मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, मराठवाडा आणि सोलापूरातील धरणातून पाण्याचा विसर्ग पूरपरिस्थितीचा आणि धरणातील विसर्गाची घेतली माहिती

मराठवाड्यातील पूरस्थिती आणि राज्यातील विविध धरणांचा विसर्ग याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. काल रात्री सुद्धा ते स्थानिक प्रशासन आणि जलसंपदा विभागाच्या संपर्कात होते. आज सकाळी पुन्हा त्यांनी जलसंपदा विभागाकडून एकूणच राज्याच्या स्थितीचा आढावा घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विट करत दिलेल्या माहितीनुसार जायकवाडी धरणातून १,८८,००० क्युसेक इतका विसर्ग सुरु आहे. सुदैवाने पाऊस बंद झाल्याने आता विसर्ग वाढविण्याची गरज नाही. आज रात्री ८ पर्यंत हे पाणी नांदेडपर्यंत पोहोचेल. सर्व संबंधित जिल्हाधिकार्‍यांना यंत्रणा सतर्क ठेवण्याचे आदेश दिले असल्याचेही यावेळी सांगितले.

त्याचबरोबर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, येलदरी धरणातून २९,४०० क्युसेक इतका विसर्ग होतो आहे आणि तो पूर्णपणे नियंत्रणात आहे. मांजरा आणि तेरणा नद्यांचा पूर आता ओसरला आहे पश्चिम महाराष्ट्रातील स्थिती नियंत्रणात आहे. उजनीतून ७५,००० इतका विसर्ग होत असून, सीना कोळेगावमधून ८०,००० क्युसेक इतका विसर्ग करण्यात येत असल्याचेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, नाशिक: गंगापूर धरणातून ११,००० क्युसेक इतका विसर्ग होत असून, मुळा धरणातून १०,००० क्युसेक विसर्ग सुरु आहे. पाऊस आता कमी झाला आहे. जायकवाडी धरणातून नाशिक, नगर भागातील धरणातून विसर्ग ८७,००० वरुन ६८,००० क्युसेकवर नियंत्रित केला आहे. तसेच जळगाव जिल्ह्यातील गिरणा धरणातून ५४,५०० क्युसेक इतका विसर्ग सुरु असून, हतनूर धरणातून ६५,८०० क्युसेक इतका विसर्ग सुरु आहे. त्याचबरोबर कोकणातील सर्व नद्या इशारा पातळीच्या खाली असल्याचेही यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

महाराष्ट्र शासन आणि ब्रिस्टॉल विद्यापीठ यांच्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार गुणवंत विद्यार्थ्यांसाठी १०० टक्के शिष्यवृत्ती

महाराष्ट्रातील गुणवंत विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या उच्च शिक्षणाच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *