आदित्य ठाकरे यांनी सांगितले एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांच्या बंडामागील ‘हे’ कारण केवळ स्वतःची जागा वाचविण्यासाठी आणि पैशांसाठी तिकडे गेले

राज्यातील सत्तांतरावरून एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार आणि १० अपक्षांनी मूळ शिवसेनेतून बाहेर पडण्याच्या घटनेला जवळपास नऊ महिने पूर्ण झाले. नेमक्या याच कालावधीत एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मोठे विधान करत बंडखोरी करण्यापूर्वी एकनाथ शिंदे हे उध्दव ठाकरे यांचे खाजगी निवासस्थान असलेल्या मातोश्री या निवासस्थानी येत रडल्याचा दावा केला. तसेच संबधित ४० आमदार केवळ स्वतःची जागा वाचविम्यासाठी पैशासाठी तिकडे गेल्याचा गौप्यस्फोट केला.

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीवर भाष्य करताना आदित्य ठाकरे म्हणाले, हे चाळीस लोक त्यांच्या स्वत:च्या जागांसाठी आणि पैशांसाठी भाजपाबरोबर गेले. बंडखोरी होण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असणाऱ्या ‘मातोश्री’वर आले होते. मातोश्रीवर येऊन एकनाथ शिंदे रडले होते, असे सांगत उध्दव ठाकरे यांनी त्यांना विचारले होते की, आम्हाला जे ऐकायला मिळतेय ते खरे आहे का, त्यावर शिंदे म्हणाले होते की तिकडून मोठा दबाव आहे, आम्हाला तुरुंगात पाठविण्याच्या धमक्या मिळत आहेत. पण आम्ही भित्रे नाही आहोत आम्ही सोडून जाणार नसल्याचेही आठवण आदित्य ठाकरे यांनी सांगितली.

आदित्य ठाकरे म्हणाले, तिकडे जाण्याचं दुसरं कोणतंही कारण नव्हतं. केंद्रीय तपास यंत्रणा अटक करतील, म्हणून सध्याचे मुख्यमंत्री मातोश्रीवर येऊन रडले होते. भाजपाबरोबर चला नाहीतर मला अटक होईल, असं त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं असा गौप्यस्फोटही आदित्य ठाकरे यांनी केला. तिकडे जाण्याचं दुसरं कोणतंही कारण नव्हतं. केंद्रीय तपास यंत्रणा अटक करतील, म्हणून सध्याचे मुख्यमंत्री मातोश्रीवर येऊन रडले होते. भाजपाबरोबर चला नाहीतर मला अटक होईल, असं त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं.

वास्तविक पाहता एकनाथ शिंदे हे सोडून जाणार असल्याची माहिती आमच्या कानावर येत होती. त्यामुळे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी त्यांच्या मनात नेमकं काय आहे हे जाणून घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांना मातोश्रीवर बोलावून घेऊन जाणून घ्या असे सांगितले होते. त्यावेळी एकनाथ शिंदे यांना बोलाविल्यानंतर पुढील घटना घ़डल्याचे स्पष्ट केले.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, तिसऱ्या मुंबईच्या विकासाला आंतरराष्ट्रीय भागीदारीमुळे गती मिळणार रायगड-पेण ग्रोथ सेंटरमध्ये १०० एकरांचा जागतिक दर्जाचा मिश्र-वापर विकास प्रकल्प, मॅपलट्रीकडून १.१ अब्ज डॉलरपेक्षा अधिक FDI अपेक्षित; सुरबाना ज्युराँगची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती

मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) आणि त्यापलीकडील परिसर हा देशाच्या आर्थिक विकासाचे प्रमुख केंद्र बनण्याची क्षमता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *