शालिनीताई पाटील यांची भविष्यवाणी, तर अजित पवार तीन महिन्यात तुरूंगात

राज्यात १०५ कोटींचा भ्रष्टाचार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला असून त्यांच्याविरुद्ध न्यायालयात धाव घेणार आहोत असे सांगतानाच स्वार्थासाठी उपमुख्यमंत्री मिळविण्यासाठी बंद करणारे अजित पवार पुढील तीन महिन्यात अजित पवार तुरुंगात दिसतील त्यांना कोणत्याही निवडणूका लढविता येणार नाही असा खळबळजनक दावा माजी मंत्री शालिनी पाटील यांनी केला.

शालिनीताई पाटील म्हणाल्या की, मी अजित पवार यांच्याविरुद्ध पुढील १० दिवसांत उच्च न्यायालयात तीन अर्ज दाखल करणार आहोत, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार शिखर बँकेच्या २५ हजार कोटींच्या घोटाळ्यातील मुख्य सुत्रधार अजित पवार आहेत. याप्रकरणी ताबडतोब दोषारोपपत्र ठेवा. आम्ही एफआयआर दाखल केलं आहे, त्यांच्यावर चार्जशीट ठेवा आणि अजित पवारांना न्यायालयात उभं करा, १०५ कोटींचा भ्रष्टाचार केलेला हा माणूस आहे म्हणून, महाराष्ट्र सरकारच्या मुख्य सचिवांकडे पहिला अर्ज करणार अशी माहितीही दिली.

पुढे बोलताना शालिनीताई पाटील म्हणाल्या की, ५ वर्षे फुकट गेल्यामुळे हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात घेण्याची विनंती आम्ही न्यायालयात करणार आहोत. माझी प्रॉपर्टी ईडीच्या ताब्यात आहे, ती प्रॉपर्टी परत आमच्या ताब्यात द्यावी, अशी मागणी आम्ही दुसऱ्या अर्जातून करणार आहोत. मोदींवर माझा विश्वास राहिला नाही, शिंदे-फडणवीस सरकार व्यवस्थित चाललं असताना तुम्ही अजित पवारांना उपमुख्यमंत्री केलं हे योग्य नाही, असे मतही व्यक्त केलं.

वसंतदादा पाटील यांच्याविरोधात झालेल्या बंडावर शालिनीताई पाटील म्हणाल्या, शरद पवार यांनी त्यावेळी केलेले बंड आणि अजित पवार यांचे बंड यामध्ये जमिन अस्मानाचा फरक आहे , पक्षातील आमदार दुसरी कडे जाऊ नये याकरीता होतं. तर अजित पवारांचं बंड स्वार्थासाठी उपमुख्यमंत्री मिळविण्यासाठी होतं त्यानंतर त्यांना कुठल्याही निवडणुका लढवता येणार नाहीत. कारण, २०२४ मध्ये लोकसभा, विधानसभा या निवडणुका होत आहेत, अशी टीकाही केली.

अजित पवार यांच्यावर टीका करताना शालिनीताई पाटील म्हणाल्या की, ज्या माणसाने सख्ख्या चुलत्य़ाचा, ज्याने तुम्हाला लहानाचं मोठं केले त्याचा विश्वासघात करतो त्याच्यावर लोक विश्वास का ठेवतील ?, अजितदादां सोबत गेलेली माणसं कोणत्या लायकीचे आहेत. त्यातील बाकीचे आमदार पुन्हा शरद पवारांकडे जातील. तुरुंगात आजीवन कारावास भोगून आलेल्या व्यक्तीसोबत जे होते. त्याला निवडणूक लढवता येत नाही अशी खोचक टीकाही केली.

About Editor

Check Also

खासदार वर्षा गायकवाड यांची मागणी, मुंबईत ४० टक्केही मॅपिंग झालेले नाही, ते पूर्ण करा

लोकशाही व्यवस्थेत निवडणुका हा एक उत्सव आहे, या उत्सवात सर्वांचा सहभाग असला पाहिजे परंतु एसआयआर मोहिम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *