राष्ट्रवादी पक्ष नंबर एकवर आणणार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा निर्धार

पालघरः प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तळागाळातील लोकांपर्यंत कार्यकर्त्यांनी समर्थपणे पाय रोवून कसा ठेवला आहे ते पाहण्यासाठी महाराष्ट्रभर फिरुन त्यांच्याशी संवाद साधत आहे. त्यामुळे या बळावर पक्ष एक नंबरवर आणण्यासाठी तुम्ही-आम्ही मिळून काम करुया असे आवाहन प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी पालघरमध्ये जिल्हा कार्यकारिणी मेळाव्यामध्ये केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील आणि माजी मंत्री गणेश नाईक यांचा आजपासून ५ ऑक्टोबरपर्यंत पालघर, ठाणे, कल्याण, नवीमुंबई दौरा सुरु झाला आहे. या दौऱ्यामध्ये पालघरमध्ये आज पहिली जिल्हा कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांशी जयंत पाटील आणि गणेश नाईक यांनी संवाद साधला आणि यावेळी पक्षबांधणी, वाढ आणि बुथ कमिटयांची बांधणी या कामावर कशापध्दतीने भर दिला पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले.
या मेळाव्यामध्ये माजी मंत्री गणेश नाईक, आमदार आनंद ठाकूर यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. जिल्हाध्यक्ष सुनिल भुसारा यांनी पक्षाची स्थिती आणि त्यावर कशापध्दतीने काम सुरु आहे याबाबत यावेळी माहिती दिली.
पालघरमध्ये कार्यकारिणी मेळाव्याला आमदार आनंद ठाकूर, कामगार नेते संजय वढावकर, जिल्हाध्यक्ष सुनिल भुसारा, प्रदेश चिटणीस संदीप वैद्य, जिल्हा सरचिटणीस अशोक चौधरी, महिला जिल्हाध्यक्षा निलमताई राऊत, शहर तालुकाध्यक्ष विरेंद्र पाटील आदींसह सर्व सेलचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष,नगरसेवक,पदाधिकारी उपस्थित होते.

About Editor

Check Also

सत्तेतले रेडे या ज्ञानेशाकडून आपले वेद वदवतायंत- राज ठाकरे

ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद वदवले होते. आता सत्तेतले रेडे या ज्ञानेशाकडून आपले वेद (?) वदवतायंत. असो, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *