ठाणे महानगरपालिकेच्या निवडणूकीतील विजयानंतर एमआयएमच्या मुंब्रा येथील उमेदवार सहर शेख यांनी विजयी कार्यक्रमात बोलताना कैसा हराया, अभी हम लोगोंको पूरे मुंब्रा को हरा कर देना है असे वक्तव्य केले. या वक्तव्यावरून भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यासह काही हिदूत्ववादी संघटनांच्या स्वयंघोषित नेत्यांनी या वक्तव्यावर आक्षेप घेत सहर शेख यांच्यावर टीकेची झोड उठवली. तसेच सहर शेख यांच्याकडून माफीची मागणी केली. त्यावरून एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलिल यांनी सहर शेख हिच्या वक्तव्याची पाठराखण केली आणि आता संपू्र्ण महाराष्ट्र हिरवा करू असे वक्तव्य केले. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुंब्र्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे मुब्रा भागातूनच आमदार म्हणून निवडूण येतात. एमआयएमचे पाच नगरसेवक या परिसरातून निवडूण आल्याने आव्हाड यांना हा धक्का मानला जात आहे.
सहर शेख यांनी केलेल्या वक्तव्यामुळे हिंदूत्ववादी संघटनेच्या नेत्यांनी सहर शेख यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. मुंब्रा पोलिसांनी त्या अनुषंगाने सहर शेख यांची चौकशीही केली. त्यामुळे सहर शेख यांनी त्यानी केलेले वक्तव्य हे पक्षाचा झेंडा आणि निशाणीच्या अनुषंगाने असल्याचा खुलासा देत माफीनामा लिहून दिला. त्यानंतर पोलिसांनी सदर प्रकरण दप्तरी दाखल करून घेतले.
दरम्यान, एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलिल हे मुंब्रा येथे सहर शेख यांची भेट घेत पाठराखण केली. तसेच प्रसारमाध्यमांशी बोलताना इम्तियाज जलिल म्हणाले की, भाजपाचे आमदार निते राणे यांनी भडकावू भाषण केले. अमहमदनगरचा अजित पवार गटाचा नेता मुस्लिम बांधवाबाबत वादग्रस्त वक्तव्य करतो.भाजपाची एक महिला पदाधिकारी वादग्रस्त विधाने करते तर पोलिसांनी अशा किती जणांना नोटीस बजावली, यांना कायदा वेगळा आहे आणि आम्हाला वेगळा आहे का असा सवाल करत एखादा तोतला चार-पाच लोक घेऊन येतो म्हणून तुम्ही नोटीस देता. मी मुंब्रा पोलिसांना सांगू इच्छितो की, या पेक्षा दहा पट लोक घेऊन येऊ शकतो असा इशाराही यावेळी दिला.
पुढे बोलताना इम्तियाज जलिल म्हणाले की, आम्हाला राजकारण करायचे नाही. आम्ही निवडणूक जिंकून आलेलो आहोत. आमची ताकद वाढलेली आहे. सर्व जाती, धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालण्याची माणची भूमिका आहे. मात्र आमच्या एका मुलीने केलेल्या विधानानंतर त्यावरून इतका गदारोळ घातला जात आहे की, बाकीचे प्रश्न संपले आणि हाच एक प्रश्न राहिलेला आहे. दररोज भाजपाचे नेते, कार्यकर्त्ये वादग्रस्त विधाने करतात, तर काही जण आम्हाला पाकिस्तानात जायचे असल्याचे सांगतात मग महाराष्ट्र पोलिस त्यांचे गुलाम झालेले आहे मुंब्रा पोलिस इतके घाबरलेले आहेत की, चार पाच लोक येऊन दबाव टाकतात आणि त्यावर नोटीसी दिल्या जातात का सवालही यावेळी केला.
इम्तियाज जलिल पुढे बोलताना म्हणाले की, आमच्यावर तक्रारी दाखल केल्या जात आहेत. कारवाईची भाषा केली जात आहे. पण कोणत्या कायद्यांतर्गत कारवाई करणार, कोणत्या कलमाखाली याची नोंद सहार शेख हीने केलेल्या वक्ताव्यापासून माघार घेणार नाही. आम्ही पूर्म ताकदीने उभे आहोत, आणि येणाऱ्या काळात हिरवा रंग अधिक व्यापकपणे पसरवू असा विश्वासही यावेळी व्यक्त केला.
Marathi e-Batmya