गांधी कुटुंबियांची एसपीजी सुरक्षा काढण्याचा निर्णय राजकीय सूडबुद्धीतून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी
काँग्रेस अध्यक्षा खा. सोनिया गांधी, खा. राहुल गांधी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांची एसपीजी सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने राजकीय सूडबुद्धीने घेतला आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
भाजप सरकारच्या या विद्वेषी कृतीचा तीव्र निषेध करून ते म्हणाले की, विरोधी पक्षांशी राजकीय सुडबुद्धीने वागणे ही मोदी शाह यांच्या नेतृत्वाखालील भाजपची कार्यपद्धती राहिली आहे. मोदी, शाह यांना विरोध आणि विरोधी पक्षच मान्य नाही, म्हणून ते सातत्याने विरोधी पक्षांना संपवण्याचा प्रयत्न करत आहेत हे देशातील जनता पहात आहे. गांधी कुटुंबातील दोन सदस्य देशाचे पंतप्रधान इंदिरा गांधी व राजीव गांधी अतिरेकी हल्ल्यात शहीद झाले याचा भाजप सरकारला विसर पडला आहे का? असा संतप्त सवाल करून सरकारने सूडाचे राजकारण थांबवून गांधी कुटुंबियांना एसपीजी सुरक्षा प्रदान करावी असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

About Editor

Check Also

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद महाराष्ट्रातून ४३२ अर्ज सादर

महाराष्ट्र शासनाच्या पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभागाकडून आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *