महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्य शासनाने आरोग्य सेवेत आणखी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *