मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, बदल्यांचे नव्हे तर बदल करण्याचे राजकारण राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूरच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार

राज्यात भाजपाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रालयातील पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, यावेळचे राजकारण खूप वेगळे राहणार आहे. मला बदल्यांचे नाही तर बदल घडविण्याचे राजकारण करायचे असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मागच्या पाच वर्षात खुप काही राजकारण पाहिले. यावेळी पूर्णपणे राजकारण वेगळे असेल. मी आधीच सांगितले की, मला बदल्यांचे नाही तर बदल दाखवेल असे राजकारण करायचे आहे. विरोधकांची संख्या कमी आहे. हे खरे आहे. पण विरोधकांचा आवाजावर किंवा संख्येवर मुल्यमापन करणार नाही. त्यांनी योग्य विषय मांडले तर त्या विषयाला तेवढ्याच प्रकारचा सन्मान देऊ. स्थिर सरकारचे पाच वर्षे पहायला मिळतील. त्यामुळे जनतेला स्थिर सरकार देण्याची जबाबदारी आमची असल्याचेही यावेळी सांगत २०१९ ते २०२२ च्या मध्यापर्यंत राज्याला जे वेगवेगळे बदल दिसले तसे धक्का यापुढे लागू नयेत ही जनतेची अपेक्षा आम्ही पूर्ण करू अशी ग्वाहीही यावेळी दिली.

देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, महाराष्ट्राचे पूर्वी जे राजकारण होते. ते पुन्हा कसे योग्य करता येईल याचा प्रयत्न सर्वच राजकिय पक्षांना करावा लागेल. आजच शपथविधीचे निमंत्रण सर्वच माजी मुख्यमंत्र्यांना दिले होते. तसेच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनाही शपथविधीचे निमंत्रण स्वतः फोन करून दिले होते. मात्र त्यांच्या वैयक्तिक कार्यक्रमामुळे येऊ शकले नाहीत. महाराष्ट्रातला राजकिय संवाद संपलेला नाही. दक्षिणेतल्या प्रमाणे आपल्याकडे महाराष्ट्रात राजकारण होत नाही असेही यावेळी सांगितले.

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत विचारले असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबईच्या विशेष अधिवेशनातच विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात येईल. तसेच ही निवड झाल्यानंतर राज्यपालांचे अभिभाषण व्हावे लागते. त्यामुळे ७,८ आणि ९ डिसेंबर रोजी आमदारांचे शपथविधी होतील. ९ डिसेंबरला अध्यक्षाची निवड होईल आणि त्याच तारखेला राज्यपालांनी अभिभाषण करावे असे निवेदन राज्यपालांना पाठविल्याचे सांगत नागपूरच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार असून कोणाच्या वाट्याला किती मंत्रिपद मिळणार याचा आकडा फ्रिज करण्यात आल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

About Editor

Check Also

अतुल लोंढे यांचा आरोप, एमपीएससी मधून सरळ सेवा भरतीने अधिकारी बनवण्याच्या तरुणांच्या स्वप्नावर भाजपा बुलडोझर

भाजपाचे मनुवादी सरकार जेन-झी विरोधी आहे. नीट पेपर फुटी प्रकरण अद्याप ताजे असताना राज्यातील भाजपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *