भारत बंद: दलित, डाव्या संघटनांचा मुंबईत मोर्चा दादर प्लाझा ते चैत्यभूमी दरम्यान काढलेल्या हजारो मोर्चेकरी सहभागी

मुंबई : प्रतिनिधी

देशातील दलित-आदीवासी समाजावर करण्यात येणाऱ्या अन्यायाला प्रतिबंद करणाऱ्या अँट्रोसिटी कायद्यात शिथिलता आणणारा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने देत या दोन्ही समुदायाचे सामाजिक अस्तित्व धोक्यात आले. या निकालाच्या विरोधात केंद्र सरकारने पुर्नविचार याचिका दाखल करावी या मागणीसाठी मुंबईत दलित समाजातील सर्व सघटना, डावे पक्ष आणि संघटनांनी दादर प्लाझा ते चैत्यभूमी दरम्यान निषेध मोर्चा काढला.

या मोर्चात जाती अंत संघर्ष, भीम आर्मी, भाकप, माकप, लाल बावटा युनियन यासह अनेक संघटना यात सहभागी झाल्या होत्या. यावेळी मोर्चेकऱ्यांकडून न्यायालयाच्या निकालाविरोधात पुर्नविचार याचिका केंद्र सरकारने दाखल करावी यामागणी संदर्भात घोषणा दिल्या जात होत्या. तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधातही घोषणा देण्यात येत होत्या. या संयुक्त निषेध मोर्चात हजारो कार्यकर्त्ये सहभागी झाले होते. चैत्यभूमी येथे पोहचल्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.

दरम्यान, दुपारी वांद्रे येथील उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर भीम आर्मीच्यावतीने मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी भीम आर्मीचे असंख्य कार्यकर्त्ये या मोर्चात सहभागी झाले होते.

 

About Editor

Check Also

रुग्णालयाच्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यावर शिंदे गटाच्या शिवसैनिकांचा पुन्हा एकदा हल्लाबोल दही हंडीच्या दिवशी जखमी गोविंदाला डिस्चार्ज देण्यावरून पालघरमधील रुग्णालयातील घटना

जखमी गोविंदाला डिस्चार्ज देण्यावरून पालघरच्या रुग्णालयात रात्री उशिरा शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांचा डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांशी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *