महाराष्ट्र व हरियाणा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे सरकार हे लोकांनी दिलेल्या मतदानावर आलेले नाही तर निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी करुन आलेले सरकार आहे. मतचोरी कशी केली याचे पुरावे काँग्रेस पक्षाने आयोगाला देऊनही त्यावर काहीच कारवाई होत नाही. काँग्रेस पक्षाने घेतलेले आक्षेप योग्यच आहेत हे आयोग पुन्हा पुन्हा सिद्ध करत आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे परिपत्रक निवडणूक आयोगाने काढले आहे आणि हे परिपत्रक म्हणजेच मतचोरी केल्याचा आणखी एका पुरावा असल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला.
यासंदर्भात प्रतिक्रीया देताना अतुल लोंढे म्हणाले की, निवडणूक आयोगाची चोरी पुन्हा पकडली आहे. आपण अपराधी आहोत, चोरी करत आहोत याचा पुरावा ते देत आहेत. महाराष्ट्रात चोरी पकडली गेली आहे. मतचोरीचे पुरावे लपवण्यासाठी आयोगाने कायद्यातही बदल केले. चंदिगड उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही आयोगाने सीसीटीव्ही फुटेज, मशिन रिडेबल व्होटर लिस्ट संदर्भातील कायदा बदलला. आता महाराष्ट्रातील निवडणुकीचे रेकॉर्ड नष्ट करण्यासाठी एक परिपत्रक काढले असल्याचे सांगितले.
अतुल लोंढे पुढे बोलताना म्हणाले की, लोकांनी दिलेल्या मतदानावर हे सरकार आलेले नाही तर चोरीचे सरकार महाराष्ट्र व हरियाणात आणलेले आहे, हे या परिपत्रकावरून स्पष्ट होते. आता बिहारमध्ये चोरीचा वेगळा प्रकार सुरु केला आहे, यांना आम्ही सोडणार नाही. लोकशाहीमध्ये लोकांनी निवडून दिलेले सरकार आले पाहिजे, मतदानाची चोरी केलेले सरकार संविधान संमत असू शकत नाही असेही स्पष्ट केले.
निवडणूक आयोग महाराष्ट्रात निवडणुकीत झालेल्या गडबड घोटाळा लपविण्याचे कारस्थान करत आहे.याचाच अर्थ अप्रत्यक्षपणे आपला अपराध मान्य करत आहे.
महाराष्ट्र विधानसभा चुनाव में चुनाव आयोग ने जो धाँधलियों को अंजाम दिया उसे छुपाने की कोशिश में जुट गया है
कांग्रेस और प्रत्याशीयो ने मांगा… pic.twitter.com/cBjDuJ0CfL— Atul Londhe Patil (INDIA Ka Parivar)🇮🇳 (@atullondhe) July 8, 2025
Marathi e-Batmya