ONGC विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा दोषींना जबाबदार ठरवून शिक्षा द्या – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी

तोक्ते चक्रीवादळाची सूचना मिळूनही ओएनजीसीने दुर्लक्ष केले आणि ७०० कामगारांचा जीव धोक्यात घातला त्यामुळे ३७ कामगारांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या ओएनजीसी विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन जो कोणी दोषी असेल त्यांना जबाबदार ठरवून शिक्षा द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली.

तोक्ते चक्रीवादळाचा धोका असल्याचे सरकार व संबंधित यंत्रणांनी अलर्ट दिलेला असताना ओएनजीसीने याकडे दुर्लक्ष केला. ७०० कामगारांचा जीव धोक्यात घातला. त्यातील एक बार्ज बुडुन ३७ कामगारांचा मृत्यू झाला तर अजूनही ४० कामगार बेपत्ता झालेले आहेत. अक्षरशः शेकडो कामगार मृत्यूशी झुंज देत होते. त्यांना भारतीय नौदलाने व तटरक्षक दलाने सुखरुप बाहेर काढले आहे. या सर्व घटनेला ओएनजीसी जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला.

दरम्यान काल बुधवारी हा प्रकार उघड झाल्यानंतर रात्री धर्मेद्र प्रधान चौकशी समिती नेमत आहेत. या चौकशी समितीने काही होणार नाही. जे जबाबदार अधिकारी आहेत त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणीही त्यांनी केली.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास, पायाभूत सुविधांच्या विकासामुळे २०३० पर्यंत पुणे देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ पुणे - शिरुर, तळेगाव - चाकण - शिक्रापूर व हडपसर - यवत या उन्नत मार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन

पुणे शहर हे भविष्यातील अत्याधुनिक तंत्रज्ञान (डीप टेक) आणि जागतिक क्षमता केंद्रांचे (जीसीसी) प्रमुख केंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *