सुपारी व नारळ झाडांच्या नुकसानीबद्दल मिळणार या नव्या रकमेनुसार मदत राज्य सरकारचा निर्णय

मुंबई: प्रतिनिधी

 निसर्ग चक्रीवादळामुळे पुर्णत: नष्ट झालेल्या  सुपारी व नारळाच्या झाडांना   विशेष बाब म्हणून   प्रति झाडाप्रमाणे  वाढीव दराने मदत देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

निसर्ग चक्रीवादळामुळे  रायगड व रत्नागिरी जिल्हयात नुकसान झालेल्या बहुवार्षिक पिकांपैकी  सुपारी व नारळाच्या झाडांना  प्रति हेक्टरी रू. 50,000/- या दराने मदत देण्याऐवजी  पुर्णत: नष्ट झालेल्या  सुपारी व नारळाच्या झाडांना प्रति झाड प्रमाणे खालील दराने मदत  देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.

सुपारी – रू ५०/- संपूर्ण नष्ट झालेल्या प्रति झाडासाठी

नारळ   – रू. २५०/- संपूर्ण नष्ट झालेल्या प्रति झाडासाठी

वरील दराने मदत देण्यासाठी होणारा संपुर्ण खर्च राज्य शासनाच्या निधीमधून करण्यास देखील मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

 

About Editor

Check Also

गुलाबराव पाटील यांचे आदेश, पाणीटंचाई निवारणासाठी युद्धपातळीवर उपाययोजना करा टँकर हा अंतिम पर्याय; जलस्रोत बळकटीकरण, नाला खोलीकरण, 75 टक्क्यांपेक्षा अधिक पूर्ण योजना तातडीने कार्यान्वित करा

संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन, जलस्रोतांचे बळकटीकरण, नाला खोलीकरण व जलसंधारणाची कामे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *