पुढील शैक्षणिक वर्षाची सुरुवात विदर्भ वगळता इतर सर्व विभागांत सोमवार १६ जून रोजी तर विदर्भात सोमवार २३ जून २०२५ पासून होणार आहे. शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी ‘शाळा प्रवेशोत्सवा’च्या माध्यमातून मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे. शाळेची गुणवत्ता वृद्धींगत करण्यासाठी व …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत हेलिकॉप्टर निर्मितीसाठी करार ‘मॅक्स एरोस्पेस’ आणि उद्योग विभागात करार, सुमारे ८००० कोटींची गुंतवणूक होणार, २००० रोजगार निर्मिती
नागपुरात सुमारे ८ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा हेलिकॉप्टर उत्पादन निर्मिती कारखाना उभारण्यात येणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेस अँड एव्हिएशन प्रा. लि. आणि महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागात नागपूरमध्ये हेलिकॉप्टर उत्पादन कारखाना उभारण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. नागपूरमधील संरक्षण उत्पादन क्षेत्राला यामुळे गती मिळणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस …
Read More »राज्य सरकारने केला अॅपल आयपॅड पुरवठ्याचा करार रद्द कंपनी आठवड्यातून ५० आयपॅड पुरवू शकली नाही
राज्यमंत्र्यांना हाय-टेक बनवण्यासाठी आणि ई-कॅबिनेट प्रणाली लागू करण्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारने एका कंपनीला ५० अॅपल ब्रँड आयपॅड आणि अॅक्सेसरीज खरेदी करण्याचे कंत्राट दिले होते, परंतु कंपनी आठवड्यातून आयपॅड पुरवू शकली नाही, त्यानंतर सरकारने पुरवठा ऑर्डर रद्द केली आहे. महाराष्ट्र सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने ९ दिवसांपूर्वी ४ जून २०२५ रोजी रेडियस …
Read More »काँग्रेसच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण भारतीय निवडणूक कायद्यांनुसार मतदारांची नावे केंद्रीकृत स्वरूपात समाविष्ट किंवा वगळण्याची कोणतीही तरतूद नाही
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीत मतदारसंख्या वाढली असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी करत ही विधानसभा निवडणूक एकप्रकारची मॅच फिक्सिंग होती असा आरोप केला. त्यानंतर राज्यातील काँग्रेस नेत्यांनीही निवडणूक आयोगावर आरोप केले होते. मात्र काँग्रेसच्या निवडणूक आयोगावरील आरोपाला भाजपाच्या नेत्यांनी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. तर भाजपाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, मोदी व फडणवीस अधर्मी, जनतेला दिलेली आश्वासनं विरसले, मोदी तर सत्ताभोगी अहमदाबाद विमान अपघातामुळे काँग्रेसचे मतचोरी विरोधातील मशाल मोर्चे १५ जून पर्यंत स्थगित
नरेंद्र मोदी हे ११ वर्षापासून पंतप्रधानपदावर आहेत पण ११ वर्षात त्यांनी जनतेल्या दिलेल्या आश्वासनातील एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. मोदी व फडणवीस जे बोलतात ते कधीच करत नाहीत. स्वतःला फकीर म्हणवणारे नरेंद्र मोदी लाखो रुपये किंमतीची जॅकेट्स, लाखो रुपयांचे कपडे वापरतात, महागड्या वस्तू वापरतात, ते योगी नाही तर सत्ताभोगी असून जनतेला दिलेली वचने …
Read More »प्रताप सरनाईक यांची माहिती, आषाढी यात्रेसाठी परिवहन महामंडळ ५ हजार २०० विशेष बसेस सोडणार ग्रुप बुकींग असल्यास राज्याच्या कोणत्याही गावातून थेट पंढरपूर बस
आषाढी यात्रेनिमित्त विठू नामाचा जयघोष करीत श्री श्रेत्र पंढरपुरला जाणाऱ्या भाविक प्रवाशांसाठी राज्य परिवहन महामंडळाने यात्राकाळात ५ हजार २०० विशेष बस सोडण्याचे नियोजन केले आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. ते आषाढी एकादशीच्या नियोजनासाठी पंढरपूर येथे बोलावलेल्या एसटीच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. यावेळी एसटी …
Read More »मंगलप्रभात लोढा यांची ग्वाही, आयटीआयच्या विद्यार्थ्यांना स्थानिक उद्योगातच अँप्रेन्टीसशिप प्रतिवर्षी एक लाख उमेदवारांना प्रशिक्षित करण्याचे उद्दिष्ट
आयटीआयच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या राहत्या जिल्ह्यातच स्थानिक उद्योगात शिकाऊ उमेदवारी अर्थात अँप्रेन्टीसशिप द्यावी, असे आदेश कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. या निर्णयामुळे प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना आता त्यांच्या जिल्ह्यातल्या उद्योगात विद्यावेतनासह काम करण्याची संधी मिळणार आहे. केंद्र शासनाच्या नियंत्रणाखाली औद्योगिक आस्थापनांमध्ये …
Read More »राजकोट किल्ल्यावर भव्य आरमार संग्रहालयासह प्रदर्शन, पर्यटन केंद्र उभारणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय
‘भारतीय नौदलाचे जनक’ छत्रपती शिवाजी महाराज यांचे धैर्य, शौर्य, पराक्रम, अलौकिक कार्याची ओळख नव्या पिढीला व्हावी. छत्रपती शिवाजी महाराज यांनी देशातले पहिले आरमार स्थापन करुन दाखवलेली दूरदृष्टी सर्वांना कळावी. त्यातून प्रेरणा घेऊन भावी पिढी नौदल, नौवहनसेवेत यावी, यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचा ८३ फुट उंचीचा भव्य पुतळा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावर …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते २ हजार ५८८ कोटींच्या २१ कामांचे भूमिपूजन व लोकार्पण अकोला जिल्ह्यातील विकासाचा प्रवाह गतिमान
अकोला जिल्ह्यात सुमारे अडीच हजार कोटींहून अधिक म्हणजेच २ हजार ५८८ कोटी ५५ लाख रूपयांच्या निधीच्या विविध २१ विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झाले. सिंचन, रस्ते, रूग्णालय सुधारणा, सांस्कृतिक भवन, तरण तलावासह विविध प्रशासकीय इमारती अशा विकास कामांमुळे जिल्ह्यातील विकासाचा प्रवाह गतिमान होणार आहे. विविध विकास कामांचे भूमिपूजन …
Read More »अजित पवार यांचे आदेश, इंदापूर, माणगाव रस्त्यांचे काम पूर्ण होईपर्यंत चार पर्यायी रस्त्यांची कामे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी
मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बायपास रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणे आवश्यक आहे. त्यासाठी मोरबा रोड ते मुंबई-गोवा हायवे रस्ता, साईनगर कालवा ब्रिज ते उत्तेखोल कालवा गावापर्यंतचा रस्ता आणि निजामपूर रोड कालवा ते भादाव रस्ता हे माणगाव नगरपंचायत हद्दीतील तीन रस्ते आणि मुंबई – …
Read More »
Marathi e-Batmya