वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, वाद केलाच पाहिजे असं आहे का… अनेक वर्षे झाली, दोन्ही समाज सोबतच

राज्यात औरगंजेबाच्या कबरीवरील निर्माण झालेला वाद शांत होत नाही तोच आता नवा वाद रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीसमोरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरील वाद पुढे आला आहे. या समाधीवरून कोल्हापूरचे संभाजी राजे छत्रपती यांनी वाघ्या कुत्र्याच्या बाबत इतिहासात कोणताही पुरावा नसल्याचे सांगत ती समाधी राज्य सरकारने हटवावी अशी मागणी केली. तर ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके यांनी त्या समाधीसाठी होळकरांनी पैसे दिल्याचे सांगत समाधी हटविण्यास विरोध केला आहे. दरम्यान या दोघांच्या भूमिकेनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात पहिल्यांदाच भाष्य करत म्हणाले की, वादाचे कारणच नाही. वाद वाढवायचे कारणच नाही असे सांगितले.

पंढरपूर येथे विठ्ठल रूक्मीणीचे दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बोलत होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गेली अनेक वर्षे दोन्ही समाज सोबत आहेत. त्यामुळे वाद घालायचे कारण नाही. शिवाजी महाराजांच्या समाधीसमोरील त्या समाधीबाबत चर्चेतून मार्ग काढता येऊ शकेल. पण कारण नसताना दोन्ही समाजात वाद निर्माण होण्याचे किंवा वाद वाढविण्याचे कारण नाही असेही यावेळी सांगितले.

देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत इतिहास तज्ञांकडून काय माहिती येते, किंवा त्याबाबत दावे केले जातात हे तपासणी केली जाईल. मात्र त्या समाधीसाठी होळकर राजाने पैसै दिले होते. त्यामुळे तो असाच काढून टाकणार यावरून समाजात रोष देखील आहे. इतकी वर्षे झाले वाघ्याची समाधी त्या ठिकाणी आहे. त्यावर सर्वांशी चर्चा करून वाद न करता मार्ग निघू शकतो. प्रत्येक गोष्टीत वाद केलाच पाहिजे असं काही आहे का असा सवालही केला.

पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, वाद करण्याचं काही कारण नाही. सगळ्यांनी बसून मार्ग काढावा, उगाच दोन समाज एकमेकांसमोर उभे टाकल्याचे दिसतात, इकडे धनगर समाजा, इकडे मराठा समाज वेगळा असं काहीही नाही. सगळे समाज एकमेकांसोबतचे समाज आहेत. त्यामुळे याबाबतीत वाद करणं अयोग्य असून याबाबत बसून मार्ग काढला पाहिजे असे मतही यावेळी व्यक्त केले.

तसेच याप्रश्नी संभाजीराजे छत्रपती यांना वेळ देत नसल्याची तक्रार केली असल्याचे विचारताच मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मी त्यांना अनेकवेळा वेळ दिलेली आहे. पण त्यांना तसे वाटत नाही. मी दर वेळेस वेळ देतो, ते माझ्याशी फोनवरही बोलतात मला येऊनही भेटतात त्यामुळे वेळ न मिळण्याचं कारणच नसल्याचेही यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

औषध निरीक्षक परीक्षा पेपरफुटीप्रकरणी आरोपांवर एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांचा खुलासा एमपीएससी पेपरफुटी प्रकरणी वैयक्तिक आरोप झाल्यानंतर खुलासा केला

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून माझ्याविरोधात वैयक्तिक आरोप करण्यात येत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *