ईव्हीएम मतदान पद्धतीवरून सोलापूर जिल्ह्यातील मरकडवाडी येथील ग्रामस्थांनी ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर मतदान करण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच प्रसंगी प्रशासनाबरोबर संघर्षाची तयारीही ठेवली आहे. त्यातच माळशिरसचे निर्वाचित आमदार उत्तम जानकर यांनीही जर मतपत्रिकेवर मतदान घेण्याचे राज्य सरकारने तयारी दर्शविली तर मी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूकीला सामोरे जाण्यास तयार असल्याचेही यावेळी जाहिर केले. त्यातच मारकडवाडी गावाला आज राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी भेट देत गावोगावी मतपत्रिकेवर मतदान घेण्याचे ठराव मंजूर करा असे आवाहन केले. त्यामुळे भाजपाच्या विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहे. यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट शरद पवार यांच्यावर पलटवार करत निवडणूकांमधील मतांची आकडेवारीच एक्सवर ट्विट केली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे आपल्या एक्सवर ट्विट करत म्हणाले की, शरद पवार साहेब मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी कायम वेगवेगळ्या पक्षांना साथ दिली. तुमच्या माहितीसाठी २०१४, २०१९ आणि २०२४ ची मतांची आकडेवारी देत आहे जरा डोळे उघडून नीट वाचा असा खोचक टीकाही यावेळी केली.
चंद्रशेखर बावनकुळे पुढे आपल्या ट्विट मध्ये म्हणाले की, २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढलेल्या विजयसिंह मोहिते पाटील यांना ५३३ मतं मिळाली तर महायुतीतील घटकपक्ष असलेल्या सदाभाऊ खोत यांना ६६४ मतं मिळाली होती. त्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या हनुमंत डोळस यांना २९४ मते मिळाली तर अपक्ष अनंत खंडागळे यांना ९७९ मते मिळाली. २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपच्या रणजितसिंह निंबाळकर यांना ९५६ मतं मिळाली तर राष्ट्रवादीच्या संजय शिंदे यांना ३९५ मतं मिळाली. मात्र त्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र राष्ट्रवादीकडून लढलेल्या उत्तमराव जानकर यांना १३४६ मतं मिळाली तर भाजपाकडून लढलेल्या राम सातपुते यांना ३०० मतं मिळाल्याचे सांगितले.
पुढे आपल्या ट्विटमध्ये चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या धैर्यशील मोहिते पाटील यांना १०२१ मतं तर भाजपाच्या रणजितसिंह निंबाळकर यांना ४६६ मतं मिळाली विधानसभा निवडणुकीत मात्र राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उत्तमराव जानकर यांना ८४३ मतं तर भाजपाच्या राम सातपुते यांना १००३ मतं मिळाली. या आकडेवारीवरून स्पष्ट होत की, मारकडवाडी ग्रामस्थांनी कधी राष्ट्रवादीला साथ दिली, कधी अपक्ष तर कधी भाजपाला साथ दिली. त्यामुळे हे गाव कुणा एकाची मक्तेदारी नाही अशी आठवणही यावेळी करून दिली.
शेवटी चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, यावेळी लोकांनी आणि लाडक्या बहिणींनी तुम्हाला नाकारलं. त्यामुळे उगाच भ्रम पसरवून ईव्हीएमवर खापर फोडू नका. जरा मारकवाडी येथे झालेल्या मतांची आकडेवारी डोळे उघडून वाचा म्हणजे तुमचं डोकं ठिकाणावर येईल असा टोलाही यावेळी लगावला.
Sharad Pawar Saheb, the residents of Markadwadi have always supported different political parties. For your information, I am presenting the election data from 2014, 2019, and 2024. Please read it carefully.
In the 2014 Lok Sabha elections in Markadwadi village, NCP candidate… pic.twitter.com/Lbs2YhevZW
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) December 8, 2024
Marathi e-Batmya