विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या वरिष्ठ निरीक्षकांची नियुक्ती अशोक गेहलोत, भूपेश बघेल, चरणजितसिंह चन्नी, सचिन पायलट यांच्याकडे विभागनिहाय जबाबदारी

मुंबई व कोकण विभागासाठी राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत व डॉ. जी. परमेश्वर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विदर्भासाठी छत्तिसगडचे माजी मुख्यमंत्री भुपेश बघेल, पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीतसिंह चन्नी, उमंग सिंघर यांची नियुक्ती केली आहे.

मराठवाड्यासाठी राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट व तेलंगाणाचे मंत्री उत्तमकुमार रेड्डी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रासाठी टी. एस. सिंगदेव व एम. बी. पाटील तर उत्तर महाराष्ट्रासाठी डॉ. सय्यद नासीर हुसेन व डी. अनसुया सिथक्का यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकूल वासनिक व अविनाश पांडे हे या निवडणुकीसाठी वरिष्ठ समन्वयक असतील असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने जाहीर केले आहे.

About Editor

Check Also

वंचितकडून २३ जुलै रोजी ‘महाराष्ट्र बंद’चे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांची घोषणा

काल दिल्लीत शांततेने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष हल्ल्याच्या आणि लाठीचार्जच्या पार्श्वभूमीवर, त्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *