राजकारण

ईव्हीएम विरोधात २१ ऑगस्टला विरोधात मोर्चा विरोधकांचा एल्गार

मुंबईः प्रतिनिधी ईव्हीएमविरोधात शंका उपस्थित करत आगामी विधानसभा निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्या अशी मागणी करत येत्या २१ ऑगस्ट २०१९ रोजी मुंबईत सर्वपक्षीय मोर्चा निघणार असल्याची माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. वांद्रे येथे झालेल्या पत्रकार परिषदेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, स्वाभिमानी पक्षाचे …

Read More »

कंत्राटी कामगारही भूमीपुत्रांना नोकऱ्या देण्याच्या निकषात उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी राज्यात भूमीपुत्रांना न्याय देण्याच्या प्रयत्नांत कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही हा निकष लागू होईल, असा प्रयत्न करण्यात येत असून यासाठी गरज भासल्यास कायदा करण्यात येईल, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी गुरूवारी एका पत्रकार परिषदेत सांगितले. राज्यात १९६८ सालापसूनच उद्योगांमध्ये भूमीपुत्रांना ८० टक्के प्राधान्य देण्याचा कायदा केला. त्यानंतर त्यात …

Read More »

मातंग समाजासाठी १ लाख घरे अण्णाभाऊवर चित्रपट आणि स्मारकाचे काम लवकर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या विचार व साहित्यातून वंचितांचा आवाज मांडला. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त वंचितांसाठीच्या सर्व योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांचा सर्वतोपरी विकास करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून मातंग समाजासाठी एक लाख घरे देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ …

Read More »

यात्रापेक्षा युवक काँग्रेसचा वेकअप ‘वेकअप महाराष्ट्र’ चा नारा ऑनलाईन आणि थेट संपर्काच्या माध्यमातून भविष्यकाळातील महाराष्ट्राची स्वप्ने जाणून घेणार

मुंबई: प्रतिनिधी आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने खास युवकांसाठी देशात पहिल्यांदाच स्वतंत्र युवक जाहिरनामा तयार करण्याचे ठरविले आहे. यानिमित्ताने राज्यातील ४ ते ५ कोटी युवकांशी प्रत्यक्ष अथवा ऑनलाईन संपर्क साधून त्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र काय आहे, हे त्यांच्याकडूनच जाणून घेऊन युवक काँग्रेसने ‘वेकअप महाराष्ट्र… उद्यासाठी आत्ता’ हे …

Read More »

आधी आम्ही भाजपची बी टीम आहोत का सांगा, मगच आघाडी अँड. प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला सुनावले

मुंबई: प्रतिनिधी आगामी विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने समविचारी पक्षांची आघाडी करण्याबाबत काँग्रेस पक्षाकडून वंचित बहुजन आघाडीला पत्र पाठविले. मात्र लोकसभा निवडणूकीत भाजपची बी टीम म्हणून आमच्यावर आरोप करण्यात आला. त्याअनुषंगाने वंचित बहुजन आघाडी भाजपची बी टीम आहे का? याचे उत्तर काँग्रेसने द्यावे त्यानंतरच त्यांच्यासोबत आघाडी करण्याबाबतचा निर्णय घेणार असल्याचे वंचित आघाडीचे …

Read More »

पक्षातील कुणी वेगळा निर्णय घेत असेल तर शुभेच्छा राष्ट्रवादी काँग्रेसमधील गयारामांना शरद पवारांकडून मोकळीक

साताराः प्रतिनिधी पक्षातील कुणी मंडळी जर काही वेगळा निर्णय घेत असतील, तर आमच्या त्यांना शुभेच्छा! असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी गयाराम आणि गयारामाच्या तयारीत असलेल्यांना लगावत राजकारणात कधी कधी असा प्रसंग येतो, त्याचा सामना करायचा मला अनुभव आहे. एक गोष्ट चांगली आहे, सरकार येणार नाही म्हणून ते …

Read More »

१५१ तालुक्यातील १० वी- १२ वीच्या विद्यार्थ्यांची “संपूर्ण परीक्षा फी” माफ दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांच्या किंवा पालकांच्या खात्यावर थेट होणार जमा शालेय मंत्री अॅड. आशिष शेलार यांचा निर्णय

मुंबईः प्रतिनिधी दुष्काळी परिस्थिती जाहीर केलेल्या १५१ तालुक्यातील १० वी आणि १२ वी च्या विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ करताना यापूर्वी माफ न होणारी प्रात्यक्षिक, गुणपत्रिका व प्रमाणपत्र शुल्कासह संपूर्ण फी आता माफ होणार आहे. तसेच ही प्रतिपूर्ती RTGS मार्फत थेट विद्यार्थ्यांच्या अथवा पालकांच्या खात्यात जमा करण्यात यावी असा निर्णय शालेय …

Read More »

आधी नेत्यांना नाही तर त्यांच्या मुलांना पक्षात घेतलं नेते आपोआप आले मुख्यमंत्री फडणवीस यांचा पवारांच्या वक्तव्यावर खुलासा

मुंबईः प्रतिनिधी आम्ही युतीमध्ये निवडणूक लढवू, पुन्हा युतीचंच सरकार येणार, आता फक्त बहुमताचा विक्रम मोडीत काढायचा आहे. धाक किंवा प्रलोभनं दाखवून भाजपमध्ये प्रवेश दिलेले नाहीत असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावत आम्ही आधी राधाकृष्ण विखेंना भाजपमध्ये घेतलं नाही, आधी सुजय विखेंना घेतलं, तसंच आधी वैभव पिचडांना घेतल्याने …

Read More »

भीम आर्मीच्या आंदोलनामुळे आदीत्य म्हणतात जनआर्शीवाद यात्रा अराजकिय निवडणूकीत पडसाद नको म्हणून शिवसेना 'बॅकफूटवर'

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून जनआशीर्वाद यात्रेचे आय़ोजन करत प्रत्येक जिल्ह्यातील युवकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र सोलापूरातील वालचंद महाविद्यालयात जन आर्शीवाद यात्रेच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्या आदीत्य ठाकरे यांच्या विरोधात भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. त्यामुळे शिवसेनेने बँकफूटवर येत ही यात्राच अराजकिय असल्याची …

Read More »

राजकिय भाषण केल्यास आदीत्य ठाकरेंच्या विरोधात गुन्हा नोंदवा आदीत्य ठाकरेंना अटकाव करणा-या भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना अटक

सोलापूर: प्रतिनिधी आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जन आर्शीवाद यात्रेच्या निमित्ताने सोलापूरातील वालचंद महाविद्यालयात कार्यक्रमासाठी येत असलेले युवा सेना प्रमुख आदीत्य ठाकरे यांना अटकाव करण्यासाठी महाविद्यालयासमोर आलेल्या भीम आर्मीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते आंदोलनासाठी जमा झाले. मात्र पोलिसांनी भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना अटक केली. महाविद्यालयासारख्या शैक्षणिक क्षेत्रात सर्व जातीचे, धर्माचे व वेगवेगळ्या संघटनेचे …

Read More »