महेश तपासे यांचा दावा, निवडणुकीआधी महायुती फुटणार…? भाजपाने अजित पवार यांना काळे झेंडे दाखवले

सत्तेचा मलिदा चाखण्यासाठी भाजपाने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी फोडून महायुतीचे सरकार स्थापन केले असा थेट घणाघाती हल्ला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी भाजपावर करत काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाने काढलेल्या जनसन्मान यात्रेत भाजपाने काळे झेंडे दाखविले. तर भाजपाचे मंत्री कुचकामी असल्याची टिका उघडपणे शिवसेना शिंदे गटाचे नेते करीत आहेत यावरून महायुती निवडणूक आधी महायुती फुटणार असल्याचा दावा प्रवक्ते महेश तपासे यांनी केला.

पुढे बोलताना महेश तपासे म्हणाले की, राज्यातील मविआचे सरकार पाडण्यासाठी प्रथम शिवसेना, त्यानंतर शरद पवार यांची ताकद कमी करण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी फोडली. तरी देखील जनतेने लोकसभा निवडणुकीमध्ये विद्यमान महायुती सरकारला त्यांची जागा दाखवून दिल्याची आठवण करून देत काल जनसन्मान यात्रेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाजपाने काळे झेंडे दाखवले. तर शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी भाजपाच्या नेत्यांवर हल्लाबोल केला. या दोन्ही गोष्टी महायुतीमध्ये झालेल्या महा बिघाडीचे संकेत असल्याचे सांगत महायुती विधानसभा निवडणुकी फुटणार असे भाकीत केले.

महेश तपासे पुढे बोलताना म्हणाले की, महायुती मधील घटक पक्षांमध्ये अजिबात समन्वय नाही, एकमेकांच्या बद्दल आदर नाही, राज्यातील सामान्य व्यक्ती केंद्रबिंदू मानून त्याच्या हिताची जपणूक करून काम करण्याची वृत्ती नाही फक्त सत्तेचा मलिदा चाखणे व स्वतःवर झालेल्या केसेज बंद करून घेणे एवढ्याच उद्दिष्टासाठी महायुती स्थापन झाली असा हल्लाबोलही केला.

शेवटी महेश तपासे म्हणाले की, शिंदे सरकारने जाहीर केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न परस्पर अजित पवार करत असल्यामुळे त्यांच्यावर मुख्यमंत्री शिंदे तसेच दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहे. सरकारी खर्चातून होणाऱ्या या योजनेला विरोधी पक्षातील नेत्यांना खासदारांना, आमदारांना का बोलवलं जात नाही असा सवाल ही करत अजित पवार यांच्या राष्टवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेत मुंबईत अनूशक्ती नगर येथे गंभीर आरोप असलेले आमदार नवाब मलिक यांनी यात्रेचे स्वागत करणार असल्याचे जाहिर केले. यात्रेतील त्यांच्या उपस्थितीवरून महायुतीत यावरून वाद होण्याची चिन्ह आहेत. तर नवाब मलिक यांच्या राष्ट्रवादी अजित पवार गटात अर्थात सत्तापक्षातील समावेशा बाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापुर्वीच स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे महायुतीत गडबडी असल्याचे दिसून येत असल्याचेही यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचा सल्ला, ‘उद्योजक होताना टाटांचा आदर्श ठेवा’ रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा

आजच्या काळात विद्यार्थ्यांनी केवळ पदवी मिळवणे पुरेसे नाही, तर ती पदवी रोजगारात रूपांतरित होणे आवश्यक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *