महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता जाहिर झाली आहे. विधानसभा निवडणूकीबरोबरच राज्यातील लोकसभेच्या रिक्त झालेल्या जागांसाठी पोट निवडणूकही केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहिर केली. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे लोकसभा सदस्य राहिलेले वसंतराव चव्हाण यांचे निधन झाल्याने त्यांच्या जागेवर वसंतराव चव्हाण यांचे चिरंजीव रविंद्र चव्हाण यांना उमेदवारी काँग्रेसकडून जाहिर करण्यात आली आहे.
नांदेडचे माजी काँग्रेस नेते अशोक चव्हाण जी भूमिका घेतील ती आणि देतील ते उमेदवार आतापर्यंत निवडूण येत राहिला आहे. त्यामुळे मागील काही वर्षात अशोक चव्हाण हे खासदार तर त्यांच्या पत्नी आमदार आणि ते आमदार तर त्यांच्या पत्नी खासदार झाल्याचे पाह्यला मिळाले. मात्र अशोक चव्हाण यांच्या विरोधात भाजपाने ईडी आणि सीबीआयचे हत्यार उगारल्यानंतर अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा त्याग करत भाजपात प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेसने नांदेडमधून काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्त्ये वसंतराव चव्हाण यांना नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत उमेदवारी दिली. तसेच लोकसभा निवडणूकीत वसंतराव चव्हाण हे विजयीही झाले. मात्र लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर काही दिवसातच वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले. त्यामुळे वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर कोण ? अशी विचारणा सुरु झाली.
मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाने नांदेडसह अनेक रिक्त जागांसाठी पोटनिवडणूकांचा कार्यक्रम महाराष्ट्र आणि झांरखंडच्या विधानसभा निवडणूकांसोबत जाहिर केला. त्यामुळे नांदेड लोकसभेची जागा राखण्याासाठी काँग्रेसकडून स्व. वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र रविंद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहिर केली आहे. विशेष म्हणजे विधानसभेसाठी आणि लोकसभेच्या पोटनिवडणूकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.
दरम्यान, एमआयएम पक्षाकडून औरंगाबादचे माजी खासदार इम्तियाज जलिल यांना नांदेडमधून उमेदवारी जाहिर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे नांदेडमध्ये काँग्रेसचे रविंद्र चव्हाण विरूद्ध इम्तियाज जलिली यांच्यात सामना होणार आहे.
Marathi e-Batmya