मंत्रालयातील आयएएस दांपत्याच्या तरूण मुलीने केली आत्महत्या इमारतीच्या १० व्या मजल्याववरून रात्री ३ वाजता उडी मारून आत्महत्या

मंत्रालयात सनदी अधिकारी असलेल्या पती पत्नी अधिकाऱ्यांच्या २६ वर्षीय मुलीने पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास राहत्या इमारतीच्या १० व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज घडली. इतक्या रात्री पहाटे तीन वाजता इमारतीच्या १० व्या मजल्यावरून आत्महत्या करण्याचे काय, इतक्या मध्यरात्री असे काय घडले की, मुलीने आत्महत्या केली अशी चर्चा या निमित्ताने मंत्रालयातील अधिकाऱ्यांमध्ये सुरु झाली आहे.

मागील काही वर्षापासून मंत्रालयात उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव असलेले विकास रस्तोगी हे आयएएस अधिकारी आणि त्यांची पत्नी राधिका रस्तोगी या गृह विभागातील कायदा व सुव्यवस्था विभागाच्या प्रधान सचिव असलेल्या आयएएस अधिकारी पती-पत्नीच्या मुलीने आत्महत्या केल्याने मंत्रालयातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले. विशेष म्हणजे आत्महत्येचे माहिती कळताच मंत्रालयातील जवळपास सर्वच आयएएस अधिकाऱ्यांनी सकाळचे सर्व कार्यक्रम रद्द करून आयएएस अधिकाऱ्यांच्या मुलीच्या अंत्यविधीच्या कार्यक्रमाला हजर राहिले.

आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव लिपी रस्तोगी वय वर्षे २६ असे असून हरियाणातील सोनीपत येथे एलएलबीचे शिक्षण घेत होती. तिचे आईवडील हे दोघे ही सनदी अर्थात आयएएस अधिकारी आहेत. मंत्रालयातील सनदी अधिकाऱ्यांमध्ये या दोघांचे सन्मानने नाव घेतले जाते. या दोन्ही अधिकाऱ्यांकेडे महत्वाची जबाबदारी असल्याने दोन्ही अधिकाऱ्यांना मंत्रालयासमोरच्या इमारतीत सुरुची इमारतीत निवासस्थान देण्यात आले. मात्र याच इमारतीच्या १० व्या मजल्यावरून लिपी रस्तोगीने पहाटेच्या ३ वाजता उडी मारून आत्महत्या केल्याची नोंद मरिन लाईन्स पोलिस ठाण्यात करण्यात आली.

लिपी रस्तोगीने उडी मारून आत्महत्या केल्याचे माहिती इमारतीच्या सुरक्षा रक्षांनी तिच्या घरच्यांना कळविण्यात आले. त्यानंतर तिच्या घरच्यांनी सीएसएमटी येथील सेंट जॉर्ज रूग्णालयात दाखल केले. मात्र रूग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन सेंट जॉर्ज रूग्णालयात करण्यात आले. तसेच लिपी रस्तोगी हीच्यावर चंदनवाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून लिपी रस्तोगी ही नैराश्यात गेली होती. त्यामुळे तीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. मंत्रालयातील सनदी अधिकाऱ्यांच्या मुलाने अशा पध्दतीचे आत्महत्या करण्याचा हा दुसरा प्रकार असून यापूर्वी मनिषा म्हैसकर आणि मिलिंद म्हैसकर यांच्या मुलानेही अशीच आत्महत्या केली होती. त्यानंतर रस्तोगी दांम्पत्याच्या लिपी रस्तोगीने केलेली ही दुसरी आत्महत्या आहे.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीसांना पीएपीच्या सदनिकांसाठी का होईना हाऊसिंग स्टॉकचा पर्याय 'हाउसिंग स्टॉक' मधील घरांच्या प्रभावी उपयोगासाठी धोरण तयार करण्याचे दिले आदेश

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून आगामी काळातील हाऊसिंग स्टॉकचा प्रश्न भेडसावू शकतो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *