मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नी आझाद मैदानावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे. आज सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आंदोलकांनी रस्त्यांवर आणि रस्त्यांवर गोधळ घालू नये असे आवाहन करत मी तुम्हाला आरक्षण घेऊन देण्यासाठी मी इथे बसलोय ना मग समाजाच नाव घालविण्यासारखे वागू नका असेही आंदोलकांना सांगत सरकारकडून लवकरात लवकर आरक्षण मिळावे यासाठी आज मी उपोषण करताना पाणी घेत आहे. पण उद्यापासून पाणी घेणेही बंद करणार असल्याचे सांगत क़डक उपोषण आंदोलन करणार असल्याचे यावेळी जाहिर केले.
पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, राज्य सरकारशी चर्चा केल्याप्रमाणे अद्याप सरकारकडून ठोस असे निर्णय़ घेण्यात आलेला नाही. त्यामुळे समाजाला आरक्षणाबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा यासाठी उपोषणाचे आंदोलन कडक करणार असल्याचेही यावेळी जाहीर करत मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीचा आदेश घेतल्याशिवाय मुंबईतून हटणार नाही असा इशाराही यावेळी देत काहीही झाले तरी मी ओबीसी समाजाताूनच मराठा आरक्षण मिळविणारच असेही यावेळी जाहिर केले.
यावेळी बोलताना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी राज ठाकरे यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता मनोज जरांगे पाटील म्हणाले की, दोघे भाऊ चांगले आहेत. ठाकरे ब्रॅण्ड चांगला आहे. पण राज ठाकरे यांना उद्देशून, त्यांना कोणी सल्ला मागितला होता का, कोणी त्यांना मराठवाड्यात आले नाहीत म्हणून कधी विचारलं का मग मराठ्यांच्या प्रश्नात आड कशाला येता असा सवाल करत पहिल्यांदा त्यांना ११ ते १३ आमदार निवडूण दिले. पण ते सगळे पळून गेले. त्यांचा पोरगा निवडणूकीला उभा राहिला, त्याला पाडलं. त्यांच्या घरी एकदा का फडणवीस चहा पिहुन गेले की पक्षाचा सत्यानाश झाला तरी चालतो असे सांगत आमच्या ग्रामीण भागात कुजक्या कानाचा अर्थात हलक्या कानाचा असल्याची टीकाही यावेळी राज ठाकरे यांच्यावर केली.
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच केलेल्या मराठा समाजाविषयकच्या वक्तव्याबाबत विचारले असता मनोज जरांगे पाटील म्हणाले की, चंद्रकांत पाटील काय शहाणा आहे का असा खोचक सवाल करत त्याची राजकिय कारकिर्दच संपवून टाकेन असा इशारा देत मागील वेळी मराठा विद्यार्थ्यांनी जे जात प्रमाणपत्र दाखल केले होते तेव्हा त्यांच्या जात पडाळणीचे प्रमाणपत्र ह्याच चंद्रकांत पाटील यांनी रोखले होते. त्यामुळे ते जर शाणे असते तर त्याच पदावर राहिले असते काढून टाकले नसते असा उपरोधि टोला लगावत चंद्रकात पाटील तुम्ही उगाच मराठ्यांच्या शिव्या खावू नका असा इशाराही यावेळी दिला.
तसेच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्याबाबत विचारले असता मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आपल्याकडे चिचुंद्री असते माहित आहे का ती दिसायला लाल असते, सारखी ची ची आवाज करत इकडे -तिकडे सारखं पळत असती. तीला चार पाय आणि तिचे तोंड लाल असते. रात्र झाली, उणं वाढली, किधीही तिचं तोंड लालच असते. ती काय बोलते हे कळत नसतं पण ती सारखं ओरडत फिरत असते अशी खोचक टीकाही नितेश राणे यांचे नाव न घेता यावेळी केली. तसेच पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, तसं मी दादाला सांगितलं होतं की याला आवारा म्हणून पण आता आंदोलन झाल्यावर त्याच्याकडे बघतो असा इशाराही यावेळी दिला.
Marathi e-Batmya