भाजपाची बी-टीम आहे की नाही हे काँग्रेस-राष्ट्रवादीने सांगावे वंचित आघाडी प्रमुख अँड.प्रकाश आंबेडकरांचा सवाल

मुंबईः प्रतिनिधी
लोकसभा निवडणूकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपची बी टीम असल्याचा आरोप करण्यात येत होता. मात्र आता त्यांच्याकडून आघाडीत समाविष्ट करण्याबाबत चर्चा करण्यात येत आहेत. परंतु आम्ही भाजपची बी टीम आहोत का याचे स्पष्टीकरण सर्वात आधी कॉग्रेस-राष्ट्रवादीने करावे असा सवाल वंचित आघाडीचे प्रमुख अँड.प्रकाश आंबेडकर यांनी केला.
भारिप-बहुजन संघाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
लोकसभा निवडणूकीच्या वेळी मुस्लिम समाजाची मते आम्हाला मिळाली नाहीत. मात्र आमची मते एमआयएम पक्षाच्या उमेदवारांना मिळाली. परंतु विधानसभा निवडणूकीच्या वेळी अशी घटना पुन्हा घडणार नसून तो पक्ष वंचितमध्ये अद्यापही असल्याचे त्यांनी सांगितले.
वंचित आघाडीच्या उमेदवारांना लोकसभा निवडणूकीत चांगली मते मिळाली असून ४८ मतदारसंघांपैकी किमान २२ मतदारसंघात वंचितला चांगली मते मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.
त्याचबरोबर वंचितला झालेले प्रत्यक्ष मतदान आणि ईव्हीएम मशिन्समध्ये पडलेले मतदान यात फरक आहे. त्यामुळे मशिन्सबाबत आमचा आक्षेप अद्यापही असल्याचे त्यांनी सांगितले.

About Editor

Check Also

वर्षा गायकवाड यांचा सवाल, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग कधी पूर्ण होणार? मुंबईला देशातील प्रमुख शहरांशी जोडणाऱ्या सर्व राष्ट्रीय महामार्गांच्या कामांना विलंब का ?

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु होऊन १५ वर्षे झाली तरी अद्याप हा महामार्ग पूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *