राजकारण

मंत्री आदीत्य ठाकरेंचा कोळसा खाण विक्रीला विरोध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळील खाण साइटच्या प्रस्तावित लिलावास केला विरोध

मुंबई : प्रतिनिधी चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळील खाण साइटच्या प्रस्तावित लिलावाच्या मुद्यावर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहून प्रस्तावित लिलावाला विरोध केला. आपल्या वन्यजीव कॉरिडॉरचा आपण असा नाश करू शकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. यापूर्वी दोन वेळा, एकदा १९९९ आणि …

Read More »

विद्यार्थ्यांना ऑनलाईन- ऑफलाईन शिक्षण मुख्याध्यापक, शिक्षकांच्या सूचना घ्या मुख्यमंत्री ठाकरे यांचे आदेश

मुंबई : प्रतिनिधी शालेय शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यानंतर विविध ऑनलाईन माध्यमांचे पायलट प्रॉजेक्ट सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्याप्रमाणे आज त्यांनी जिओ टीव्ही तसेच गुगल मीटद्वारे कशाप्रकारे ऑनलाईन वर्ग भरवता येतो त्याचे प्रात्यक्षिक पाहिले व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी या १ ली ते १२ पर्यतच्या सर्व …

Read More »

राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी राष्ट्रवादीचे ” हे ” नेते प्रयत्नशील माजी आमदारांसह निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून लॉबींग

मुंबई: प्रतिनिधी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होवून ६ महिन्याहून अधिक काळ झाला आहे. तसेच या महिन्यातच विधान परिषदेचे १२ सदस्य निवृत्त होत असून या रिक्त होणाऱ्या ठिकाणी आपली वर्णी लागावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधील तब्बल ६ जण प्रयत्न करत असून त्यातील तीन जणांसाठी दस्तुरखुद्द दोन मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील …

Read More »

सीईटीच्या परिक्षा पुढे ढकलल्या उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभागाच्या विविध विषयांच्या प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या (CET- सेल) माध्यमातून दरवर्षी उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभागाच्या विविध …

Read More »

अमित ठाकरेंनी लिहिले उपमुख्यमंत्री पवार आणि आरोग्य मंत्री टोपेंना पत्र आरोग्य सैनिक असलेल्या आशा सेविकांना सन्मानजनक मानधन द्या

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वाधिक मदत आणि पुढाकार घेणाऱ्या आरोग्यसेविका अर्थात आशा वर्करना इतर राज्यात चांगले मानधन मिळत असताना महाराष्ट्रात फारच कमी मानधन मिळते. त्यामुळे या आशावर्करना चांगले-सन्मान जनक मानधन द्यावे अशी मागणी मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना पत्र …

Read More »

शेतकऱ्यांना कर्जवाटप करा अन्यथा सोमवारपासून भाजपाचे आंदोलन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचा इशारा

मुंबई: प्रतिनिधी पावसाळा सुरू झाला तरी खरीप हंगामासाठीचे शेतकऱ्यांचे कर्जवाटप ठप्प आहे. शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने पुढाकार घेऊन ताबडतोब पीककर्जाचे वाटप सुरू करावे, कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी पूर्ण करावी या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी सोमवारपासून राज्यात ठिकठिकाणी “कर्जमाफी करा, पीक कर्ज द्या,” आंदोलन करणार असल्याचा इशारा  …

Read More »

कोरोनाने मृत्यु : महावितरणच्या कर्मचाऱ्यांना वारसांना ३० लाख रूपयांचे अनुदान ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांची घोषणा

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील सुमारे २ कोटी ६० हजार ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा व दर्जेदार सेवा देण्यासाठी कोरोनाच्या जीवघेण्या प्रादुर्भावात अविश्रांत कार्यरत असणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊन मृत्यू आल्यास त्यांच्या वारसांना ३० लाख रूपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. महावितरणमध्ये संचालन व दुरूस्तीच्या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कंत्राटी …

Read More »

पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एसआरए प्रकल्पांसाठी समिती स्थापनार गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची माहिती

पुणे :प्रतिनिधी पुणे तसेच पिंपरी चिंचवड क्षेत्रातील झोपडपट्टी पुनर्विकासासाठी समितीची स्थापना केली जाणार असून समितीच्या अभ्यासानंतर या दोन्ही शहरात झोपडपट्टी पुनर्विकासाचे पथदर्शी काम उभे करणार असल्याची माहिती गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाला भेट देऊन विविध पुनर्वसन प्रकल्पांची तसेच प्राधिकरणाच्या कामाची माहिती …

Read More »

कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जातेय, मृतकांच्या संख्येत पारदर्शकता नाही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना विरोधी पक्षनेते फडणवीसांनी केली लक्ष देण्याची मागणी

मुंबई: प्रतिनिधी मुंबईसह राज्यातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेलीय. ऑक्सीजन न मिळाल्यामुळे कोरोनारूग्णांचा मृत्यू ही त्याचेच द्योतक असून आजही या विषाणूमुळे मृत्यू पावणाऱ्यांच्या संख्येत अजूनही पारदर्शकता नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी करत या गोष्टींकडे लक्ष देण्याची मागणी आज पत्र पाठवित मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली. १९ जून २०२० रोजी …

Read More »

खुषखबर: अंतिम वर्षाच्या परिक्षा नाहीच मात्र ATKT चा निर्णय लवकरच उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून आदेश जारी

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील वाढत्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अव्यावसायिक व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परिक्षा घेणे अशक्य आहे. मात्र ज्या विद्यार्थ्यांना परिक्षा द्यायची असेल त्यांची परिक्षा घ्यावी असे स्पष्ट आदेश राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयात नमूद केले. तसेच ज्या विद्यार्थ्यांना परिक्षा न देता अभ्यासक्रमाचे पदवी (डिग्री) …

Read More »