राजकारण

शिक्षणाची ऑनलाईन शाळा झाली सुरु, पहिले पंधरा दिवस होणार उजळणी शाळा बाह्य विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवाहात आणणार-शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील शाळा दरवर्षी सर्वसाधारणपणे १५ जूनला तर विदर्भात २६ जून पासून शाळा सुरु होतात. त्या प्रमाणे राज्यातील काही शाळांची ऑनलाईन सुरुवात झाली असून सर्व विद्यार्थ्यांचे नवीन शैक्षणिक वर्षात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्वागत केले. विद्यार्थ्यांसाठी पहिले पंधरा दिवस आणि पुढील एक महिन्यात मागील वर्षीच्या अभ्यासक्रमाची उजळणी …

Read More »

कैकाडी समाजाचा SC मध्ये समावेशासाठी केंद्राकडे पुन्हा शिफारस करणार सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कैकाडी समाजाचे क्षेत्रीय बंधन उठवून विदर्भाप्रमाणे उर्वरित महाराष्ट्रातील कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्यात यावा यासाठी येत्या पावसाळी अधिवेशनात विधिमंडळाचा ठराव घेऊन केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. कैकाडी समाजाचे क्षेत्रीय बंधन उठवून अनुसुचित जातीत …

Read More »

आशा सेविकांच्या जीवनाशी राज्य सरकार का खेळते आहे ? भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांचा सवाल

मुंबई : प्रतिनिधी कोरोना विरुद्धच्या लढाईत आपल्या जीवाची पर्वा न करता योगदान देणाऱ्या ‘आशा’ सेविकांच्या जीवनाशी न खेळता  सरकारने या कर्मचाऱ्यांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी मंगळवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मुख्य प्रवक्ते केशव …

Read More »

पुरूषोत्तम रामाच्या नावाने चंदा, हाच संघ परिवार व भाजपाचा धंदा दोन कोटींची जमीन काही मिनिटात १८.५ कोटींची कशी झाली ? सचिन सावंताचा सवाल

मुंबई: प्रतिनिधी अयोध्येत श्रीराम मंदिर निर्माणासाठी जमीन संपादनाच्या कामात घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. दोन कोटी रुपयाची जमीन अवघ्या काही मिनिटातच १८.५ कोटी रुपयांना विकत घेऊन मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या नावावर सर्व मर्यादा सोडून लज्जाहिनतेने भाविकांच्या श्रद्धेशी चालवलेला हा खेळ आहे. भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने रामाच्या नावावर लोकांच्या …

Read More »

उच्च न्यायालयाचे सरकारला आदेश शुल्क समितीबाबत प्रतिज्ञापत्र सादर करा आ. भातखळकर यांच्या जनहित याचिकेवर आदेश

मुंबई: प्रतिनिधी कोरोना काळात फी वाढ व सक्तीची फी वसुली करण्यास मनाई असताना सुद्धा अनेक शाळांनी अवाजवी फी वाढ करत सक्तीची फी वसुली चालवली आहे, तसेच वेळेत फी न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेस बसू न देण्याचा प्रकार अनेक शाळांनी चालविला. याविरोधात भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे अतुल भातखळकर यांनी दाखल …

Read More »

महाविकास आघाडीने पाठविलेल्या “त्या” १२ नावांची यादी राज्यपालांकडेच अनिल गलगली यांच्या आव्हान अपिलावर सुनावणीत पुढे आली माहिती

मुंबई: प्रतिनिधी विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ रिक्त जागांसाठी महाविकास आघाडीने पाठविलेल्या १२ जणांच्या नावाची यादी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडेच असल्याची धक्कादायक माहिती माहिती अधिकारातंर्गत झालेल्या सुणावनी दरम्यान पुढे आली. गतसरकारने नियुक्त केलेल्या राज्यपाल नियुक्त १२ जागांवरील विधान परिषद सदस्यांची मुदत पूर्ण झाली. त्यामुळे या रिक्त झालेल्या जागा भरण्यासाठी महाविकास …

Read More »

इंदू मिलमधील भारतरत्न डॉ. आंबेडकर स्मारकाच्या पुतळ्यासाठी नव्याने समिती सामाजिक न्यायमंत्र्यांनी घेतला स्मारकाच्या कामाचा आढावा

मुंबई: प्रतिनिधी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदुमिल येथील स्मारकाच्या कामाला गती देवून विहित कालावधीत स्मारकाचे काम पूर्ण व्हावे यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने तातडीने कार्यवाही करावी असे निर्देश देऊन स्मारकाचे काम पूर्ण करण्यासाठी तसेच पुतळा प्रतिकृती अंतिम करण्यासंदर्भातील गठीत समितीचे लवकरच पुर्नगठन करण्यात येईल अशी माहिती सामाजिक न्याय व विशेष …

Read More »

Learning Driving Licence हवाय, मग आरटीओत जाण्याची गरज नाही ई-गर्व्हनन्स कार्यप्रणालीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई : प्रतिनिधी शिकाऊ वाहनचालक परवाना आणि नवीन खाजगी दुचाकी व चार चाकी वाहनांची नोंदणी वितरकांमार्फत ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून देऊन परिवहन विभागाने जनहिताचे एक महत्वाकांक्षी पाऊल टाकले असून भविष्यातही शासकीय विभागांना ज्या सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून देणे शक्य आहे  त्या उपलब्ध करून देण्यासाठी ई गव्हर्नन्सवर आधारित नवीन कार्यपद्धतीचा अवलंब …

Read More »

केंद्रीय मंत्री आठवलेंनी मिसळला फडणवीसांच्या सूरात सूर प्रशांत किशोर यांच्या कोणी लागू नका नादी; २०२४ मध्ये प्रधानमंत्री बनणार आहेत नरेंद्र मोदी !

मुंबई: प्रतिनिधी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत कोणी कितीही स्ट्रॅटेजी ठरवू द्या २०२४ ला नरेंद्र मोदीच येणार असल्याचे भाकित केले. त्यात आता केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही आपला सूर मिसळत प्रशांत किशोर यांच्या …

Read More »

‘One Earth One Health’ आरोग्य सेवेची चांगली संकल्पना परंतु मिळणार कधी? राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांचा सवाल

मुंबई : प्रतिनिधी जी-७ मध्ये असलेल्या देशांसारखी आरोग्य सेवा आपल्या देशात ‘वन अर्थ वन हेल्थ’ यातून देण्याची संकल्पना पंतप्रधानांनी मांडलीय. परंतु ही सेवा किती दिवसात मिळणार याची वाट पहावी लागेल अशी खोचक टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली. शनिवारी जी-७ च्या बैठकीत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे …

Read More »