मुंबई

देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल, उद्धव ठाकरेंचे एक चांगले काम दाखवा

उद्धव ठाकरेंनी महापालिकेची सत्ता असताना गेल्या २५ वर्षांत मुंबईसाठी केलेले एक चांगले काम दाखवावे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. कांदिवली येथील निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. झालेल्या सभेत देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी मुंबई …

Read More »

मतदारांच्या तक्रारींचे निवारण करण्यात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्यापासून भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर प्राप्त तक्रारींचे तातडीने निवारण करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील मतदारांकडून आतापर्यंत १४ हजार ७५३ इतक्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यांपैकी १४ हजार ३६८ तक्रारींचे निवारण करण्यात आले असल्याची माहिती निवडणूक कार्यालयामार्फत देण्यात आली आहे. देशात मतदारांच्या तक्रारींचे निवारण करण्यामध्ये महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर …

Read More »

राज ठाकरे म्हणाले, व्याभिचाराला राज मान्यता देऊ नका…मोदींना बिनशर्त पाठिंबा

दरवर्षी प्रमाणे यंदाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढी पाढवा मेळावा आज दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर आयोजित करण्यात आला होता. मागील काही दिवसांपूर्वी राज ठाकरे हे दिल्लीत अमित शाह यांच्या भेटीला गेले होते. तसेच राज ठाकरे हे भाजपासोबत जाणार असल्याची अटकळही बांधली जात होती. त्यामुळे आज मनसेच्या गुढी पाढवा मेळाव्यात राज …

Read More »

ऐन निवडणूकीच्या धामधुमित सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

महाराष्ट्रासह देशभरात लोकसभा निवडणूकीच्या प्रचारातील काँग्रेस आणि भाजपामधील आरोपा प्रत्यारोपामुळे राजकिय वातावरण चांगलेच तापत आहे. यापार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने राज्यातील ६ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. या सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये अंशू सिन्हा यांची नियुक्ती महाराष्ट्र बाल हक्क आयोगावर करण्यात आली आहे. तर दिलीप गावडे यांची डेअरी डेव्हलमेंटच्या …

Read More »

मतदानासाठी खासगी कार्यालयांनी सुटी न दिल्यास कारवाई

मतदानाकरिता मुंबई उपनगर जिल्ह्यातील उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापनांवरील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुटी अथवा सवलत न दिल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबधित आस्थापनांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ करिता मुंबई उपनगर जिल्ह्यात …

Read More »

संध्या सव्वालाखे यांचा आरोप, महिला आयोगाच्या कार्यालयाचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून गैरवापर

महिलांवर होणार्‍या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी तसेच महिलांच्या हक्कासाठी महिला आयोग काम करत असते. परंतु महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या कार्यालयाचा वापर आता राजकीय कार्यक्रमासाठी केला जात असून महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर या आयोगाच्या कार्यालयातूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचे काम आहेत, त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे …

Read More »

अॅड प्रशांत भूषण यांचे मत, निवडणूक प्रक्रियेत व्यापक सुधारणांची आवश्यकता 

इलेक्टोरल बाँड मुळे सत्ताधारी पक्षाला सर्वाधिक निधी मिळाला. यातून निवडणुकीत एक विषम संधी निर्माण झाली. हे एका अर्थाने लोकशाही तत्त्वाच्या विरोधी आहे. यात कोठेही पारदर्शक्ता नव्हती, त्यामुळे हा कायदा रद्द होणे अटळच होते. पण या बरोबरच निवडणूक प्रक्रियेत अनेक सुधारणा करण्यात आल्या पाहिजेत असे मत ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांनी …

Read More »

महाराष्ट्र लोकसेवा आयोग लवकरच ‘या’ परिक्षांच्या तारखा जाहीर करणार

सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण विचारात घेऊन नव्याने आरक्षण निश्चिती करून लवकरच सुधारित परिक्षांच्या तारखा जाहीर करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कळविले आहे. राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरीता आरक्षण अधिनियम, २०२४, २६ फेब्रुवारी, २०२४ मधील तरतुदीनुसार २६ फेब्रुवारी, २०२४ पूर्वी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत,जाहिरात प्रसिद्ध होऊन …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांच्या चिरंजीवाची उमेदवारी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जाहिर

लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता जाहिर झाल्यापासून राज्यातील सत्तास्थानी असलेल्या शिवसेना शिंदे गटाला किती जागा, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला किती जागा सोडणार याबाबत प्रसारमाध्यमातून तर्क-वितर्क लढविले जात होते. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एका मतदारसंघात जाहिर करण्यात आलेला उमेदवार बदलण्याची नामुष्की आली. तर दुसऱ्या बाजूला स्वतःच्याच मुलाच्या अर्थात डॉ श्रीकांत शिंदे यांना …

Read More »

सीबीएसईने पुन्हा एकदा ११ वी आणि १२ वीचा अभ्यासक्रम बदलला शैक्षणिक संचालक जोसेफ इम्युन्युअल यांची माहिती

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० शी संरेखित करण्यासाठी २०२४-२५ शैक्षणिक सत्रापासून सुरू होणाऱ्या इयत्ता ११ आणि १२ वीच्या वर्षअखेरीच्या परीक्षांच्या स्वरूपामध्ये बदल केले आहेत. सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार, बोर्डाने गेल्या वर्षीच्या तुलनेत सक्षमतेवर आधारित प्रश्नांचे वेटेज १०% ने वाढवले आहे आणि लहान आणि दीर्घ स्वरूपाच्या …

Read More »