आर्थिक वर्ष संपत येत असल्याने, तसेच नवीन वर्षानिमित्त मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांना वेग येण्याची शक्यता आणि महसूल वसुलीच्या इष्टांकाची पूर्तता करण्यासाठी राज्यातील दुय्यम निबंधक कार्यालये सार्वजनिक सुट्यांच्या दिवशीही सुरू ठेवण्याचा निर्णय नोंदणी व मुद्रांक विभागाने घेतला आहे. महाराष्ट्राचे नोंदणी उपमहानिरीक्षक (मुख्यालय) यांनी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, २६, २८, २९ आणि ३१ मार्च २०२६ या चार …
Read More »मुंबईत दुचाकी वाहनांसाठी ‘MH01FH’ नवीन नोंदणी मालिकेची सुरुवात प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून माहिती जाहिर
प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) येथे दुचाकी व चारचाकी वाहनांची नोंदणी केली जाते. सध्या दुचाकी खासगी परिवहनेत्तर (2W NT) वाहनांसाठी वापरात असलेली ‘MH01FG’ ही नोंदणी मालिका पूर्ण झाल्याने आता ‘MH01FH’ ही नवीन मालिका सुरू करण्यात येत असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी निखील साळुंखे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 मधील सुधारित नियम …
Read More »महाराष्ट्राच्या जनतेच्या विकासात समृद्धीची पहाट घडवण्याचा एकनाथ शिंदे यांचा संकल्प ठाण्यातील पारंपरिक नववर्ष स्वागत शोभायात्रेत उपमुख्यमंत्र्यांसह शहरातील प्रमुख नेत्यांचा उत्स्फूर्त सहभाग
“महाराष्ट्रातील प्रत्येक घरावर आनंदाची, प्रगतीची आणि विकासाची गुढी अभिमानाने उभारली पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. शेतकरी, कष्टकरी, तरुण आणि माता-भगिनी यांच्या जीवनात आशेचा नवा किरण निर्माण करून त्यांना यशाच्या उंच शिखरावर नेणे, हा आमचा संकल्प आहे. सामान्य माणसाच्या स्वप्नांना बळ देत त्याच्या आयुष्यात स्थैर्य, समृद्धी आणि आत्मविश्वासाची नवी पहाट उगवावी, …
Read More »उदय सामंत यांची माहिती, बीएमसी क्षेत्रात एक लाख ४१ हजार ३५६ कोटी रुपयांची विकास कामे सुरू शासनाकडील देय रक्कम महापालिकेस टप्प्याटप्प्याने देणार
मुंबईच्या विकासासाठी आणि नागरिकांना आवश्यक पायाभूत सुविधा देण्यासाठी शासन आणि महानगरपालिका यांच्यात समन्वयाने काम सुरू आहे. मुंबई महापालिकेत सुमारे एक लाख ४१ हजार ३५६ कोटी रुपयांची पायाभूत सुविधांची विकास कामे सुरू असून मुंबई महापालिकेस शासनाकडून देय असलेली देय रक्कम टप्प्याटप्प्याने दिली जाईल, असे उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांनी विधान परिषदेत …
Read More »डॉ. आंबेडकर बीडीडी चाळ संकुलातील ८६४ पुनर्वसन सदनिकांचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १६ मार्चला वितरण पुनर्वसन सदनिकांमध्ये निवृत्त पोलिस, त्यांचे वारस व कार्यरत पोलिस कर्मचाऱ्यांच्या ४२३ सदनिकांचा समावेश
आशियातील नागरी पुनरुत्थानाच्या सर्वात मोठ्या बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील नायगाव येथील प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात पूर्ण झालेल्या ५ पुनर्वसन इमारतींतील एकूण ८६४ पात्र रहिवाशांना प्रातिनिधिक स्वरुपात सदनिकांचे वितरण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर, नरीमन पॉइंट येथे सोमवार, १६ मार्च, २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता करण्यात येणार …
Read More »माधुरी मिसाळ यांचे आश्वासन, अग्निसुरक्षा परवानगीची चौकशीत दोषी आढळल्यास विकासकावर कारवाई जोगेश्वरीतील प्रकरणी राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे आश्वासन
मुंबईतील जोगेश्वरी येथील मे.ज्ञानप्रकाश शुक्ला डेव्हलपर्स एलएलपी या बांधकाम प्रकल्पाला देण्यात आलेल्या अग्निसुरक्षा परवानगीबाबत उपस्थित झालेल्या शंकांच्या पार्श्वभूमीवर तपासणीचे आदेश देण्यात आले असून, दोषी आढळल्यास संबंधित विकासकावर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत दिली. सदस्य प्रकाश सुर्वे यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. या अनुषंगाने झालेल्या …
Read More »उदय सामंत यांचे आश्वासन, मुंबईतील उंच इमारतींसाठी अग्निसुरक्षा व्यवस्था सक्षम करण्यात येणार विधान परिषदेत अर्धातास चर्चेला उत्तर देताना दिली माहिती
मुंबईमध्ये वाढत्या उंच इमारतींच्या पार्श्वभूमीवर अग्निसुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत सांगितले. नियम ९२ अन्वये अर्धा तास चर्चेत सदस्य प्रविण दरेकर यांनी याबाबत सूचना उपस्थित केली होती. मंत्री उदय सामंत म्हणाले, उंच इमारतींमध्ये आधुनिक अग्निसुरक्षा प्रणाली अनिवार्य करण्यात आली असून …
Read More »डॉ पंकज भोयर यांचे आश्वासन, पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प रहिवाशांच्या प्रश्नावर लवकरच विशेष बैठक विधानसभेत चर्चेच्या वेळी दिले आश्वासन
मुंबईतील गोरेगाव येथील सिद्धार्थ नगर-पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातील रखडलेल्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी लवकरच गृहनिर्माण मंत्र्यांच्या दालनात सर्वसमावेशक बैठक आयोजित करण्यात येईल, असे राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधानसभेत सांगितले. आमदार सुनील प्रभू यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते. राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर म्हणाले की, २००८ साली स्थानिक रहिवाशांनी हा …
Read More »माधुरी मिसाळ यांची माहिती, १० हजार बसची आवश्यकता बेस्ट बससेवेबाबत मुंबईतील आमदारासमवेत बैठक घेणार
मुंबईतील बेस्ट बससेवाबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी मुंबईतील सर्व स्थानिक आमदार यांच्यासमवेत बैठक घेण्यात येईल. या बैठकीस परिवहन विभागाचे अधिकारी यांनाही बोलवण्यात येईल असे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. याबाबत सदस्य सुनील शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला. तर सदस्य प्रवीण दरेकर, सचिन अहिर यांनी उपप्रश्न उपस्थित केला. राज्यमंत्री माधुरी …
Read More »आयएएस अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई केल्यानंतर सामान्य प्रशासन विभागाचे पत्र वेळेत हजर रहा आणि विधिमंडळात बसत जा
राज्य विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारी रोजी पासून सुरु झाले. मात्र त्यानंतरच्या पहिल्या दोन दिवसातच राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आयएएस अधिकारी एम के सिंग यांना अचानक एका विषयावर चर्चा करण्यासाठी आणि माहितीचे ब्रिफींग घेण्यासाठी विधिमंडळातील मंत्री कार्यालयात पाचारण करण्यात आले. सदर अधिकाऱ्यांस जवळपास चार ते पाच वेळा बोलवणे धाडूनही …
Read More »
Marathi e-Batmya