माजी पोलिस महासंचालक बनले महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष

राज्याचे माजी पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांना त्यांच्या निवृत्तीनंतर राज्य सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष पदाचा कार्यभार सोपविला आहे. त्यानंतर रजनीश सेठ यांनी प्रभारी अध्यक्ष डॉ.दिलीप पांढरपट्टे यांच्याकडून कोकण भवन, नवी मुंबई येथे आज पदभार स्वीकारला. यावेळी त्यांनी गोपनीयतेची शपथ घेतली. आयोगाचे प्रभारी अध्यक्ष डॉ. पांढरपट्टे यांनी सेठ यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

यावेळी आयोगाचे सदस्य डॉ. पांढरपट्टे, डॉ.अभय वाघ, डॉ.सतीश देशपांडे, आयोगाच्या सचिव डॉ.सुवर्णा खरात, सहसचिव सुभाष उमराणीकर, सहसचिव सुनील अवताडे, उपसचिव मारुती जाधव, देवेंद्र तावडे, चंद्रशेखर पवार, संजय देशमुख, विपुल पवार, संशोधन अधिकारी राजश्री भिसे आदी उपस्थित होते.

आयोगाच्या सचिव डॉ. खरात यांनी सेठ यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या रचना व कार्यपद्धती विषयी संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती दिली. ही माहिती समजून घेतल्यानंतर रजनीश सेठ यांनी आयोगाचा कारभार हा आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करीत अतिशय शिस्तबध्दतेने, पारदर्शकपणे करु, असे आवाहन आयोगाच्या सदस्यांना व अन्य अधिकाऱ्यांना केले.

About Editor

Check Also

मुंबईतील १२ अग्निशमन अधिकारी, जवानांना राष्ट्रपती पदके प्रदान राज्यपालांच्या हस्ते अग्निशमन सेवा सप्ताहाचे उदघाटन

राष्ट्रीय अग्निशमन दिनानिमित्त आज राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकभवन मुंबई येथे अग्निशमन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *