मुंबईः प्रतिनिधी एल्गार परिषदेचा तपास केंद्र सरकारने ज्या घाई गडबडीने एनआयएकडे दिला, त्यावरून हा निर्णय काळजी वाढवणारा आहे. पुरोगामी, दलित, आंबेडकरीवादी चळवळीला नक्षलवादी ठरवण्याचा केंद्र सरकारचा डाव असल्याचे यातून स्पष्ट दिसत असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला. हे व्यासपीठ पुरोगामी विचारांचे होते. तिथे …
Read More »गडचिरोलीतल्या नुकसानीची तेलंगणाकडून भरपाई घेवू जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची माहिती
मुंबईः प्रतिनिधी गडचिरोलीत धरणाचे पाणी जास्त येवून नुकसान झाले असेल तर त्याबाबत तेलंगणा राज्याला कळविण्यात येईल. तसेच झालेली नुकसानभरपाईही त्यांच्याकडून घेतली जाईल अशी माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. तेलंगणा राज्यातील मेलीकट्टा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गडचिरोली जिल्ह्यातील ८-९ गावे येतात. तेलंगणा राज्याने त्यासाठी तिथल्या जमिनीचे संपादन केलेले आहे. …
Read More »महाविकास आघाडीकडून शरद पवार पुन्हा राज्यसभेवर भाजपाची तिसरी जागा धोक्यात आणण्यासाठी आघाडीकडून दोन जण उतरणार
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यसभेवरील राज्यातील सात खासदारांची मुदत संपत आहे. या ७ पैकी ४ जागांवर महाविकास आघाडीचा उमेदवार उभे करण्यात येणार आहेत. तर ५ वा उमेदवार महाविकास आघाडीकडून संयुक्तरित्या उभा करण्यात येणार आहे. मात्र भाजपाकडून आतापर्यंत फक्त दोनच जणांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद …
Read More »पंतप्रधानाच्या जीवाला धोका होता तर तपासात काय मिळालं? राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भाजपावर टीका
मुंबईः प्रतिनिधी पुण्यातील एल्गार परिषद झाली. त्यानंतर कोरेगांव भीमा येथे दंगल उसळली. या दोन्ही घटना वेगवेगळ्या आहेत. मात्र त्यावेळच्या सरकारला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवाला धोका असल्याचं पत्र मिळालं. पंतप्रधान हे देशाचे सर्वोच्च असतात आणि त्यांच्या जीवाला धोका आहे म्हणणे हास्यास्पद असल्याची खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी …
Read More »गुजरात मॉडेल खोटा असल्यानेच भिंत बांधण्याची मोदी सरकारवर पाळी जाहीर निषेध करत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची टीका
मुंबईः प्रतिनिधी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अहमदाबाद भेटीवेळी तिथली गरिबी ट्रम्प यांना दिसू नये म्हणून मोठी भिंत बांधून गरिबी लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न मोदी सरकारकडून केला जात आहे. गुजरात विकासाचे मॉडेल म्हणून ढोल पिटणाऱ्या मोदींनीच गरीबी दिसू नये यासाठी केलेले मोदी सरकारचे हे कृत्य अमानवी असून काँग्रेस त्याचा जाहीर निषेध …
Read More »पवार म्हणाले, काँग्रेस राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यातील आश्वासने पूर्ण करा आगामी निवडणुकांवर लक्ष केंद्रित करण्याचे आदेश दिल्याची राष्ट्रीय प्रवक्ते मलिक यांची माहिती
मुंबईः प्रतिनिधी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनाम्यात जे मुद्दे होते. त्या मुद्द्यांची अंमलबजावणी करण्यासाठी ज्या मंत्र्याकडे कामे होती. त्यावर उपाययोजना करण्यात यावी आणि त्यातील आश्वासने पूर्ण करावी अशी स्पष्ट सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या मंत्र्याना केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे …
Read More »सरकारच्या विरोधात भाजपाचे २२ नव्हेतर २५ रोजी धरणे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची माहिती
मुंबईः प्रतिनिधी राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थानापन्न होवून ३-४ महिने झाले नाही तोच भाजपने या सरकारच्या धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. मात्र २२ फेब्रुवारी रोजी चौथा शनिवार असल्याने या दिवशी सर्व कार्यालये बंद असतात. त्यामुळे हे नियोजित आंदोलन २५ फेब्रुवारी रोजी राज्यातील सर्व तहसील कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करत जनजागृती करण्यात …
Read More »दलित, आदिवासी, मागासवर्गीयांना विरोध भाजपच्या डीएनएमध्येच काँग्रेस सरचिटणीस मल्लिकार्जून खर्गे यांची टीका
मुंबईः प्रतिनिधी दलित, आदिवासी, मागासवर्गींयांना असलेला भाजपाचा विरोध हा त्यांच्या डीएनएमध्येच आहे. त्याच मानसिकतेतून आरक्षण संपुष्टात आणण्यास त्यांनी सुरुवात केली. परंतु काँग्रेस पक्ष मागासर्गीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभा असून भाजपाचा हा डाव हाणून पाडण्यासाठी कोणताही संघर्ष करण्यास मागेपुढे पाहणार नसल्याचा इशारा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जून खर्गे …
Read More »विद्यार्थ्यांचे १६ शुल्क सरकार भरणार बहुजन कल्याण विभाग मंत्री विजय वडेट्टीवार
मुंबई: प्रतिनिधी विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासप्रवर्ग व विशेष मागासप्रवर्ग विद्यार्थ्यांसाठी आता 16 इतर शुल्कांचा समावेश केला असून त्याचे अनुदान अनुदानित व विनाअनुदानित/ कायम विनाअनुदानित महाविद्यालयांतील व्यावसायिक व बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा मिळणार असल्याची माहिती बहुजन कल्याण विभागाचे (ओबीसी) मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. सन 2005-06 पासूनच्या …
Read More »प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलाच्या निवडीवरून भाजपात धुसफुस पक्षाच्या निवडणूक प्रक्रियेला फाटा दिल्याची कार्यकर्त्यांची भावना
कोल्हापूर-मुंबईः विशेष प्रतिनिधी भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची माळ आपल्याच गळ्यात पडावी यासाठी राज्यातील नेत्यांकडून मोठ्या प्रमाणावर दिल्ली दरबारी मोर्चेबांधणी सुरु असतानाच दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी या पदाची माळ चंद्रकांत पाटील यांच्या गळ्यात टाकली. मात्र ही माळ टाकताना पक्षाच्या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेलाच बाजूला सारल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली असून त्याचा स्फोट आगामी अधिवेशनात होण्याची …
Read More »
Marathi e-Batmya